राजकारण - Shubh Prabhat

जालन्यात काँग्रेसचे ‘संघटन सृजन’ अभियान सुरू; नव्या नेतृत्वाला संधी मिळणार - खा. डॉ. कल्याण काळे यांची माहिती
या अभियानांतर्गत जिल्हा पातळीपासून बूथ स्तरापर्यंत संघटनात बदल करण्यात येणार असून, दीर्घकाळ एकाच पदावर असलेल्या पदाधिकार्‍यांना बदलून नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पद भूषवलेल्या जिल्हाध्यक्षांच्या जागी नवीन नेतृत्वाची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात पक्षश्रेष्ठींकडून निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून, हे निरीक्षक विविध इच्छुक पदाधिकार्‍यांच्या मुलाखती घेत आहेत. या मुलाखतींनंतर पात्र उमेदवारांची पॅनेल तयार करून ती केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली जाणार आहे. त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

तसेच, बूथ स्तरावर पक्षाचे जाळे मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यावरही भर दिला जात आहे. प्रत्येक गाव, वॉर्ड आणि बूथ पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या पारदर्शक प्रक्रियेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्या नेतृत्वामुळे काँग्रेसला जिल्ह्यात नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अभियान महत्त्वाचे मानले जात आहे.

जालना काँग्रेसमध्ये मोठी कारवाई; पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी 7 नगरसेवक निलंबित
माहितीनुसार, जालना महानगरपालिकेत मंजूर सदस्य नियुक्तीच्या वेळी संबंधित नगरसेवकांनी उघडपणे भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेला धक्का बसल्याचे सांगत काँग्रेसने कडक भूमिका घेत ही कारवाई केली.

निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये फारुख टुंडीवाले, इम्रान खान, फरहाना अन्सारी, सुनील बोर्डे, मयुरी देणे, रुबिना पठाण आणि अनिल तिरखे यांचा समावेश आहे.

राज्याध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहणार आहे. या निर्णयामुळे जालन्यातील राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुबईत हजारो भारतीय अडचणीत, केंद्र सरकार शांत; खासदार डॉ. कल्याण काळेंचा हल्लाबोल
खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले की, ते 27 फेब्रुवारी रोजी मुंबईमार्गे दुबईला गेले होते. 28 फेब्रुवारी रोजी दुबई येथे पोहोचल्यानंतर ते आपल्या परिवारासह तसेच आणखी दोन परिवारांसोबत हॉटेलकडे जात असताना अचानक परिसरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि परतीचा प्रवास होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली.
त्या काळात इराणसंबंधित तणावामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. हजारो भारतीय नागरिक दुबईत अडकले होते. विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आपण आपल्या घरी सुरक्षित परत जाऊ शकू की नाही, अशी भीती अनेकांच्या मनात होती, असेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात आपण तात्काळ केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाला ई-मेल व पत्राद्वारे माहिती दिली होती, मात्र त्यावर साधा प्रतिसादही मिळाला नाही, अशी खंत डॉ. काळे यांनी व्यक्त केली. माझी अपेक्षा होती की केंद्रातील उड्डाणमंत्री किंवा संबंधित मंत्री पत्रकार परिषद घेऊन परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना धीर देतील. किती लोक अडकले आहेत, त्यांना परत आणण्यासाठी विमानांची व्यवस्था कशी केली जाणार आहे, याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक होते. परंतु तसे काही झाले नाही, असे ते म्हणाले.
दुबईतील काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमुळे हॉटेल बुकिंगची मुदत संपलेल्या नागरिकांच्या निवासाची व्यवस्था तेथील प्रशासनाने केली होती. ज्यांची हॉटेलची तारीख संपली होती त्यांचा पुढील खर्च तेथील प्रशासनाने उचलण्याची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.
डॉ. काळे म्हणाले की, आपण राजकीय टीका करण्यासाठी हे बोलत नाही, परंतु परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांशी सरकारने सातत्याने संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून स्पष्ट माहिती आणि मार्गदर्शन मिळाले असते तर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असता.
काही ओळखीच्या व्यक्तींनी स्थानिक पातळीवर मदतीसाठी प्रयत्न केले, मात्र विमानतळ बंद असल्यामुळे परिस्थिती अधिकच कठीण झाली होती. साधारण तीन ते चार दिवसांनंतर हळूहळू विमानसेवा सुरू झाल्यानंतर काही भारतीय नागरिकांना परत येणे शक्य झाले.
दरम्यान, आपल्या सुखरूप परतीसाठी मतदारसंघातील नागरिकांनी केलेल्या प्रार्थना आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल डॉ. कल्याण काळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मातृभूमीत परत आल्यानंतर मला जसा एखाद्या लेकराला आईच्या कुशीत परत आल्यानंतर आनंद होतो तसा आनंद झाला. नागरिकांनी दिलेल्या प्रेमामुळेच या कठीण परिस्थितीत धैर्य मिळाले, असेही त्यांनी सांगितले.
या संपूर्ण घटनेमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने अधिक प्रभावी आणि तत्पर यंत्रणा उभारण्याची गरज असल्याची चर्चा पुन्हा एकदा पुढे आली आहे. तसेच संकटाच्या काळात भारतीय नागरिकांशी थेट संवाद साधण्याची व्यवस्था मजबूत करण्याची मागणीही यानिमित्ताने पुढे येत आहे.

आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश; प्रशासक म्हणून सरपंच पाहणार ग्रामपंचायतीचा कारभार
या मागणीला यश आले असून निवडणुका जाहीर होईपर्यंत सरपंचच प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार असल्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.

पूर्वी अशा परिस्थितीत प्रशासकीय अधिकार्‍यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जात होती. मात्र नव्या निर्णयानुसार संबंधित ग्रामपंचायतींचे विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहतील. त्यांच्यासोबत उपसरपंच व सदस्यांनाही जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या निर्णयामुळे शासनाच्या योजना व निर्णयांची अंमलबजावणी गावपातळीवर प्रभावीपणे होणार असून लाल फितीच्या कारभारामुळे होणारे अडथळे दूर होतील, असे मत अनेक सरपंचांनी व्यक्त केले आहे. गावगाड्याची प्रत्यक्ष जाण असलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत कारभार चालणार असल्याने विकासकामांना चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी आमदार लोणीकर यांचे आभार मानले असून मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. खांडवी वाडीचे सरपंच रमेश भापकर यांनी लोणीकर हे ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले नेतृत्व असल्याचे सांगितले. श्रीष्टी गावचे सरपंच किरण अंभोरे यांनी हा निर्णय ग्रामविकासासाठी योग्य असल्याचे म्हटले.

आष्टी येथील सरपंच शोभा चंद्रकांत मोरे यांनी मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करताना लोणीकरांच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाल्याचे नमूद केले. लोणी गावचे सरपंच गजानन लोणीकर यांनी प्रशासक म्हणून सरपंचांना संधी दिल्याने विकासकामांतील अडथळे दूर होतील, असे सांगितले. अकोली येथील सरपंच पल्लवी ज्ञानेश्वर सोळंके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निर्णयाचे स्वागत करत पुढील निवडणुकीपर्यंत काम करण्याची संधी मिळाल्याचे म्हटले आहे. मंठा तालुक्यातील देवठाणा येथील सरपंच निलावती गणेशराव मोरे यांनी समाधान व्यक्त केले, तर वाघाळा येथील सरपंच सुनील कांगणे यांनी प्रत्यक्ष अनुभव असलेल्या प्रतिनिधींकडे कारभार राहिल्याने ग्रामविकासाला चालना मिळेल, असे मत व्यक्त केले आहे.

खा. डॉ. कल्याण काळे यांची आमरण उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांना भेट; शेतकर्‍यांच्या मागण्यांना पाठिंबा
खा. डॉ. कल्याण काळे यांनी सोमवार दि. 9 फेब्रुवारी, दुपारी 1 वाजता आमरण उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांची भेट घेतली. गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून उपोषणामागील मागण्या जाणून घेतल्या.

यावेळी कारखाना शेतकर्‍यांच्या हितासाठी कसा सुरू होईल, शेतकर्‍यांचे नुकसान कसे भरून काढता येईल आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीची कार्यवाही कशी होईल, याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांची मागणी रास्त असून आपण खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठी उभे असल्याचे आश्वासन खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिले.

त्यानंतर खासदारांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची तात्काळ माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, तसेच उपोषणकर्त्यांच्या वतीने येणार्‍या शिष्टमंडळासोबत मागण्यांवर चर्चा करून मार्ग काढावा, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या.

या भेटीदरम्यान शेतकरी नेते लक्ष्मणरावजी वडले, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष कल्याण दळे, संघर्ष समितीचे अध्यक्ष अंकुश देशमुख, नारायण वाडेकर, लक्ष्मण शिंदे, अशोक उबाळे, राम सावंत, ड. सोपानराव भांजे, उदय देशमुख, राजेंद्र गोरे, चंद्रकांत देशमुख, सुरज यंगटवार, लाला पाटील लकडे, बाबुराव थेटे यांच्यासह अनेक शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याने उपोषणस्थळी आशेचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

जालन्याच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे; उपमहापौरपदी राजेश राऊत यांनी स्वीकारला पदभार
जालना शहराच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. नव्याने स्थापन झालेल्या जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी नगरसेविका वंदना मगरे यांची, तर उपमहापौरपदी नगरसेवक राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली. निवड जाहीर होताच वंदना मगरे यांनी आजच आपल्या महापौर पदाचा कार्यभार स्वीकारला.

