क्रीडा - Shubh Prabhat

श्रीगोंद्यात राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत किंग इंग्लिश स्कूलचा दैदीप्यमान यश; प्रणिती गुंजाळ प्रथम
प्रथम क्रमांक पटकावलेल्या प्रणिती गुंजाळ हिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. या यशामागे मार्गदर्शक अशोक शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.
या यशाबद्दल किंग इंग्लिश स्कूलचे शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही प्रणिती गुंजाळ उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

जालना फन रनर अँड रोट्रॅक्ट क्लबच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महिला धावपटूची दमदार कामगिरी; अलका धांडेंचा दुसरा क्रमांक
जालना फन रनर अँड रो ट्रॅक्ट क्लबच्या वतीने आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेत पंचेचाळीस वर्ष वयोगटात सहभागी झालेल्या अलका धांडे या महिला धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आज केवळ पदक प्रदान करण्यात आले असून रोख बक्षिसाची रक्कम संबंधितांकडून नंतर देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
ही हाफ मॅरेथॉन स्पर्धा विविध वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली होती. पंचेचाळीस वयोगटात धाव घेतलेल्या या अनुभवी महिला धावपटू गेल्या सात ते आठ वर्षांपासून नियमितपणे धावण्याचा सराव करत आहेत. कोणतीही स्पर्धा असो, त्या सातत्याने सहभागी होत असून दरवर्षी मॅरेथॉनमध्ये धाव घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील वर्षी याच स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाही त्यांनी उत्तम कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली. विशेष म्हणजे, कर्तव्य बजावत असतानाही आपला छंद त्यांनी जपला असून दररोज नियमितपणे धावण्याचा सराव करत असल्याचे त्यांनी नमूद केले. जालना शहरात धावण्याच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरत असून नवोदित धावपटूंना प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आयोजक संस्थेच्या वतीने भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जालना स्केटिंग असोसिएशन आणि फाल्कन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव
जालना स्केटिंग असोसिएशन आणि फाल्कन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जालना जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विद्यार्थ्यांची नावे नोंदविण्यात आली असून, या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम जालना स्केटिंग असोसिएशन आणि इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे कौतुक केले. तसेच अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवे बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष अमजद पठाण, सचिव नितीन राठोड, फाल्कन इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका मुबाशिरा अनिस सलाट, मुख्याध्यापिका श्रीमती नंदनी, तसेच शेख अमीर आणि विष्णू पिंढारकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद करून जिल्ह्याचा मान वाढविणार्‍या खेळाडूंमध्ये आरिश आमेर अहमद शेख, अलिझा मरियम शेख बशीर, विआन मनोज जिंदल, जयवर्धन नितीन राठोड, जरमिया मनोज कसबे, शिवराज अनिल खतडे, कामरान निसार सय्यद, यश रुपेश बोरुंदिया आणि वेद अंकुश राठोड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक निशा सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनती आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन दिले. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, सन्मान आणि अभिमानाच्या वातावरणात पार पडला.

तायक्वांदोने जिल्ह्याच्या खेळ संस्कृतीला नवी दिशा दिली-विष्णू पाचफुले यांचे प्रतिपादन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व तायक्वांदो असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेला जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील 65 हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत दमदार सहभाग नोंदविला.

या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे, मराठा महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक पडुळ, जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी व तायक्वांदो असोसिएशनचे महासचिव सचिन आर्य, क्रीडा प्रशिक्षक आश्विन जोगदंड, सिद्धार्थ कदम, फईम खान यांची उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी बोलताना विष्णू पाचफुले म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात तायक्वांदो हा खेळ लोकांना फारसा माहीत नव्हता. मात्र, आज या खेळाला जगभर लोकप्रियता मिळाली असून, जिल्ह्यातही स्पर्धा आयोजित होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. अशा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छाशक्ती व हिम्मत लागते. ती कुणी देत नाही; ती प्रत्येक खेळाडू स्वतः घडवतो. अशा छोट्या पातळीवरून पुढे जाताना खेळाडू मोठ्या पातळीवर आपला ठसा उमटवू शकतात व जिल्ह्याचा नावलौकिक वाढवू शकतात.

