नांदेड - Shubh Prabhat

हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छतेची रेल्वेकडून दखल
हुजूर साहिब नांदेड हे शहराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार तसेच प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने स्थानक परिसराची स्वच्छता आणि चांगली प्रतिमा राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ज्या ठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे ती ठिकाणे रेल्वेच्या अधिकारक्षेत्राबाहेर असून संबंधित नागरी प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात येतात, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. मात्र प्रवासी व नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिका प्रशासनाशी रेल्वे अधिकार्‍यांचा सातत्याने समन्वय सुरू असून तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत तसेच नियमित स्वच्छता राखण्याबाबत पाठपुरावा केला जात आहे.

स्थानक परिसरातील हॉटेल्स, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे तसेच कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर प्रभावित भाग रेल्वे हद्दीबाहेर असल्याने कचरा टाकणार्‍या व्यक्तींवर रेल्वेकडून थेट दंडात्मक कारवाई करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र परिस्थितीत तातडीने सुधारणा व्हावी यासाठी संबंधित स्थानिक प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

वंदे भारत व जनशताब्दी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; 3 मेपासून सुधारित वेळापत्रक लागू होणार
गाडी क्र. 20705 (हजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ही 3 मे 2026 पासून सुधारित वेळेनुसार धावेल. नांदेड येथून सुटण्याची वेळ सकाळी 05:00 ऐवजी 05:20 करण्यात आली आहे. परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आदी स्थानकांवरील आगमन व प्रस्थान वेळेत काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमनाची वेळ 14:25 ऐवजी 14:15 अशी सुधारित करण्यात आली आहे.

गाडी क्र. 20706 (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - हजूर साहिब नांदेड) हीदेखील 3 मे 2026 पासून नव्या वेळेनुसार धावेल. मुंबई येथून सुटण्याची वेळ 13:10 ऐवजी 13:15 करण्यात आली आहे. मार्गातील प्रमुख स्थानकांवरील वेळेत बदल करण्यात आला असून एकूण प्रवास कालावधीत सुमारे 30 मिनिटांची बचत होणार आहे.

या बदलानुसार इतर काही गाड्यांच्या वेळापत्रकातही सुधारणा करण्यात आली आहे. गाडी क्र. 17663 रायचूर - परभणी ही परभणी येथे 06:40 ऐवजी 06:55 वाजता पोहोचेल. गाडी क्र. 17688 धर्माबाद - मनमाड (मराठवाडा) ही मनमाड येथे 13 :25 ऐवजी 13:40 वाजता पोहोचेल.

तसेच गाडी क्र. 12072 हिंगोली - मुंबई जनशताब्दी गाडी हिंगोली येथून 04:20 ऐवजी 04:15 वाजता सुटेल. बसमत, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर आणि जालना स्थानकांवरीील वेळेत प्रत्येकी काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. जालना येथे आगमनाची वेळ 08:28 ऐवजी 08:23 अशी करण्यात आली आहे.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रकाची खातरजमा करूनच नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. नवीन वेळापत्रक दिनांक 3 मे 2026 पासून प्रभावी होणार आहे.

रेल्वे संरक्षण दल नांदेड विभागाची धडक कारवाई; ‘नन्हे फरिश्ते’ व ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेत मोठे यश
जालना रेल्वे स्थानकावर सचखंड एक्सप्रेस आल्यानंतर एक अल्पवयीन मुलगा एकट्याने प्रवास करताना संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यास तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्याने घरी न सांगता बाहेर पडल्याचे सांगितले. त्याचा मोठा भाऊ छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असल्याचे समोर आले. संबंधित कुटुंबाशी संपर्क साधून बालकल्याण समितीच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात आली. या कारवाईमुळे अल्पवयीन मुलाची सुरक्षित सुटका झाली.
दरम्यान, परभणी येथे एका प्रवाशाचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीस संयुक्त पथकाने पकडले. त्यास पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

तसेच नांदेड येथे दरोडा प्रकरणातील फरार आरोपीस अटक करण्यात आली. त्याने एका प्रवाशाकडून सोन्याची साखळी, भ्रमणध्वनी संच व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 8 हजार 999 रुपयांचा ऐवज लुटल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलिस कोठडी मंजूर केली असून तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर सवयीच्या पाकीटमारास पकडून त्याच्याकडील 10 हजार 300 रुपये रोख जप्त करण्यात आले. संबंधित प्रवाशास त्याचे पाकीट परत देण्यात आले आहे.

या सर्व कारवायांमुळे नांदेड विभागात प्रवासी सुरक्षेबाबत कडक भूमिका अधोरेखित झाली असून प्रवाशांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संबंधित अधिकार्‍यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.