शहरे - Shubh Prabhat

नंदापूर ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
जालना प्रतिनिधी : प्रजेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त जालना तालुक्यातील नंदापूर ग्रामपंचायत कार्यालयात (दि. 31) रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात जेष्ठ नागरिक सुखदेव चांदगुडे, भरत उबाळे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी विचारांना उजाळा दिला.

जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दत्तु कुरधने यांची उपस्थित होती. याप्रसंगी भरत उबाळे यांनी बोलताना सांगितले की, अहिल्याबाई होळकर यांचे कार्य केवळ एका काळापुरते मर्यादित नसून, त्यांचे कुशल प्रशासन, न्यायव्यवस्था आणि समाजकल्याण आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या अभिवादन कार्यक्रमास माजी उपसरपंच रामदास खरात, ऋषींदर कुरधने, सुखदेव चादगुडे, भरत उबाळे, रोजगार सेवक रविंद्र उबाळे, दादाराव कुरधने, राहुल खरात, सखाराम उबाळे, अर्जुन उबाळे, कर्मचारी गजानन कुरधने, रावसाहेब कुरधने, अंकुश कुरधने, श्री कुरधने आदीसह अनेकांची उपस्थिती होती.

तर सायंकाळी ६ वा. दरम्यान टाळ मृदंगाच्या गजरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी गावातून मिरवणूक काढत अनोखा पध्दतीने जयंती साजरी केली.

घरातून नेत २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, पीरकल्याण येथील रहिवासी असलेल्या अतुल आघाम याला काही आरोपींनी घरातून बोलावून नेले. त्यानंतर त्याला गवळी पोखरी शिवाराच्या दिशेने घेऊन जात असताना रस्त्यात त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. आरोपींनी अतुलवर एकामागून एक वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.
हल्ल्यानंतर जीव वाचविण्यासाठी अतुल जखमी अवस्थेत गावाच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, शरीरावर झालेल्या गंभीर जखमा आणि अतिरक्तस्रावामुळे तो काही अंतरावरच कोसळला. त्यानंतरही हल्लेखोरांनी त्याच्यावर पुन्हा वार केल्याचे सांगितले जात आहे. या भीषण हल्ल्यात अतुलचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या हत्येमुळे पीरकल्याण गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत्युदेह रात्रीच पीएमसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविला असुन पोलीसानी तपास करण्यास सुरुवात केली आहे.
हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वादातून अथवा वैयक्तिक कारणातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून दोन संशयितांचा अटक केली असून रात्री उशीरापर्यत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची  माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, तरुण वयात अतुल आघाम याचा झालेला दुर्दैवी मृत्यू गावकऱ्यांना चटका लावणारा ठरला आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पोलिस तपास सुरू असून हत्येमागील कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

जालना बसस्थानकाजवळील सीना नदीचे पात्र रुंदीकरण सुरू
महापूराच्या वेळी नदीपात्र अरुंद असल्याने पाण्याचा वेग वाढून अनेक भाग जलमय झाले होते. बसस्थानक परिसरातील दुकाने, हातगाडे, लहान व्यवसायिक तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यानंतर स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून नदीचे पात्र रुंद करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.

या मागणीची दखल घेत प्रशासनाने महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने नदी सुधारणा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार नदीतील गाळ काढणे, अतिक्रमणे हटविणे, पात्राची रुंदी वाढविणे आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कामे सुरू करण्यात आली आहेत.

सध्या जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नदीपात्र खोलीकरणाचे काम वेगाने सुरू असून अनेक ठिकाणी अडथळे हटविण्यात येत आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार आगामी पावसाळ्यापूर्वी कामाचा मोठा टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले असून भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. “गतवर्षीच्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. आता नदीचे पात्र मोठे होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळेल,” अशी प्रतिक्रिया परिसरातील व्यापाऱ्यांनी दिली.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावर अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले असून पावसाळ्यापूर्वी पूरनियंत्रणाच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

मान्सूनपूर्व तयारीसाठी मोती तलाव येथे आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापन व पूर बचाव प्रशिक्षण; पथकाला साहित्याचे वाटप
प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 26 ‘आपदा मित्र’ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. यावेळी जल बचाव व पूर परिस्थितीत वापरण्यात येणारी इन्फ्लेटेबल रेस्क्यू बोट, मोटर बोट इंजिन, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, रेस्क्यू रोप, फ्लोटिंग पंप, पोर्टेबल पंप तसेच सर्च व फ्लड लाईट यांची माहिती देण्यात आली.

