अश्विनी साबळे - Shubh Prabhat

खा. डॉ. कल्याण काळे यांची आमरण उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांना भेट; शेतकर्‍यांच्या मागण्यांना पाठिंबा
खा. डॉ. कल्याण काळे यांनी सोमवार दि. 9 फेब्रुवारी, दुपारी 1 वाजता आमरण उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांची भेट घेतली. गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून उपोषणामागील मागण्या जाणून घेतल्या.

यावेळी कारखाना शेतकर्‍यांच्या हितासाठी कसा सुरू होईल, शेतकर्‍यांचे नुकसान कसे भरून काढता येईल आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीची कार्यवाही कशी होईल, याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांची मागणी रास्त असून आपण खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठी उभे असल्याचे आश्वासन खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिले.

त्यानंतर खासदारांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची तात्काळ माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, तसेच उपोषणकर्त्यांच्या वतीने येणार्‍या शिष्टमंडळासोबत मागण्यांवर चर्चा करून मार्ग काढावा, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या.

या भेटीदरम्यान शेतकरी नेते लक्ष्मणरावजी वडले, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष कल्याण दळे, संघर्ष समितीचे अध्यक्ष अंकुश देशमुख, नारायण वाडेकर, लक्ष्मण शिंदे, अशोक उबाळे, राम सावंत, ड. सोपानराव भांजे, उदय देशमुख, राजेंद्र गोरे, चंद्रकांत देशमुख, सुरज यंगटवार, लाला पाटील लकडे, बाबुराव थेटे यांच्यासह अनेक शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याने उपोषणस्थळी आशेचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

जिल्हास्तरीय संविधान गुणगौरव परीक्षेचे पारितोषिक वितरण व संविधान जनजागृती कार्यशाळा
सुजान नागरिक मंच, संविधान गुणगौरव समिती, सत्यभामा प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन, जालना येथे भारतीय संविधानावर आधारित जिल्हास्तरीय संविधान गुणगौरव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षेचे पारितोषिक वितरण तसेच संविधान जनजागृती कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या कार्यक्रमात संविधान अभ्यासक नूरखान पठाण (रायगड) यांनी व्याख्याते म्हणून सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक राम गायकवाड होते. तर उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काकडे, अण्णा सावंत, प्रतीक भक्त, राजेश ओ. राऊत, विलास पवार, भास्कर शिंदे, किशोर चव्हाण, विलास अंभोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक रमेश थोरवे हेही यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाच्या पुस्तिकेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अनिष्ट चालीरीती, धर्मभेद, लिंगभेद व जातीयता यांसारख्या लोकशाही व मानवतेला बाधक असलेल्या प्रथांचे प्रतीकात्मक फुगे मान्यवरांच्या हस्ते फोडून सर्वांना एकत्र बांधणार्‍या संविधानाच्या प्रास्ताविकेचे विमोचन करण्यात आले. उपस्थितांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचनही केले.

यावेळी अ‍ॅड. कांचन थोरवे यांनी सामाजिक चळवळीवर आधारित गीत सादर करून कार्यक्रमाला प्रेरणादायी रंगत आणली. संविधान गुणगौरव परीक्षेत विविध शाळांमधून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा, शिक्षकांचा व मुख्याध्यापकांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

संविधान जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना नूरखान पठाण यांनी भारतीय संविधान हे नव्या भारताचे ब्लूप्रिंट असून ते सर्व जाती-धर्मांना न्याय देणारे बळकट साधन असल्याचे प्रतिपादन केले. संविधानामुळे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक होते, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा पदाधिकारी मधुकर गायकवाड, ज्ञानेश्वर गिराम, प्रशांत वाघ यांच्यासह चंद्रमणी गाडेकर, संदीप इंगोले, ब्रह्मानंद विणकर, प्रा. जानराव सर, मिर्झा अफसर, वसंत पटेबहाद्दूर, प्रदीप घाटे शाही, सारिका लोहकरे, के. एस. कांबळे, सर्जेराव खरात, राजेभाऊ मगर, लीना हिवराळे, लक्ष्मीबाई मगरे, गवळी आई, राजाराम मोरे, श्रीराम मोरे, रंगनाथ गवळी, ड. कांचन थोरवे, मनीषा गिराम, वैभव थोरवे, गौरव थोरवे यांच्यासह मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सल्लागार प्रशांत वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुकर गायकवाड यांनी मानले. संविधानाविषयी जागृती घडवून आणणारा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरला.

