क्राईम - Shubh Prabhat

राजुरमध्ये १ कोटी ३५ लाखांचा गुटखा जप्त; पुरवठ्याच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचणार का?
ही कारवाई दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हसनाबाद पोलिसांच्या मदतीने राजुर येथे छापा टाकण्यात आला. राजुर येथील टेंभुर्णी रोड परिसरात इसम संदिप भुमकर, रा. राजुर हा त्याच्या गोठ्यावर मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा खाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.

छाप्यादरम्यान गोवा, विमल, रजनीगंधा, आर.एम.डी., राजनिवास आदी कंपन्यांचा बंदी असलेला गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पंचांसमक्ष हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

९५ लाखांचा गुटखा; वाहनेही पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ९५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. याशिवाय गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहनेही ताब्यात घेण्यात आली असून त्यांची किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात संदिप भुमकर (रा. राजुर) आणि आशिष डोलतानी (रा. बु-हानपूर, मध्यप्रदेश) यांना आरोपी करण्यात आले आहे.

जिल्ह्यात गुटख्याचा एवढा मोठा साठा येतो कुठून?

जालना जिल्ह्यात यापूर्वीही पोलिसांनी अनेकदा मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. मात्र प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात माल पकडला जात असताना हा गुटखा नेमका कुठून येतो, कोण पुरवठा करतो, वाहतुकीचे जाळे कोण चालवते आणि जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत हा माल कोण पोहोचवतो, हा प्रश्न कायम आहे.

राजुर येथे तब्बल ९५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळणे ही साधी घटना नसून त्यामागे मोठे पुरवठा जाळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी केवळ गुटखा जप्त करून प्रकरण थांबवू नये, तर या मालाचा मूळ पुरवठादार, मुख्य सूत्रधार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांपर्यंत तपासाची साखळी पोहोचवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

‘मुळापर्यंत’ तपासाची गरज

गुटख्याची वाहतूक करणारे वाहनचालक किंवा स्थानिक पातळीवरील व्यक्तींवर कारवाई झाल्यानंतरही जर मुख्य पुरवठादार मोकाट राहत असतील, तर अवैध गुटख्याची साखळी पूर्णपणे थांबणार कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेषतः मध्यप्रदेशाशी संबंधित आरोपीचा सहभाग समोर आल्याने या प्रकरणातील गुटख्याचा पुरवठा आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य पातळीवरून होत आहे का, याचाही तपास होणे आवश्यक आहे. जप्त केलेल्या वाहनांची कागदपत्रे, मोबाईल संपर्क, आर्थिक व्यवहार, माल कुठून लोड करण्यात आला आणि तो पुढे कुठे वितरित होणार होता, याचा तपास केल्यास या नेटवर्कमधील मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

अन्न व औषध प्रशासनाचाही सहभाग

या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभाग, जालना यांचाही सहभाग होता. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि नमुना तपासणी याकडेही लक्ष लागले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पथक प्रमुख सपोनि अविनाश गडाख, हसनाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेश उवाळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

कारवाई मोठी; आता तपास किती मोठा?

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मोठ्या गुटखा कारवायांपैकी ही एक कारवाई मानली जात आहे. १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्याचे पोलिसांचे यश निश्चितच महत्त्वाचे आहे; मात्र खरी कसोटी आता तपासाची आहे.

या गुटख्याचा मूळ स्रोत कोणता? मुख्य पुरवठादार कोण? जिल्ह्यातील कोणत्या भागात माल पोहोचवला जाणार होता? या व्यवसायातून कोण आर्थिक फायदा घेत आहे? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.