प्रास्ताविकपर भाषणात अरविंद देशमुख म्हणाले की, तायक्वांदो हा फक्त क्रीडा प्रकार नसून शिस्त, आत्मविश्वास व शारीरिक तंदुरुस्ती घडविण्याचा उत्तम मार्ग आहे. जालन्यातील तरुणांनी या खेळातून घडविलेली कामगिरी प्रेरणादायी आहे. पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जालन्यातील खेळाडू आपला ठसा उमटवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सय्यद निसार, राहुल ढाकणे, राहुल गायके, स्पर्धेचे पंच म्हणून जबाबदारी पार पाडणारे मयूर पिवळ, सचिन गादेवाड, ज्ञानेश्वर मोरे, भागवत गोरे, आदित्य चव्हाण, हरीश खराबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

जालना येथे पार पडली 'मान्सून अंडर-१४ क्रिकेट लीग २०२५
जालना, (दिनांक: ०९ ऑगस्ट, २०२५) – जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालना आणि साई काणे क्रिकेट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दानकुवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर 'मान्सून अंडर-१४ क्रिकेट लीग २०२५' यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत जालना शहरातील पाच युवा संघांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचे आयोजन लीग पद्धतीने करण्यात आले होते. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेच्या शेवटी, स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना 'बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट' आणि 'बॉलर ऑफ द टूर्नामेंट' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

https://youtu.be/xNjtfj7CUoY?si=vuuj8e7fnoVFP9Gd

यात बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट' कान्हा उपाध्याय यास तर बॉलर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्काराने साद शेख यास गौरविण्यात आले.

या समारंभासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र देशपांडे, खजिनदार ॲडव्होकेट श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स मेंबर व टूर्नामेंट कमिटीचे सेक्रेटरी राजू काणे आणि जॉईंट सेक्रेटरी अभिजीत चव्हाण तसेच संतोष भारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जालना जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक युवा क्रिकेटपटू आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेमुळे जालना जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची एक चांगली संधी मिळाली.

जडेजा-वॉशिंग्टनची शतकी भागीदारी, इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला! टीम इंडिया आघाडीवर
रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या ऑलराउंडर जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागादारी करत इंग्लंडची 311 धावांची आघाडी मोडीत काढली आहे. टीम इंडियाने यासह दुसऱ्या डावात आघाडी घेतली आहे. भारताने मँचेस्टरमध्ये चौथ्या कसोटीतील पाचव्या आणि अंतिम दिवशी चहापानापर्यंत 118 ओव्हरमध्ये 322 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने अशाप्रकारे 11 धावांची आघाडी घेत इंग्लंडला विजयापासून दूर केलं आहे. तसेच इंग्लंडचा आता डावाने विजय होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. चौथ्या दिवशी भारताच्या निराशाजनक सुरुवातीमुळे डावाने पराभव होण्याची चिन्हं होती. मात्र कर्णधार शुबमन गिल याचं शतक तसेच केएल राहुल, जडेजा आणि सुंदर या त्रिकुटाच्या अर्धशतकामुळे भारताने आपला पराभव टाळला आहे. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहणार, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

https://x.com/BCCI/status/1949482395872190821

इंग्लंडने जो रुट आणि कर्णधार बेन स्टोक्स याच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 669 धावा करत 311 ची आघाडी घेतली. त्यानंतर चौथ्या दिवशी इंग्लंडने भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. त्यामुळे 2 आऊट अशी 0 अशी स्थिती झाली. मात्र कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल या जोडीने भारताला सावरलं. ही जोडी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिली. पाचव्या दिवशी बेन स्टोक्स याने ही जोडी फोडली. शुबमन-केएलने तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. केएलने 90 धावा केल्या.

केएलनंतर वॉशिंग्टन मैदानात आला. शुबमन आणि वॉशिने भारताचा डाव पुढे नेला. या दरम्यान शुबमनने शतक ठोकलं. मात्र त्यानंतर शुबमन आऊट झाला. शुबमनने 103 धावा केल्या. भारताने 222 धावांवर चौथी विकेट गमावली. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने सार्थपणे भारताला सावरलं. या दोघांनी टी ब्रेकपर्यंत नॉट आऊट 100 रन्सची पार्टनरशीप केली. दोघांनी या दरम्यान वैयक्तिक अर्धशतकं झळकावली आणि इंग्लंडची आघाडी मोडीत काढली.

जडेजाने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 27 वं तर इंग्लंड विरुद्ध या मालिकेतील पाचवं अर्धशतक झळकावलं. तर सुंदरने पाचवं कसोटी अर्धशतक ठोकलं. टी ब्रेकपर्यंत वॉशिंग्टन सुंदर याने 139 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या. तर रवींद्र जडेजा 102 बॉलवर 53 रन्सवर नॉट आऊट परतला.