Shubh Prabhat - Shubh Prabhat

जालना हादरले; खडकपुरा येथील 24 वर्षीय तरुणाचा खून; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह पथक घटनास्थळी
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात कारणावरून मयूर मेंढरे याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसराची नाकेबंदी केली असून, पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. गुन्हे अन्वेषण पथक आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांची मदत घेऊन घटनेचा तपास करण्यात येत आहे.

खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वैयक्तिक वाद, जुन्या वैमनस्याचा कोन किंवा इतर कारणांचा तपास पोलीस करीत आहेत. परिसरातील नागरिकांकडून माहिती संकलित करण्यात येत असून, जवळील देखरेख चित्रण यंत्रणांचे चित्रणही तपासले जात आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

पोलीस तपासानंतरच खुनामागील नेमके कारण आणि आरोपींबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे.

बेपत्ता तरुणाच्या हत्येचा वर्षभरानंतर उलगडा; आर्थिक व्यवहारातून मित्रानेच केला खून; डीएनए अहवालाने मृतदेहाची ओळख पटली
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशनगर (जालना) येथील हृषीकेश प्रकाश पवार (वय २०) हा २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी घरातून बाजारात जात असल्याचे सांगून बाहेर पडला होता. त्यानंतर तो परत न आल्याने त्याची आई ज्योती प्रकाश पवार यांनी २४ सप्टेंबर २०२५ रोजी तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मिसिंग क्रमांक ६९/२०२५ नोंदवून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. मोबाईलच्या कॉल डिटेल्सची तपासणी, मित्रांचे जबाब, तसेच शोधपत्रिका प्रसिद्ध करूनही त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

दरम्यान, कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपी अविनाश अंकुश वाघमारे (रा. माळीपुरा, जुना जालना) याच्याकडून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने हृषीकेश पवार याच्यासोबत पैशांच्या व्यवहारावरून वाद झाल्याचे आणि बठाण शिवारातील स्वतःच्या शेतात झालेल्या झटापटीत त्याचा गळा आवळून खून केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेवेळी यशराज खांडेभराड हा देखील सोबत असल्याचे तपासात समोर आले आहे.

त्यानंतर पोलिसांनी दुधना नदी परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमधील अनोळखी मृतदेहांच्या नोंदींची पडताळणी केली. अंबड पोलीस ठाण्यात १ ऑक्टोबर २०२५ रोजी नोंद झालेल्या एका अनोळखी मृतदेहाची माहिती संशयास्पद वाटल्याने त्याची डीएनए तपासणी करण्यात आली. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात त्या मृतदेहाची ओळख हृषीकेश पवार अशी निश्चित झाली असून, ज्योती पवार या त्याच्या जैविक माता असल्याचे स्पष्ट झाले.

तपासात आरोपीने खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह स्कॉर्पिओ वाहनातून गोलापांगरी येथील पुलावर नेऊन दुधना नदीच्या प्रवाहात फेकल्याचेही निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी अविनाश अंकुश वाघमारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) (खून) आणि २३८ (पुरावा नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.

अपघातमुक्त जालना मोहिमेला वेग; वाहतूक शाखेकडून रिफ्लेक्टर बसवून सुरक्षिततेचा दिला संदेश
रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्यावरील बेट, वळणे, अडथळे तसेच संथ गतीने जाणारी वाहने सहजपणे दिसावीत यासाठी या मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी रिफ्लेक्टर टेप लावण्यात आल्या. याशिवाय चौक, डिव्हायडर आणि अपघातप्रवण धोकादायक ठिकाणी परावर्तक चिन्हे बसवून वाहनचालकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला.

या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दृश्यमानता वाढण्यास मदत होणार असून अपघातांची शक्यता कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वाहतूक शाखेकडून सातत्याने जनहिताचे उपक्रम राबविले जात असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले.

दरम्यान, वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे, वेगमर्यादेचे काटेकोर पालन करणे तसेच रात्रीच्या प्रवासादरम्यान विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे आवाहनही वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. अपघातमुक्त जालना मोहिमेला नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मंठ्यात कालबाह्य झालेला चिवडा खाल्ल्याने तरुणास विषबाधा; अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईची मागणी
मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द येथील अजय कानबा काळे (वय 23) यांनी संबंधित दुकानातून फराळी चिवड्याचे पाकीट खरेदी केले होते. हा चिवडा खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, संबंधित चिवड्याच्या पाकिटावरील कालबाह्यता तारीख संपलेली असल्याचे समोर आले आहे. एक्सपायरी डेट संपल्यानंतरही हा माल विक्रीस ठेवल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या घटनेनंतर अन्न सुरक्षा व मानके विभागाने तात्काळ संबंधित दुकानाची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच शहरातील इतर दुकाने व हॉटेलांमध्येही कालबाह्य अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातून येणारे अनेक ग्राहक घाईगडबडीत किंवा माहितीअभावी उत्पादनावरील उत्पादन तारीख व कालबाह्यता तारीख तपासत नाहीत. याचाच फायदा घेत काही दुकानदार एक्सपायरी झालेला माल विक्री करत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