गुटखा पकडला जातो, साठा जप्त होतो, आरोपी ताब्यात घेतले जातात; पण या अवैध धंद्याची मुळे जर कायम राहिली, तर कारवायांनंतरही गुटख्याचा पुरवठा सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजुर प्रकरणाच्या निमित्ताने पोलीस प्रशासन या अवैध गुटखा साखळीच्या मुळापर्यंत पोहोचणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लखन तुरे हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींना घाणेवाडी शिवारातून अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून लखन तुरे यांच्यासोबत चौघांचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. चौघांनी लखन तुरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यासोबतच सिमेंटच्या गट्टूने गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात लखन तुरे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच दि. ७ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मारहाणीच्या घटनेचे रूपांतर हत्या प्रकरणात झाले.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावपळ
घटनेनंतर प्रकरणातील शुभम काकासाहेब जोगदंड आणि किशोर देवीदास जोगदंड हे दोघे जालना शहरातून पसार झाले होते. आरोपी फरार झाल्याने पोलिसांसमोर त्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी यांनी आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना चंदनझिरा पोलिसांना दिल्या. त्यानुसार चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी आरोपींच्या मागावर राहून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविली. आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वारंवार ठिकाणे बदलत असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व शिर्डी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, बीड जिल्ह्यातील गेवराई, तसेच जालना जिल्ह्यातील अंबड आदी विविध ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घ्यावा लागला.
घानेवाडी शिवारात सापळा
दरम्यान, दि. ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना शुभम जोगदंड आणि किशोर जोगदंड हे राजूर रोडवरील घानेवाडी शिवारातील एका शेतात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांच्या पथकाने कोणताही विलंब न करता घानेवाडी शिवार गाठले. परिसराची पाहणी करून पोलिसांनी शेताभोवती सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शुभम काकासाहेब जोगदंड आणि किशोर देवीदास जोगदंड या दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या हत्या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. फरार असलेल्या उर्वरित दोन आरोपींनाही अटक झाल्याने आता या गुन्ह्यातील चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत पोलिसांकडून हत्येच्या घटनेमागील नेमके कारण, पैशांच्या देवाणघेवाणीचा वाद कशामुळे झाला, हल्ल्यात कोणाची कोणती भूमिका होती, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तू व इतर बाबींचा तपास केला जाणार आहे.
पैशांच्या व्यवहारातून वादाचे पर्यवसान हत्येत
प्राथमिक तपासात पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून लखन तुरे यांच्यावर हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, या वादामागील नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि हल्ल्याचे कारण काय होते, याचा सखोल तपास चंदनझिरा पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सलग तीन दिवस विविध जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबवून अखेर त्यांना जालना शहराजवळील घानेवाडी शिवारातून अटक केल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बिडवे करीत आहेत.

भररात्रीच्या खुनातील मुख्य आरोपीला अवघ्या १२ तासांत बेड्या
दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास झिरो पॉईंट परिसरात निखील पवार याच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या निखीलचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताचा नातेवाईक श्याम पवार यांच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तेगबीरसिंह संधु आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी यांनी आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी आणि चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला वेग दिला. घटनास्थळाची पाहणी, उपलब्ध माहितीचे संकलन, तांत्रिक तपास तसेच गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला.
पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर मुख्य आरोपी संतोष ऊर्फ पिंट्या हरीभाऊ लांडे याचा ठावठिकाणा शोधून काढण्यात आला आणि घटनेनंतर अवघ्या १२ तासांत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
२९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास दि. २९ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे. या खून प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी करीत आहेत.
तणावपूर्ण परिस्थितीत पोलिसांचे संयमाने व्यवस्थापन
खुनाच्या घटनेनंतर झिरो पॉईंट परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चंदनझिरा पोलिसांनी अतिरिक्त दक्षता घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. पोलिसांच्या संयमी आणि कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश आले.
खुनाच्या गुन्ह्याचा वेगाने तपास करून मुख्य आरोपीला काही तासांतच अटक केल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. गुन्हा करून फरार झालेला आरोपी कितीही लपण्याचा प्रयत्न करीत असला, तरी कायद्याच्या कचाट्यातून त्याची सुटका होऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
झिरो पॉईंट परिसरातील अतिक्रमणांवरही संयुक्त कारवाई
दरम्यान, खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर झिरो पॉईंट परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शासकीय मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून हॉटेल, टपऱ्या तसेच विविध अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. त्यामुळे परिसरात गर्दी वाढून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर वाढण्यासह वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता.
या परिस्थितीमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही वाढली होती. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई केली.
या कारवाईत झिरो पॉईंट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे, हॉटेल, टपऱ्या आणि इतर अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. त्यामुळे परिसर मोकळा होऊन वाहतुकीतील अडथळे दूर होण्यास तसेच भविष्यातील अनुचित प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तेगबीरसिंह संधु, अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरण बिडवे, पोउपनि दिगंबर पवार, निता दामधर, पोउपनि सय्यद अफसर, मारीयो स्कॉट, सफौ राजेंद्र ठाकूर, पोहेकॉ प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजू पवार, अभिजीत वायकोस, मदन बहुरे, विशाल लोखंडे, शरद पवार, संतोष वनवे, पोकॉ सागर खैरे, नवनाथ पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोउपनि पवन राजपूत, पोहेकॉ हारुण पठाण यांच्या पथकाने केली.
मुख्य आरोपीला अवघ्या १२ तासांत अटक करण्याबरोबरच तणावपूर्ण परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि झिरो पॉईंट परिसरातील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई करणे, या तिन्ही आघाड्यांवर चंदनझिरा पोलिसांनी केलेली कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे.