तसेच हेल्मेट, सेफ्टी ग्लोव्हज, रेन प्रोटेक्शन साहित्य, फर्स्ट एड किट आणि स्ट्रेचर यांसारख्या आपत्कालीन संरक्षक साहित्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. इमारत दुर्घटनेतील बचाव कार्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक बोल्ट कटर, हायड्रॉलिक कटर, स्प्रेडर, कंक्रीट ब्रेकर, रेस्क्यू कटिंग टूल्स, लोखंड कापण्याची साधने, क्रोबार, हातोडे, फावडे व रेस्क्यू लाईटिंग उपकरणांचीही माहिती देण्यात आली.

गरुड प्रतिमेवर डान्स करून व्हिडिओ व्हायरल करणारा युवक अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कैलास गायकवाड (वय 26, रा. मंगळ बाजार, जालना) याने काही दिवसांपूर्वी मोतीबाग चौपाटी येथील गरुडाच्या प्रतिमेवर चढून डान्स केला होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

या प्रकरणी जालना महानगरपालिकेच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून शुक्रवारी मंगळ बाजार परिसरातून आरोपी दिनेश गायकवाड याला ताब्यात घेतले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुब वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवी देशमुख आणि सागर खैरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सार्वजनिक मालमत्ता, स्मारके व प्रतिमांचा अवमान करणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पोलिसांनी दिला असून अशा कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

सावरकरांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज : धनसिंह सुर्यवंशी
ब्राह्मण सभा भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दोन जन्मठेपांची शिक्षा भोगली, काळ्या पाण्याची शिक्षा सहन केली आणि स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच लहुजी साळवे यांसारख्या क्रांतीवीरांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सावरकर हे विज्ञाननिष्ठ विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांचे आचरण केल्यास समाजात जागरूकता आणि राष्ट्रनिष्ठा अधिक दृढ होईल, असेही त्यांनी नमूद केले. समाजातील बदलत्या परिस्थितीत युवकांनी वाचन, चिंतन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेंद्र कोयाळकर होते. यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे, उपाध्यक्ष रमेश देहेडकर, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, सचिव डॉ. सुभाष भाले, अ‍ॅड. ईश्वर बिल्लोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मुकुंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी आर. आर. जोशी, रवींद्र देशपांडे, श्रीकांत शेलगांवकर, डॉ. संजय रूईखेडकर, संतोष दाणी, डॉ. पद्माकर सबनीस, शिवाजी जोशी, अतुल हेलसकर, संजय देशपांडे, नितीन दंडनाईक यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

वाळू माफियांच्या धाकाने कुटुंब भयभीत; मध्यरात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतला आश्रय
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसवाडी येथील रहिवासी वसंत वाघमारे यांच्या कुटुंबाला गेल्या काही दिवसांपासून काही वाळू माफियांकडून सतत त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरातील महिलांना वारंवार त्रास देणे, घरासमोर येऊन विचित्र हावभाव करणे, तसेच कुटुंबातील पुरुष सदस्यांना मारहाण करणे असे प्रकार घडत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

या प्रकरणी घरातील एका महिलेच्या फिर्यादीवरून दोन वेळा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, संबंधित आरोपींवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप वाघमारे कुटुंबाने केला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वाळू माफियांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळेच आरोपींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

दि. 15 मे रोजी याच प्रकरणात गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित संशयित आरोपींनी पुन्हा पीडित कुटुंबाच्या घरावर सशस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर वसंत वाघमारे यांचे कुटुंब एका लहान मुलासह मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास थेट जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. जीवाच्या भीतीने त्यांनी रात्रभर पोलीस अधीक्षक कार्यालयातच थांबून आश्रय घेतला.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर खासदारांना बोलू दिले नाही; काँग्रेस व किसान काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पडुळ आणि किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाढेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. दि. 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पालकमंत्री संजय सिरसाट अध्यक्षस्थानी होते.