मंठा शहरातील अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवावी, तसेच दोषी आढळणार्‍या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंडे यांनीही गांभीर्याने लक्ष घालून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना उत्पादन तारीख, कालबाह्यता तारीख आणि पॅकिंगची स्थिती तपासूनच खरेदी करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँक रामनगर शाखेतील अधिकारी राहुल पवार व कर्मचार्‍यांना निरोप
व्यवस्थापक राहुल पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आपल्या कार्यकाळात बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत विश्वासार्ह कामगिरी केली. शाखेतील सर्व खातेदार, ग्राहक आणि नागरिकांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे बँकेच्या कामकाजाला नवी दिशा मिळाली, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

निरोप समारंभावेळी अनेकांच्या भावना अनावर झाल्या. अधिकारी व कर्मचार्‍यांनी केलेले योगदान, त्यांची ग्राहकाभिमुख भूमिका आणि सहकार्याची वृत्ती याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पुढील सेवाकाळातही यशाची नवी शिखरे गाठावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी राहुल पवार व इतर अधिकार्‍यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी बँकेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.

शववाहिका असतानाही मृतदेहाची विटंबना; कचर्‍याच्या गाडीतून युवकाचा मृतदेह; प्रशासनाच्या कारभारावर संताप
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हिरालालनगर परिसरातील रहिवासी सुरेश ढाकरगे हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नी उषा ढाकरगे यांनी 2 जून रोजी परतूर पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीनंतर पोलीस, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने त्यांचा शोध सुरू केला होता.

शोधमोहीमेदरम्यान सुरेश ढाकरगे यांची मोटारसायकल शहरातील पाण्याच्या टाकीजवळील झुडपात आढळून आली. त्यानंतर परिसरात अधिक शोध घेतला असता 4 जून रोजी पाण्याच्या टाकीखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मात्र, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविताना प्रशासनाकडून गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा आरोप होत आहे. परतूर नगरपालिकेकडे दोन रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही तसेच महिनाभरापूर्वीच नवीन शववाहिका सुरू करण्यात आलेली असतानाही मृतदेह नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणार्‍या वाहनातून नेण्यात आल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, नव्या शववाहिकेचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. अशा परिस्थितीत आवश्यक वेळी शववाहिका उपलब्ध न होणे हा प्रशासनाच्या नियोजनातील गंभीर त्रुटीचा नमुना असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

या घटनेमुळे मृत व्यक्तीच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित झाला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. मृतदेह वाहतुकीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध असताना कचर्‍याच्या वाहनाचा वापर करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांना निवेदन सादर केले आहे.

या घटनेची शहरभर चर्चा सुरू असून संबंधित दोषींवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पत्नीचा गळा आवळून सदोष मनुष्यवध; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास
प्रकरणातील माहितीनुसार, दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी आरोपी गजानन कावळे हा दारूच्या नशेत आपल्या भाटेपुरी येथील घरी आला होता. त्यानंतर त्याचे पत्नी वंदना कावळे यांच्याशी वाद झाले. या वादातून आरोपीने पत्नीचा रुमालाने गळा आवळून सदोष मनुष्यवध केल्याचा आरोप होता.

या घटनेप्रकरणी फिर्यादी रामनाथ उत्तमराव घाटोळे यांच्या तक्रारीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 09/2025 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) व 238 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी रामनाथ उत्तमराव घाटोळे, मयत महिलेचा मुलगा, घटनास्थळ पंच, निवेदन पंच, इतर साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख तसेच तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन बी. घुगे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. डॉ. दिपक नारायणराव कोल्हे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने सादर केलेला साक्षीपुरावा, वैद्यकीय अहवाल तसेच दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी आरोपी गजानन हरिभाऊ कावळे यास भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 (भाग-2) अंतर्गत दोषी ठरविले.