घरफोडीसाठी मोटारसायकली, कटर, तलवारीचा वापर; घरफोडीच्या चार गुन्ह्यांतील फरार आरोपी जेरबंद;
विजयसिंग कृष्णासिंग भादा (वय ४३, रा. वलीमामुदर्गा, जालना) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या चार गुन्ह्यांमध्ये गुन्हा घडल्यापासून फरार होता.

दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदर बाजार पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आरोपींचा शोध आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस निरीक्षक संदीप भारती यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी विजयसिंग भादा हा वलीमामुदर्गा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिस पथकाने दोन पंचांसह परिसरात शोध घेतला. पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपी लाल रंगाच्या मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने मंठा चौफुली परिसरातून आकाशी रंगाची शाईन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. ही मोटारसायकल पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जप्त केली. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

आरोपीने घरफोडीचे गुन्हे करताना वापरलेल्या दोन मोटारसायकली, एक धारदार तलवार, चोरी करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर, ग्राइंडर मशीन आणि विद्युत कटर मशीन असा एकूण १ लाख ६७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात घरफोडीचे चार गुन्हे दाखल असून, त्यातील कलमांनुसार त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील सचिन सानप, जगन्नाथ कानडजे, तानाजी कानुरे, जगन्नाथ जाधव, भगवान मुंजाळ, दुर्गेश गोफणे, अजीम शेख, राहुल कटकम, संदीप गोतीस, धनाजी लोंढे आणि मगरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

गावठी पिस्टल, रिव्हॉल्व्हर व दोन तलवारींसह तीन आरोपी जेरबंद
जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी पथकाला मार्गदर्शन करून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम राबविली.
खरपुडी येथे गावठी पिस्टल जप्त
दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत असताना, प्रथमेश बालाजी कदम (वय १९, रा. खरपुडी, जालना) याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्टल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी खरपुडी येथे कारवाई करून प्रथमेश कदम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाणे, जालना येथे भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ३, ५ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसस्थानकासमोर रिव्हॉल्व्हरसह तरुण ताब्यात
त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत राजेश दिपक पांजगे (वय २४, रा. मधुबन कॉलनी, जालना) हा देशी रिव्हॉल्व्हर बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना शहरातील बसस्थानकासमोरील रस्त्यावर त्याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचे एक देशी रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ख्रिस्ती कॅम्प परिसरात दोन तलवारी जप्त
तिसऱ्या कारवाईत पवन बबन कसबे (वय २३, रा. ख्रिस्ती कॅम्प, जालना) हा धारदार व तीक्ष्ण तलवारी बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी ख्रिस्ती कॅम्प परिसरात कारवाई करून पवन कसबे याला ताब्यात घेतले.
त्याच्या राहत्या घरातून तीन हजार रुपये किमतीच्या दोन धारदार व तीक्ष्ण तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५८ हजारांचा मुद्देमाल जप्त
या तीनही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ३५ हजार रुपयांचे गावठी पिस्टल, २० हजार रुपयांचा देशी रिव्हॉल्व्हर आणि तीन हजार रुपये किमतीच्या दोन धारदार तलवारींचा समावेश आहे.
जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने कारवाई केली जात असून, आगामी काळातही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, सॅम्युअल कांबळे, गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, आक्रूर धांडगे, शिवप्रसाद एंखडे, बाबासाहेब गायकवाड, रमेश काळे, योगेश सहाने, धीरज भोसले, सोपान क्षीरसागर, रेणुका बांडे आणि अरुणा गायकवाड यांनी ही कारवाई केली.