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या प्रक्रियेत महापौर पदासाठी वंदना मगरे, तर उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. अन्य कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने दोन्ही पदांवर बिनविरोध निवड निश्चित झाली.

महानगरपालिकेत पार पडलेल्या या विशेष सर्वसाधारण सभेत अधिकृतरीत्या निवडीची घोषणा करण्यात आली. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी कामकाज पाहिले. निवड जाहीर झाल्यानंतर वंदना मगरे यांनी जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून पदभार स्वीकारला, तर राजेश राऊत यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन करण्यात आले.

या विशेष सर्वसाधारण सभेला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भास्कर आबा दानवे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे यांची निवड आणि उपमहापौरपदी राजेश राऊत यांचा पदभार स्वीकारल्याने शहराच्या विकासाच्या दृष्टीने नवे पर्व सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल; कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी एआय कार्यशाळा
सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक गोष्टीतील बारकावे मानवी बुद्धिमत्तेत साठवून ठेवणे आणि ते वेळेवर आठवणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत माहितीचे अचूक विश्लेषण करण्यासाठी ’कृत्रिम बुद्धिमत्ता’ अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. भारतातील संगणक क्रांतीनंतरचा हा सर्वात मोठा बदल असून कृषीप्रधान भारतासाठी एआय तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात एआय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.

कृत्रिम बुध्दीमत्तेद्वारे कृषी तंत्रज्ञानाची प्रगती या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास प्रमुख्य वक्ते म्हणून फाइंडॅबिलिटी सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहुरकर, मॅजिकचे मकरंद कुलकर्णी, रितेश मिश्रा, डॉ.प्रसन्न भोगले यांच्यासह डॉ.मंदार कुलकर्णी, डॉ.दीपक बोरनारे, डॉ.गोपाळ शिंदे, प्रसाद कोकिल, सौरभ कदम, पुजा गोशेर, पी.टी.यशराज, मॅजिकचे व्यवस्थापक डी.एम.राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतीमधील पिकांचे नियोजन, हवामानाचा अंदाज आणि कीड नियंत्रण यासाठी एआय तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरत आहे. मानवी बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत, मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता अमर्याद असून ती अचूक निर्णय प्रक्रियेत मोठी मदत करते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीमधील उत्पादन कसे वाढवता येईल आणि जोखीम कशी कमी करता येईल, यासाठी शेतकर्‍यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

फाइंडॅबिलिटी सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहुरकर म्हणाले, मानवी बुद्धिमत्ता जे सांगू शकत नाही, ते एआय सांगू शकते. शेतीमध्ये विविध ऋतूंमध्ये काढलेली छायाचित्रे हा केवळ डेटा नसून, त्यापासून शिकणारी मशिन भविष्यातील संकटांचा अंदाज देऊ शकते. अन्नाची वाढती मागणी, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारातील चढ-उतार यावर मात करण्यासाठी एआय माहितीचे अचूक विश्लेषण करते. यामुळे पिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या तात्काळ शोधणे शक्य होते. सध्याच्या काळात प्रत्येक गोष्टीतील बारकावे मानवी स्मरणात ठेवणे कठीण झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता ही काळाची गरज बनली आहे. मात्र, आपल्याकडे ’चॅटजीपीटी’लाच एआय समजले जाते, ही चुकीची संकल्पना आहे. वास्तवत: एआय ही कोणतीही जादू नसून ती माहिती विश्लेषणाद्वारे अचूक निर्णय घेण्याचा एक सक्षम पर्याय आहे. तरी कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ’कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या कार्यशाळेतून कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शेतकर्‍यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीमधील उत्पादन कसे वाढवता येईल आणि जोखीम कशी कमी करता येईल, यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मॅजिकचे व्यवस्थापक डी. एम. राठोड यांनी केले. या कार्यक्रमास कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, संशोधक, तज्ज्ञ, शेतकरी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

हतनूर जिल्हा परिषद गटात भाजपचा प्रचार रणसंग्राम; आमदार बबनराव लोणीकरांच्या चार सभांनी वातावरण तापले
या निवडणुकीत जिल्हा परिषद हतनूर सर्कल गटासाठी श्रीमती सौ. मिनाक्षीताई किशोर पवार, पंचायत समिती चापानेर गणासाठी श्रीमती मंदाताई राजीव बोलधने, तर पंचायत समिती हतनूर गणासाठी श्री. संतोष साहेबराव करवंदे हे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून अधिकृतरीत्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तिन्ही उमेदवार भाजपचे अधिकृत उमेदवार असून त्यांची निवडणूक निशाणी कमळ आहे.
प्रचार सभांमध्ये आमदार लोणीकर यांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा, विकासात्मक राजकारण आणि लोककल्याणाचा दृष्टिकोन स्पष्ट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत केंद्र सरकारने राबविलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेत त्यांनी रस्ते, महामार्ग, रेल्वे, जलजीवन मिशन, घरकुल योजना, शेतकरी सन्मान निधी, उज्ज्वला गॅस योजना आणि आयुष्मान भारत आरोग्य योजना यांचा उल्लेख केला. या योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडल्याचे त्यांनी सांगितले.