न्यायालयाने आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावास, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. डॉ. दिपक नारायणराव कोल्हे यांना सेशन कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार तसेच जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

चार महिन्यांपासून फरार असलेला अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खादगाव (ता. बदनापूर) येथील 39 वर्षीय महिलेने 5 फेब्रुवारी 2026 रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या अल्पवयीन मुलीस दीपक राजू जाधव (वय 25, रा. माळशेंद्रा, ता. जि. जालना) याने फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 46/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

https://www.instagram.com/reel/DY6bKPaIpTQ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=NTc4MTIwNjQ2YQ==

या प्रकरणाचा तपास चंदनझिरा पोलीस ठाणे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात आला. मात्र पीडित मुलगी आणि आरोपी यांचा शोध लागत नसल्याने पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी 21 मे 2026 रोजी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी व पीडितेचा शोध सुरू केला. तपासादरम्यान दोघेही वाळूज परिसरातील राजणगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने माऊलीनगर, कमळापूर, राजणगाव (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे छापा टाकून आरोपी व पीडित मुलगी यांना ताब्यात घेतले

पीडित मुलीची ओळख पटवून दोघांनाही पुढील तपासासाठी जालना येथे आणण्यात आले असून चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, प्रशांत लोखंडे, रेणुका बांडे, सौरभ मुळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप मांटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

गरुड प्रतिमेवर डान्स करून व्हिडिओ व्हायरल करणारा युवक अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कैलास गायकवाड (वय 26, रा. मंगळ बाजार, जालना) याने काही दिवसांपूर्वी मोतीबाग चौपाटी येथील गरुडाच्या प्रतिमेवर चढून डान्स केला होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

या प्रकरणी जालना महानगरपालिकेच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून शुक्रवारी मंगळ बाजार परिसरातून आरोपी दिनेश गायकवाड याला ताब्यात घेतले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुब वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवी देशमुख आणि सागर खैरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सार्वजनिक मालमत्ता, स्मारके व प्रतिमांचा अवमान करणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पोलिसांनी दिला असून अशा कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

अतिक्रमण हटविण्याच्या कामासाठी 40 हजारांची लाच घेताना मनपा कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले
या प्रकरणातील आरोपी भाऊलाल चापा राठोड (वय 57), प्रभारी सहायक अतिक्रमण पथक प्रमुख, तसेच श्यामसन छबुराव कसबे (वय 51), प्रभारी सहायक अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख, दोघेही महानगरपालिका जालना येथे कार्यरत आहेत.

तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी मामा चौक ते कोलू तेली घाणा संघ परिसरातील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणाचे निर्मूलन व नालेसफाई करण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते. मात्र, वारंवार विनंती करूनही कारवाई होत नसल्याने तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता अतिक्रमण हटविण्याच्या कामासाठी 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर 20 मार्च 2026 रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपींनी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार 28 मे 2026 रोजी जालना येथील जुना मोंढा परिसरातील बाबा टी हाऊस येथे सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी श्यामसन कसबे यांनी तक्रारदाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दुसरे आरोपी भाऊलाल राठोड यांनाही ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान आरोपींकडून 40 हजार रुपयांची लाचरक्कम जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोनही जप्त करून त्यांचे विश्लेषण सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे करीत आहेत. या कारवाईस पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे तसेच पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सावरकरांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज : धनसिंह सुर्यवंशी
ब्राह्मण सभा भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दोन जन्मठेपांची शिक्षा भोगली, काळ्या पाण्याची शिक्षा सहन केली आणि स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच लहुजी साळवे यांसारख्या क्रांतीवीरांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सावरकर हे विज्ञाननिष्ठ विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांचे आचरण केल्यास समाजात जागरूकता आणि राष्ट्रनिष्ठा अधिक दृढ होईल, असेही त्यांनी नमूद केले. समाजातील बदलत्या परिस्थितीत युवकांनी वाचन, चिंतन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेंद्र कोयाळकर होते. यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे, उपाध्यक्ष रमेश देहेडकर, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, सचिव डॉ. सुभाष भाले, अ‍ॅड. ईश्वर बिल्लोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मुकुंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी आर. आर. जोशी, रवींद्र देशपांडे, श्रीकांत शेलगांवकर, डॉ. संजय रूईखेडकर, संतोष दाणी, डॉ. पद्माकर सबनीस, शिवाजी जोशी, अतुल हेलसकर, संजय देशपांडे, नितीन दंडनाईक यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

6 घरफोडीचे गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 3 आरोपी जेरबंद; 1 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी चोरी व घरफोडी करणार्‍या आरोपींचा शोध घेऊन वलीमामू दर्गा परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी रंगनाथनगर येथील घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी काही घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली देत चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला.

या कारवाईत तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतील रंगनाथनगर, सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील व्यंकटेशनगर, बालाजीनगर, श्रीकृष्णनगर, धनलक्ष्मी बिकानेर स्वीट, भोकरदन नाका येथील घरफोडी तसेच जिजामाता कॉलनी येथील घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुंदरसिंग सुखुसिंग राजपुत रा. वलीमामू दर्गा, जालना, लाजरस शांतीलाल मिसाळ रा. वलीमामू दर्गा, जालना आणि मनोज कलाजी धानुरे रा. दर्गावेस काद्राबाद, जालना यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.