अवैध शस्त्र बाळगणारे दोन तरुण जेरबंद; दोन तलवारी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती.
माहिती मिळताच पोलिसांची कारवाई
दि. १८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना रोहित दिनेश राजपुत (वय १९, रा. ओम शांती गल्ली, संभाजी नगर, जालना) याच्याकडे तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो संभाजी नगर परिसरातील त्याच्या राहत्या घरी आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून १ हजार ५०० रुपये किमतीची एक तलवार जप्त करण्यात आली.
मित्राकडेही आढळली तलवार
रोहित राजपुत याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याचा मित्र आदित्य सुरेश सोळंके (वय २०, रा. तीन मंदिर गल्ली, संभाजी नगर, जालना) याच्याकडेही तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी आदित्य सोळंके याचा शोध घेतला असता तो स्वामी समर्थ वेल्डिंग दुकान, सागर गल्ली, भोकरदन नाका परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे तलवारीबाबत चौकशी केली असता त्याने दुकानातून तलवार काढून दिली. पोलिसांनी १ हजार रुपये किमतीची एक तलवार जप्त केली.
अशाप्रकारे दोन्ही आरोपींकडून एकूण २ हजार ५०० रुपये किमतीच्या दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.
दोन्ही आरोपी सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात
दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, शिवप्रसाद एंखडे, बाबासाहेब गायकवाड, कैलास चेके, योगेश सहाने, सागर बाविस्कर आणि दत्ता वाघुंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
जालना शहरासह जिल्ह्यात अवैध शस्त्रांचा वापर करून अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून अशा व्यक्तींवर लक्ष ठेवून सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

रेवगाव रोडवर दोन गावठी पिस्तुलांसह तरुण जेरबंद;
जालना जिल्ह्यात अवैधरीत्या शस्त्रे बाळगणार्‍या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांचा शोध सुरू करण्यात आला.

दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्र बाळगणार्‍या व्यक्तींचा शोध घेत असताना सुमित ऊर्फ गोल्या राजू भुरे हा दोन गावठी पिस्तुले घेऊन रेवगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात शोधमोहीम सुरू केली.
पोलिसांनी कलश सिड्स बीएसएस फार्मसमोरील रस्ता, रेवगाव रोड, जालना येथे शोध घेतला असता संशयित सुमित भुरे हा आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी बनावटीची पिस्तुले आढळून आली.
पोलिसांनी दोन्ही पिस्तुले जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची एकूण किंमत 80 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीविरुद्ध जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीकडे ही शस्त्रे कुठून आली, त्याने ती कोणाकडून घेतली, शस्त्रे बाळगण्यामागील उद्देश काय होता तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि जालना उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, देविदास भोजने, आक्रुर धांडगे आणि बाबा गायकवाड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
जालना जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे शस्त्र बाळगणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. आगामी काळातही अशा व्यक्तींविरोधात कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