https://youtu.be/mEpaGf1859U?si=STjC_CU_jkQWXlkJ
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही भाजप सरकारने शेतकरी, महिला, युवक, कष्टकरी, आदिवासी आणि दुर्बल घटकांसाठी राबविलेल्या विविध योजनांवर त्यांनी भर दिला. विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख धोरण हाच भाजपचा मुख्य अजेंडा असल्याचे आमदार लोणीकर यांनी स्पष्ट केले.
हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक अस्मिता या विषयावर बोलताना त्यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा उल्लेख केला. शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिर साकार झाले असून हा प्रत्येक हिंदूसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. देशाच्या सुरक्षेपासून ते विकासापर्यंत भाजप सरकारने घेतलेले निर्णय जनहिताचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषद हतनूर सर्कल गटाच्या उमेदवार श्रीमती सौ. मिनाक्षीताई किशोर पवार या आमदार बबनराव लोणीकर यांच्या कन्या असून, त्या शिक्षण, सामाजिक कार्य आणि लोकसंपर्काच्या माध्यमातून सातत्याने मतदारांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून हतनूर जिल्हा परिषद गटात विकासाभिमुख आणि लोकाभिमुख नेतृत्व मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रचार सभांना भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नेते, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण हतनूर जिल्हा परिषद गटात भाजपच्या प्रचाराला उत्साहाचे वातावरण असून, कमळ निशाणीला मोठे पाठबळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

परतूर नगर परिषद निवडणुक अपडेट
परतुर सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पार पडत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी सकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत सरासरी 8.59 टक्केमत झाल्याची माहिती

अब्दुल रशीद पहेलवान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
जालना येथील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आणि कुशल राजकारणी श्री अब्दुल रशीद पहेलवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील दादर येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात त्यांनी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

श्री पहेलवान हे 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जालना शहर-जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच ते दोन वेळा नगरसेवक, माजी नगर परिषद सभापती राहिले असून 2014 च्या जालना विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत ते अल्प मतांनी पराभूत झाले होते.

मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ, खासदार डॉ. कल्याण काळे, राष्ट्रीय सचिव श्री बी. एम. संदीप, विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार, जालना जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ देशमुख, आमदार श्री अमीन पटेल, आमदार श्री साजिद खान, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष श्री वजाहत मिर्जा, प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेंद्र राख, श्री एम. एम. शेख, श्री कल्याण दळे, ज्येष्ठ नेते श्री इब्राहिम भाईजान, माजी मंत्री श्री अनीस अहमद, प्रदेश सचिव श्री राम कुरहाडे, तसेच स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी श्री अब्दुल रशीद पहेलवान म्हणाले, काँग्रेस पक्षाचे सर्वसमावेशक, लोकशाहीवादी आणि जनकेंद्रित धोरण माझ्या विचारांशी सुसंगत आहे. मागासवर्गीय, दलित, महिला, अल्पसंख्याक, युवक आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी मी काँग्रेसमध्ये आलो आहे. हा माझ्या राजकीय प्रवासाचा नवा अध्याय आहे.

या कार्यक्रमाला जालना शहरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये श्री वसंत शिंदे, श्री मुफस्सिर कुरैशी, श्री उमर शेख, श्री ज्ञानेश्वर जोगदंड, श्री शाबाज अंसारी, श्री शेख मसूद, श्री आकाश चौधरी, श्री जफर बॉन्ड, श्री सैफ अंसारी, श्री आवेज खान, श्री शाम जाधव, श्री मुकेश शाह, श्री सोहेल काजी, श्री माजिद खान, श्री सय्यद असीम, श्री शेख समद, श्री शेख सलीम, श्री सुभाष खरात यांचा समावेश होता.

शहराध्यक्ष श्री अतिक खान यांनी या प्रवेशाचे स्वागत करताना सांगितले की, श्री अब्दुल रशीद पहेलवान यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे जालना शहर काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल.

Raj Thackeray: पुन्हा राज गर्जना! मनसेचा रविवारी मुंबईत मेळावा, राज ठाकरे करणार मार्गदर्शन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे. मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवार 27 जुलै रोजी पार पपडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्याला उपस्थितीत राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी 5 वाजता मेळावा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मनसेच्या या मेळाव्याला मनसेचे नेते, सरचिटणीस तसेच मुंबईतील विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, मुंबईतील सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मनसेच्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ज्या कमकुवत बाजू असतील त्या दुरुस्त करण्याचे काम केले जाणार आहे. याबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.