जालन्याच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे; उपमहापौरपदी राजेश राऊत यांनी स्वीकारला पदभार
जालना शहराच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. नव्याने स्थापन झालेल्या जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी नगरसेविका वंदना मगरे यांची, तर उपमहापौरपदी नगरसेवक राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली. निवड जाहीर होताच वंदना मगरे यांनी आजच आपल्या महापौर पदाचा कार्यभार स्वीकारला.

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या प्रक्रियेत महापौर पदासाठी वंदना मगरे, तर उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. अन्य कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने दोन्ही पदांवर बिनविरोध निवड निश्चित झाली.

महानगरपालिकेत पार पडलेल्या या विशेष सर्वसाधारण सभेत अधिकृतरीत्या निवडीची घोषणा करण्यात आली. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी कामकाज पाहिले. निवड जाहीर झाल्यानंतर वंदना मगरे यांनी जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून पदभार स्वीकारला, तर राजेश राऊत यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन करण्यात आले.

या विशेष सर्वसाधारण सभेला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भास्कर आबा दानवे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे यांची निवड आणि उपमहापौरपदी राजेश राऊत यांचा पदभार स्वीकारल्याने शहराच्या विकासाच्या दृष्टीने नवे पर्व सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल; कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी एआय कार्यशाळा
सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक गोष्टीतील बारकावे मानवी बुद्धिमत्तेत साठवून ठेवणे आणि ते वेळेवर आठवणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत माहितीचे अचूक विश्लेषण करण्यासाठी ’कृत्रिम बुद्धिमत्ता’ अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. भारतातील संगणक क्रांतीनंतरचा हा सर्वात मोठा बदल असून कृषीप्रधान भारतासाठी एआय तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात एआय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.

कृत्रिम बुध्दीमत्तेद्वारे कृषी तंत्रज्ञानाची प्रगती या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास प्रमुख्य वक्ते म्हणून फाइंडॅबिलिटी सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहुरकर, मॅजिकचे मकरंद कुलकर्णी, रितेश मिश्रा, डॉ.प्रसन्न भोगले यांच्यासह डॉ.मंदार कुलकर्णी, डॉ.दीपक बोरनारे, डॉ.गोपाळ शिंदे, प्रसाद कोकिल, सौरभ कदम, पुजा गोशेर, पी.टी.यशराज, मॅजिकचे व्यवस्थापक डी.एम.राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतीमधील पिकांचे नियोजन, हवामानाचा अंदाज आणि कीड नियंत्रण यासाठी एआय तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरत आहे. मानवी बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत, मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता अमर्याद असून ती अचूक निर्णय प्रक्रियेत मोठी मदत करते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीमधील उत्पादन कसे वाढवता येईल आणि जोखीम कशी कमी करता येईल, यासाठी शेतकर्‍यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

फाइंडॅबिलिटी सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहुरकर म्हणाले, मानवी बुद्धिमत्ता जे सांगू शकत नाही, ते एआय सांगू शकते. शेतीमध्ये विविध ऋतूंमध्ये काढलेली छायाचित्रे हा केवळ डेटा नसून, त्यापासून शिकणारी मशिन भविष्यातील संकटांचा अंदाज देऊ शकते. अन्नाची वाढती मागणी, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारातील चढ-उतार यावर मात करण्यासाठी एआय माहितीचे अचूक विश्लेषण करते. यामुळे पिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या तात्काळ शोधणे शक्य होते. सध्याच्या काळात प्रत्येक गोष्टीतील बारकावे मानवी स्मरणात ठेवणे कठीण झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता ही काळाची गरज बनली आहे. मात्र, आपल्याकडे ’चॅटजीपीटी’लाच एआय समजले जाते, ही चुकीची संकल्पना आहे. वास्तवत: एआय ही कोणतीही जादू नसून ती माहिती विश्लेषणाद्वारे अचूक निर्णय घेण्याचा एक सक्षम पर्याय आहे. तरी कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ’कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या कार्यशाळेतून कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शेतकर्‍यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीमधील उत्पादन कसे वाढवता येईल आणि जोखीम कशी कमी करता येईल, यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मॅजिकचे व्यवस्थापक डी. एम. राठोड यांनी केले. या कार्यक्रमास कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, संशोधक, तज्ज्ञ, शेतकरी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

जालन्यातील बिगारी चौकात तरुणावर रक्तरंजित हल्ला; एकजण गंभीर जखमी; परिसरात भीतीचे वातावरण
जालना शहरात गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नवीन जालना भागातील बिगारी चौक परिसरात सोमवारी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. सोमवार दि. 9फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत दिगंबर भीमा दरेकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोराने अचानक धारदार शस्त्राने वार केल्याने दिगंबर दरेकर रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

जखमी अवस्थेत दिगंबर दरेकर यांना तात्काळ जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा निर्णय घेतला.

घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमीची चौकशी केली. घटनास्थळीही पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळच्या वर्दळीच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे बिगारी चौक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोर फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

वाघरुळ घाटात १२ वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला; पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे गुन्हेगारी वाढल्याचा आरोप
जालना: जालना–देऊळगाव राजा रस्त्यावरील वाघरुळ घाटाजवळ भरदिवसा १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर दोन अनोळखी इसमांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप केला जात आहे.

शेख हुजेर शेख जमीर (वय १८, रा. नादी कॉलनी, जुना जालना) हा विद्यार्थी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी कॉलेजच्या कामासाठी मोटारसायकलवरून राजकुंवर ज्युनिअर कॉलेज, वाघरुळ येथे जात असताना वाघरुळ घाटाजवळ दोन अनोळखी इसमांनी त्याची मोटारसायकल लाथ मारून पाडली. त्यानंतर त्याला शिवीगाळ करून चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. लाकडी दांड्याने मानेवर वार, कटरने हात, छाती व पोटावर जखमा तसेच डोक्यात मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

हल्ल्यानंतर संबंधित इसमांनी तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देत देऊळगाव राजा दिशेने पलायन केले. या गंभीर प्रकारानंतरही रस्त्यावर नियमित पोलिस बंदोबस्त नसल्याने अशा गुन्हेगारी घटना वाढत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

प्रतिबंधित घुटक्याचा साडे बारा लाखांचा साठा जप्त; बदनापूर पोलिसांची धडक कारवाई
दाभाडी जवळ वाहनाची तपासणी केली असता एम एच 21 बीएफ 5206 क्रमांकाच्या वाहनातून सुमारे 2 लाख 49 हजार 360 रुपये किंमतीचा प्रतिबंधित घुटका आढळून आला. याप्रकरणी संदीप दत्ता भूमकर (रा. राजूर, ता. भोकरदन), रमेश गावंडे (रा. छत्रपती संभाजीनगर) आणि रवी प्रभाकर फुके (रा. उंबरखेड, ता. भोकरदन) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अटकेत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांच्यासह पोहेकॉ दासार, नितीन वाघमारे, दीपक कराढ, पूनंसिंग गोळवाल, पिल्लेवाड आणि चालक कुंटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

प्लॉट वादातून व्यापार्‍याला मारहाण; विनीत चेचाणी, साईनाथ पवार यांच्यासह 7 जणावर गुन्हा दाखल
प्रसन्न कुमार विनयकुमार कोठारी रा. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, जालना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावावर सर्वे नंबर 183, नवा मोंढा समोर जालना येथे जमीन होती. त्यापैकी 4 हजार 552 स्क्वेअर फूटचा एक प्लॉट दि. 5 एप्रिल 2022 रोजी महेश सत्यनारायण चेचाणी यांना रितसर खरेदीखत करून व प्रत्यक्ष ताबा देऊन विक्री करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित प्लॉटला सिमेंट ब्लॉकची कंपाऊंडही बांधण्यात आली होती.

मात्र, अलीकडच्या काही दिवसांपूर्वी शिवाजी किंग्रे नामक इसमाने हा प्लॉट आपला असल्याचा दावा केल्याने वाद निर्माण झाला. हा प्रश्न मोजणी करून मिटवण्याचे ठरले होते. त्यानुसार 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीदरम्यान शुभम सुरेंद्र चेचाणी, विनीत महेश चेचाणी, महेश सत्यनारायण चेचाणी, साईनाथ पवार, मयूर भुरेवार, गोलू नरवैय्ये व इतर अनोळखी इसमांनी कोठारी व त्यांच्या वडिलांना मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कुष्ठरोग निर्मुलनासाठी कुसुम अभियान; गावोगावी जात प्रशासनाकडून जनजागृती सुरु; जिल्ह्यात प्रभावी आंमलबजावणी
सन 2027 पर्यंत शुल्य कुष्ठरोग प्रसार हे ध्येय साध्य करण्यासाठी कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) या मोहिमेअंतर्गत बांधकाम मजुर, कारागृहातील कैदी, आश्रमशाळा, वीटभट्टी कामगार, स्थलांतरीत कामगार आदींचे विशेष सर्व्हेक्षण करण्यांत येत आहे. यासाठी आशा व आरोग्य कर्मचारी यांचे पथक तयार केले असुन त्यांच्यामार्फत संशयित कुष्ठरुग्णांस शासकिय रुग्णालयामध्ये संदर्भीत करण्यांत येत आहे. ’स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालय, महिला बचतगट, निबंध स्पर्धा, प्रभात फे-या व आरोग्य प्रदर्शनासह व्यापक जनजागृती करण्यांत येत आहे.