चंदनझिरा पोलिसांची धडक कारवाई; ४१ घातक हत्यारे जप्त
जालना शहरात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर व धोरणात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
चंदनझिरा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांना रेकॉर्डवरील तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
संशयास्पद हालचालींवरून पोलिसांचा तपास
या कारवाईदरम्यान पोलिसांच्या निगराणीखाली असलेला रेकॉर्डवरील आरोपी शेख माजेद शेख लतिफ (वय २३, रा. राबिया मशीदच्या मागे, डायमंड हॉलजवळ, सुंदरनगर, चंदनझिरा) याच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यामार्फत त्याच्याबाबत माहिती मिळवून सखोल तपास व पाठपुरावा केला.
शेख माजेद हा त्याच्या राहत्या घरात धारदार तलवारी, खंजीर आणि चॉपर बाळगून असून, ही हत्यारे जालना शहरात गंभीर गुन्हे करण्यासाठी तसेच दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने इतरांना विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे नियोजन केले.
घरावर छापा; ४१ घातक हत्यारे हस्तगत
९ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह सुंदरनगर परिसरातील शेख माजेद याच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता पोलिसांना मोठ्या प्रमाणात धारदार हत्यारे आढळून आली.
या कारवाईत २२ धारदार तलवारी, १५ धारदार खंजीर आणि ४ धारदार चॉपर, अशी एकूण ४१ घातक हत्यारे जप्त करण्यात आली. या हत्यारांची अंदाजे किंमत १ लाख ३४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी शेख माजेद शेख लतिफ याला अटक करण्यात आली असून, त्याला १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हत्यारे नेमकी कोठून आणण्यात आली, ती कोणाकडून खरेदी करण्यात आली तसेच यापूर्वी कोणकोणाला विक्री करण्यात आली, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
साथीदाराचा शोध सुरू
या प्रकरणात इम्राण ऊर्फ इम्मा सलीम शेख (रा. इंदिरानगर, जालना) याचा सहभाग असल्याचे समोर आले असून, त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. जप्त केलेली हत्यारे कोणत्या उद्देशाने साठविण्यात आली होती आणि त्यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे. तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
पोलिसांच्या माहितीनुसार, शेख माजेद शेख लतिफ आणि इम्राण ऊर्फ इम्मा सलीम शेख हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध जालना शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, गंभीर दुखापत, दंगा, अवैध शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे करताना आरोपी संघटितपणे एकत्र येत असल्याचे तपासात समोर आल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ अन्वयेही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शेख माजेदविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे
शेख माजेद शेख लतिफ याच्याविरुद्ध सदर बाजार व कदीम जालना पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दंगल, मारामारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घरात घुसून मारहाण, महिलेशी संबंधित गुन्हा, गंभीर दुखापत तसेच अवैध शस्त्र बाळगण्यासंबंधीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
कदीम जालना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुरनं. ४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
इम्राणविरुद्धही गंभीर गुन्ह्यांची नोंद
इम्राण ऊर्फ इम्मा सलीम शेख याच्याविरुद्ध कदीम जालना, सदर बाजार आणि चंदनझिरा पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, खून, गंभीर दुखापत, मारामारी, दंगा तसेच अवैध शस्त्र बाळगणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
सदर बाजार पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुरनं. ५४४/२०२३, कलम ३०२ भादंवि अन्वये खुनाचा गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे. तसेच चंदनझिरा पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गुरनं. १२४/२०२१, कलम ३२६, ३२३, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने, सफौ राजेंद्र ठाकूर, पोहेकॉ प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजीत वायकोस, शरद पवार, मदन बहुरे, विजय बहुरे, राजेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पगार, सागर खैरे, नवनाथ पाटील तसेच महिला पोलीस मधु जयाती यांनी केली.
चंदनझिरा पोलिसांच्या या कारवाईमुळे जालना शहरात अवैधरीत्या घातक शस्त्रांचा साठा करून त्यांची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा तपास पुढे कोणते धागेदोरे उघड करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा उच्छाद; उघड्यावर दारु पिण्याचा प्रकार सुरु;
या ठिकाणी सायंकाळनंतर मोठ्या संख्येने मद्यपी एकत्र येत असल्याचे सांगण्यात येते. मद्यप्राशन केल्यानंतर काही जण मोठमोठ्याने शिवीगाळ करत असल्याने परिसरातील नागरिक, महिला तसेच ये-जा करणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे मद्यप्राशन सुरू असतानाही संबंधितांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे अंबड चौफुली हा शहरातील वर्दळीचा परिसर असून या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मोकळ्या जागेचा तसेच रस्त्यालगतच्या परिसराचा मद्यप्राशनासाठी वापर होत असल्याने भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सार्वजनिक ठिकाणी दारू पिणार्‍यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस तसेच दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाची आहे. त्यामुळे कदीम जालना पोलीस ठाणे आणि संबंधित उत्पादन शुल्क विभागाने या परिसरात नियमित गस्त वाढवून सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मद्यपींच्या वाढत्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि संबंधितांवर कारवाई कधी होणार, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जाफ्राबादमध्ये प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याचा मोठा साठा जप्त;
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तेगबीर सिंह संधू व अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी यांच्या अवैध धंद्यांविरोधातील कठोर निर्देशांनुसार करण्यात आली. दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी अपर पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जाफ्राबाद शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रजवळील एका गाळ्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती.
यानंतर अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने पोलीस ठाणे जाफ्राबाद येथील अधिकाऱ्यांसह छापा टाकला. या कारवाईदरम्यान शेख जुबेर शेख आमिन (रा. निमखेडा रोड, जाफ्राबाद) याच्या मालकीच्या गाळ्यावरून विविध कंपन्यांचे प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये Premium ZN-01 जाफरानी जर्दा, Premium राजनिवास सुगंधित पान मसाला, गोवा 1000, V-1 Tobacco, केशरयुक्त विमल पान मसाला (बिग पॅक), विमल पान मसाला, तसेच हिरा पान मसाला आदी विविध ब्रँडच्या एकूण हजारो पुड्यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ६ लाख ४१ हजार ८५० रुपये इतकी आहे.
संपूर्ण मुद्देमाल दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या पदार्थांची तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी प्रकरण अन्न व औषध प्रशासन, जालना यांच्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एस. जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ, पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे, प्रवीण सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल गायकवाड, प्रताप सुंदरडे, मस्के, भागिले व घुशिंगे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे जाफ्राबाद शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा अवैध व्यवसायांवर पोलीस प्रशासनाची कठोर नजर कायम राहणार असल्याचे संकेत या धडक कारवाईतून मिळाले आहेत.