बैठकीदरम्यान खासदार डॉ. कल्याण काळे हे शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडत असताना त्यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी शेतकर्‍यांसाठी संवैधानिक मार्गाने प्रत्येक बैठकीत त्यांचे प्रश्न मांडणारच, अशी ठाम भूमिका खासदार काळे यांनी व्यक्त केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी सोपान तिरुखे, गणेश खरात, भाऊसाहेब लकडे, ड. देवराज, गौतम लांडगे, डोंगरे, ज्ञानेश्वर इंगोले, राम मोरे, बबलू राजपूत, अजीम शेख, पप्पू काळे, परमेश्वर सुळसुळे, नितीन बचाटे, भरत शिंदे, राम पवार, रामनाथ देव्हडे, विक्रम चव्हाण, विजय राठोड यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

मनपा शाळांनंतर आता आरोग्य केंद्रांवर लक्ष; आयुक्त अंजली शर्मा यांची विविध केंद्रांना भेट; मुलभुत सुविधांची केली तपासणी
या पाहणी दौर्‍यात आयुक्तांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नूतन वसाहत (डबल जिन), रामनगर तसेच शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, मुर्गी तलाव आणि विसावा नूतन वसाहत येथील आरोग्य सेवांची तपासणी केली. यावेळी त्यांनी औषधसाठा, लसीकरण मोहीम, रुग्ण नोंदणी व्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांना दिल्या जाणार्‍या सुविधांची माहिती घेतली.

https://www.instagram.com/reel/DYXcAaDT8H0/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

आरोग्य केंद्रांवरील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांशी संवाद साधताना आयुक्तांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना आरोग्य सेवा घेताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच उपचार सेवा अधिक परिणामकारक आणि वेळेवर मिळाव्यात, यासाठी आवश्यक सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.
या दौर्‍यावेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतुल राजे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक डॉ. दीपक भालेराव यांच्यासह विविध आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील प्राथमिक आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून तळागाळातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.

बदनापूर पोलिसांच्या उत्कृष्ट तपासकार्याचा राज्यस्तरीय गौरव
बदनापूर पोलीस ठाणे, जिल्हा जालना येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 445/2022 अंतर्गत भारतीय दंड विधान कलम 376 व 376(ड) या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या तपासात दोन्ही अधिकार्‍यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या तपासकौशल्याची आणि मेहनतीची दखल घेत सदर गुन्ह्याची मार्च 2026 महिन्यासाठी महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या गौरवास्पद यशामुळे जालना जिल्हा पोलिस दलाची मान उंचावली असून दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याबद्दल सहकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिकांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस हवालदार जावेद शेख आणि दिगंबर चौरे यांचे या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

जालना शहरात 102 मॉडिफाइड बुलेट सायलेन्सरवर रोलर; वाहतूक शाखेची धडक कारवाई
जालना शहरात मोटार वाहन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर लावून ध्वनीप्रदूषण करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी दिले होते. त्यानुसार शहर वाहतूक शाखा आणि शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने विशेष मोहीम राबवली.

https://www.instagram.com/reel/DYY_HWZTRQI/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

या मोहिमेदरम्यान मागील दोन वर्षांत मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणार्‍या 102 बुलेट चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. संबंधित वाहनांचे मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. जप्त केलेले हे सायलेन्सर शुक्रवारी रोलर फिरवून नष्ट करण्यात आले.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक घोरपडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मगरे, पोलीस हवालदार कचरू गवते, नंदकिशोर कामे, शिवाजी उबाळे, प्रदीप झरेकर आणि रघुनाथ अंभोरे यांनी सहभाग घेतला.

जालना शहरात मोठ्या आवाजाच्या बुलेट वाहनांविरोधातील ही संयुक्त मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच सर्व नागरिकांनी मोटार वाहन कायद्याचे पालन करून नियमांचे उल्लंघन टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दोन वर्षांपासून निवृत्तीवेतन आणि लाभ रखडले; सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी हे प्राथमिक आरोग्य केंद्र जिरडगाव, ता. घनसावंगी येथून आरोग्य सहाय्यक पदावरून सप्टेंबर 2023 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. ते 2005 पूर्वीचे कर्मचारी असून सेवानिवृत्त होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप त्यांना जीपीएफ, रजा रोखीकरण, जीआयएस, ग्रॅज्युइटी तसेच पेन्शन किंवा तात्पुरती पेन्शन यापैकी कोणताही आर्थिक लाभ मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले आहे. जून 2025 पासून मार्च 2026 पर्यंत विविध तारखांना पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

पेन्शन व आर्थिक लाभ रखडल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम झाला असून मुलांचे शिक्षण, आजारपण आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक अडचणीमुळे कुटुंब उपासमारीच्या स्थितीत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

दरम्यान, सेवानिवृत्तीचे सर्व लाभ तात्काळ मंजूर करून पेन्शन सुरू करण्यात यावी, अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा संबंधित सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी दिला आहे.