सदरील अभियानास नागरीकांनी कुष्ठरोग तपासणी मोहिमेला प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.मिन्नू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ.सुधाकर शेळके यांनी केले आहे.

अतिसंवेदनशिल भागामध्ये 5200 जनतेची 112 पथकाद्वारे संशयित कुष्ठरुग्णांची तपासणी केली असुन, संशयित रुग्णांची वैद्यकिय अधिका-यांकडुन तपासणी करुन उपचार देण्यात येत असल्याची माहिती कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ.सुधाकर शेळके यांनी दिली आहे.

आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण करुन अमाणुष मारहाण व लुटमार करणारे तीन आरोपी ताब्यात
दि. 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता मंठा रोडवरून एका आईस्क्रीम विक्रेत्यास काही इसमांनी मारहाण करून जबरदस्तीने वाहनात बसवून अपहरण केल्याची माहिती मिळाली. अपहृत व्यक्तीस अज्ञातस्थळी नेऊन मारहाण करत पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे तसेच पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले.

माहिती मिळताच पोलीस ठाणे तालुका जालना येथील पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ डी.बी. पथकासह तीन तपास पथके तयार केली. नाव्हा, सिधीकाळेगाव व वाघरुळ परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. आरोपींनी फोनपेवरून पैसे मिळताच अंधाराचा फायदा घेऊन मोबाईल बंद करून पळ काढला; मात्र पोलिसांनी अवघ्या दोन ते अडीच तासांत मंठा चौफुली परिसरातून अपहृत व्यक्ती व वाहनाची सुटका केली.

या प्रकरणी नवरत्न प्रकाश पुरी रा. भिलवाडा, राजस्थान; सध्या गायत्रीनगर, जालना यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार यांनी करुन ओमकार मारुती पवार रा. पिरकल्याण, ता. जि. जालना; सध्या कल्याण, ठाणे यांने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. तसेच त्या गुन्ह्यात सचिन शिवशंकर केदारे रा. गांधीचमन, माळीपुरा, जुना जालना व सुमित शैलेश डुरे रा. विठ्ठल मंदिर, कज्बा, जुना जालना यांचा सहभाग असल्याचे आढळून आले. दरम्यान ते दोघे जालन्याकडून देऊळगाव राजाच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

फरार आरोपी ओमकार मारुती पवार याला पुणे व अहिल्यानगर सीमेवरील एका हॉटेलमधून 4 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली. सध्या तिन्ही आरोपी पीसीआरमध्ये आहेत.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, चोरी गेलेला फिर्यादीचा मोबाईल, फोनपे व रोखीने काढलेली एकूण 6 हजार 900 रुपये रक्कम, दोन लाकडी काठ्या, आईस्क्रीम कटर, नट काढण्याचा पान्हा व दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार यांनी त्यांच्या सहकार्‍यासह केली.

https://www.instagram.com/reel/DUcuvJtCFkF/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे; उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड
महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी महानगरपालिका प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला होता. आज दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार महापौर पदासाठी वंदना मगरे आणि उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. इतर कोणतेही नामनिर्देशनपत्र दाखल न झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर शहराचा पहिला महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर वंदना मगरे यांची पहिल्या महापौरपदी निवड झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निवडीनंतर भाजप पदाधिकार्‍यांकडून वंदना मगरे व राजेश राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या बहुमताप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्षाला बहुमत मिळेल, असा विश्वास भाजप नेते तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला. त्यांनी या निवडीला जालना शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचेही नमूद केले.

https://www.instagram.com/reel/DUYa7ZXiCRk/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

https://twitter.com/SPrabhat72222/status/2014764880700833859?s=20

गुन्हे नियंत्रणासाठी जिल्हा पोलीस दलात बिट मार्शल पेट्रोलिंग योजना कार्यान्वीत; शहरातून काढली बिट मार्शलने रॅली
जालना शहरात गुन्हेगारी नियंत्रण प्रभावीपणे राखण्यासाठी, पोलीसिंग अधिक बळकट करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढविण्यासाठी शहर बिट मार्शल पेट्रोलिंग योजना कार्यान्वीत करण्यात आली. या बिट मार्शलचे उद्घाटन गुरुवार दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेअंतर्गत 10 मोटारसायकलवर 20 पोलीस अंमलदार दिवस-रात्र पेट्रोलिंग करणार आहेत.
त्यानंतर बिट मार्शल यांनी दुचाकीसह शहरातून रॅली काढली, यावेळी जालनेकरांचे लक्ष या रॅलीने वेधून घेतले. या वार्षिक तपासणीदरम्यान पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक जान्हवी शेखर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व विविध शाखांचे प्रमुख उपस्थित होते.