चंदनझिरा परिसरात खंजीर बाळगून दहशत माजविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई;
चंदनझिरा पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व दहशत पसरविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. ३ ऑगस्ट २०२६) रोजी दुपारी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना गुप्त माहिती मिळाली की, चंदनझिरा येथील रोहीदास मंदिर परिसरात एक व्यक्ती हातात धारदार खंजीर घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. माहितीची खातरजमा करून तात्काळ पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले.

दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास रोहीदास मंदिराजवळील रस्त्यावर पोलिसांना सचिन परमेश्वर खरात (वय २६, रा. अशोक चौक, चंदनझिरा, जालना) हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी धारदार खंजीर जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मारीयो स्कॉट यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक मारीयो स्कॉट, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पवार, कृष्णा तंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर खैरे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

चंदनझिरा परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणारे, दहशत माजविणारे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध अशाच प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

एमआयडीसी परिसरातील जबरी लूटप्रकरणाचा छडा;
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलै 2026 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कंपनीतील ड्युटी संपवून स्कुटीवरून घरी जाणार्‍या सुपरवायझरला अडवून आरोपींनी त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर रोख रक्कम, मित्रांकडून ऑनलाइन पद्धतीने मागवलेले पैसे तसेच अन्य साहित्य असा एकूण 62 हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटला. याप्रकरणी 30 जुलै रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. यामध्ये सचिन कैलास गायकवाड उर्फ रावण (वय 23, रा. एकता चौक, चंदनझिरा), राणोबा उर्फ राणा भिकाजी तरकसे (वय 27, रा. कक्रेयानगर, जालना) आणि करण कृष्णा पवार (वय 25, रा. सिस्टी काळेगाव, ता. जालना) यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून लुटीतील 12 हजार 300 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली एमएच-21 एव्ही-6386 क्रमांकाची स्कुटी, मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच फिर्यादीच्या मित्रांकडून ऑनलाइन व्यवहाराद्वारे आरोपींच्या खात्यावर जमा झालेल्या 30 हजार रुपयांची रक्कम गोठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात मुख्य आरोपी सचिन गायकवाड हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्याच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा, लूटमार, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आदी स्वरूपाचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. तर राणोबा उर्फ राणा तरकसे याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहायक फौजदार मनसुख वेताळ, कृष्णा शिंदे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, संदीप उगले, सुभाष नागरे, शिवानंद जायभाये आणि त्यांच्या पथकाने केली.