Shubh Prabhat

चंदनझिरा सुंदरनगर नागेवाडी येथे शासकीय रुग्णालय उभारणीसाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली जागेची पाहणी
चंदनझिरा परिसराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या तसेच परिसरातील नागरिकांची आरोग्य सुविधांसाठी होणारी गैरसोय लक्षात घेता सुंदरनगर नागेवाडी येथे शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आमदार खोतकर यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचाच एक भाग म्हणून आज प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात आली. हे आरोग्य अभियान अंतर्गत निधी मंजुरीनंतर जागेचा प्रश्नही आमदार खोतकर यांनी सोडवला यापूर्वी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नातून नागरी NRHM मधुन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, महानगरपालिकेच्या स्तरावरील उदासीनतेमुळे मंजूर झालेला निधी शासनाकडे परत करण्याची नामुष्की मनपावर आली होती. त्यानंतरही आमदार खोतकर यांनी हा विषय सोडून न देता पुन्हा पाठपुरावा करून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर करून आणला.

निधी मंजूर झाल्यानंतर आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्नही निर्माण झाला होता. आमदार खोतकर यांनी या प्रश्नात स्वतः जातीने लक्ष घालून जागेची अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता आरोग्य केंद्राच्या कामाला पुढील गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चंदनझिरा, नागेवाडी, आयेशानगर, एमआयडीसी परिसराला लाभ

सुंदरनगर नागेवाडी येथे शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यानंतर चंदनझिरा, नागेवाडी, आयेशानगर, एमआयडीसी तसेच लगतच्या परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. स्थानिक पातळीवरच प्राथमिक तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, उपचारासाठी नागरिकांना दूरवर जाण्याची गरज कमी होणार आहे.

आज झालेल्या पाहणीदरम्यान आमदार अर्जुनराव खोतकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित जागेबाबत माहिती घेतली. आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी आवश्यक बाबी, जागेची उपलब्धता आणि पुढील कार्यवाही याबाबतही चर्चा करण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (NRHM )आरोग्य केंद्रासाठी 0निधी मंजूर करून आणण्यापासून ते जागेची अडचण दूर करण्यापर्यंत आमदार खोतकर यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परिसरातील नागरिकांचा आरोग्य सेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नागरिकांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या पाहणीप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, जालना जिल्हा शल्यचिकित्सक (CS) डॉ. राजेंद्र पाटील, विठ्ठल  दैने, संतोष रासवे, राधा किसान दाभाडे, नगरसेवक सुनील बोर्डे, नगरसेवक माजीद पठाण, नगरसेवक अनिल तिरुखे, आनंद धोत्रे यांच्यासह परिसरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १४ जुगाऱ्यांवर कारवाई
जुगार सुरू असल्याची पोलिसांना मिळाली माहिती

चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पथक तसेच पोलीस अधीक्षक यांचे पथक गस्तीवर असताना निधोना शिवारात काही व्यक्ती चोरून-लपून मोठ्या पैशांच्या आमिषाने झन्नामन्ना व तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची दखल घेत पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि सहायक पोलीस निरीक्षक अविनाश गडाख यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पथकांनी नियोजनबद्ध पद्धतीने संबंधित ठिकाणी धाड टाकली. पोलिसांना पाहताच पळापळ पोलिसांचे पथक जुगार अड्ड्यावर पोहोचताच तेथे उपस्थित असलेल्या जुगाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. कारवाईच्या भीतीने काही जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी पाठलाग करून काही जणांना जागेवरच ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये विजय लक्ष्मणराव पुंगडवाले (रा. निधोना), राहुल विश्वनाथ शहापुरकर (रा. निधोना), शेख मोसीन शेख इक्बाल (रा. गांधीनगर, जालना), अमजद रफिक सय्यद (रा. गांधीनगर, जालना), विजय कैलास खरे (रा. कन्हैय्यानगर, जालना), सुनिल संतुकराव दाभाडे (रा. थिगळखेडा), समिर जफर खान (रा. संजयनगर, जालना) आणि महेंद्र अशोक आदमाने (रा. निधोना) यांचा समावेश आहे.

सहा जण फरार

पोलिसांच्या कारवाईदरम्यान काही जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इसा शेख, समिर पटेल, सुनिल शेजुळ, सुनिल म्हस्के (रा. निधोना), विक्की (रा. हिंदनगर, जालना) आणि संचिन मंडल (रा. ढवळेश्वर) हे फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

२५ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच विविध वाहने असा एकूण २५ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे या कारवाईमुळे अवैध जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिल्याचे दिसून येत आहे.

चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस कर्मचारी सागर खैरे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जोहरसिंग कलाणी करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक किरण बिडवे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश गडाख, सफौ दिनेश बरडे, मनसुब वेताळ, पोहेकॉ सचिन कोकणे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, विजय बहुरे, तसेच पोकॉ सागर खैरे, नंदकिशोर जैवाळ, हरी जाधव, गोवर्धन हरबक, विशाल हळदे, मतीन पठाण आणि कारभारी नागवे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

निधोना शिवारातील या कारवाईमुळे अवैध जुगार चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, फरार आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पिंप्री राजा येथे गणपती मिरवणुकीत ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, १० ते १५ जण जखमी
घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, बिट जमादार जयसिंग नागलोत यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्याचे काम सुरू करण्यात आले.

दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे आणि पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा तसेच दुर्घटनेचे कारण याबाबत अधिकृत माहिती मिळणे अद्याप बाकी आहे. प्राथमिक माहितीनुसार ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बदनापूर पोलीसांचा तपास फळाला ; कारफोडीतील सहा लाख रुपये जप्त
बँकेतून काढून कारमध्ये ठेवलेली रोकड चोरट्यांनी कारची काच फोडून लंपास केल्याच्या प्रकरणाचा बदनापूर पोलिसांनी छडा लावला आहे. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली असून, आंध्र प्रदेशातील आरोपीच्या घरातून चोरीस गेलेली सहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बदनापूर येथील SBI बँकेतून ४ सप्टेंबर २०२६ रोजी विष्णु कुंडलीकराव कोल्हे (वय ४९, रा. धोपटेश्वर, ता. बदनापूर, जि. जालना) यांनी १० लाख रुपये काढले होते. ही रक्कम घेऊन ते कारमधून जात असताना चोरट्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.

धोपटेश्वर ते देवगाव रोडवरील शिवारात कोल्हे यांनी कार उभी करून शेतात गेल्यानंतर चोरट्यांनी कारच्या मागील दरवाजाची काच फोडली आणि कारमधील रोकड घेऊन पोबारा केला. काही वेळाने परत आल्यानंतर कारची काच फुटलेली आणि रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दोन तपास पथके तयार केली. पथकाने परिसरातील CCTV फुटेज तपासण्यासोबतच तांत्रिक तपास केला. या तपासात मोटारसायकलवरून दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून काच फोडत रोकड चोरल्याचे स्पष्ट झाले.

तपासादरम्यान गुंजी चालराजु जबराज आणि गुड्डेटी विनोत प्रभुदास, दोघेही रा. कपरला टिपा, ता. बिटरगुंटा, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश, यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशात रवाना झाले. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान, तपास पथकाने आरोपीच्या राहत्या घरातून चोरीस गेलेली सहा लाख रुपयांची रोकड जप्त केली. उर्वरित रक्कम आणि अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे तपास पथक पुढील कारवाई करत आहे.

ही कारवाई जालना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक एस. आर. कुकलारे, पोहेकॉ/६७१ ए. एस. दासर, पोको/२२७ भडंगे, पोको/३४२ पी. के. गोलवाल आणि पोको/१६९९ एस. जे. तडवी यांनी सहभाग घेतला.

गणरायाच्या आगमनासाठी जालना नगरी सज्ज; बाजारपेठेत बालगोपालांसह नागरिकांची तुफान गर्दी
गणेशोत्सवाच्या निमित्ताने जालना शहरातील प्रमुख बाजारपेठा गणेशमूर्ती, आकर्षक सजावटीच्या वस्तू, फुलांच्या माळा, पूजेचे साहित्य आणि विविध रंगीबेरंगी वस्तूंनी सजल्या आहेत. गणरायाच्या आगमनासाठी घराची सजावट करण्यासाठी बालगोपालांसह महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये दिवसभर लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवात गणरायाच्या मूर्तीला विशेष महत्त्व असल्याने विविध आकारांच्या आणि आकर्षक रूपातील गणेशमूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. आपल्या आवडीची गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी बालगोपालांसह नागरिक दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. गणरायाची मूर्ती घरी आणून तिची विधिवत स्थापना करण्यासाठी भाविकांकडून तयारी केली जात आहे.
लहान मुलांमध्ये गणेशोत्सवाची विशेष उत्सुकता असून, आपल्या आवडीची बाप्पाची मूर्ती निवडण्यासाठी बालगोपाल पालकांसोबत बाजारात येत आहेत. काही ठिकाणी गणेशमूर्ती खरेदी केल्यानंतर नागरिक त्या सुरक्षितपणे घरी घेऊन जाताना दिसत आहेत.
गणरायाच्या स्वागतासाठी घराघरांत आकर्षक सजावट केली जात असल्याने सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. रंगीबेरंगी फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई, आकर्षक पडदे, मखर, विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू आणि पूजेसाठी लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. या वस्तूंनी बाजारपेठेला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात घरातील गणेशस्थापनेची जागा सुंदर दिसावी, यासाठी नागरिकांकडून विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंची खरेदी केली जात आहे. बाजारपेठेत विविध रंग, आकार आणि डिझाइनमधील साहित्य उपलब्ध असल्याने ग्राहकांना खरेदीचा पर्याय मिळत आहे.
गणरायाच्या स्थापनेसाठी लागणारे पूजासाहित्य, फुले, हार, दुर्वा, नारळ, फळे आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही नागरिकांची गर्दी होत आहे. गणेशोत्सवातील धार्मिक विधी आणि पूजेसाठी आवश्यक असणार्‍या वस्तूंची खरेदी करण्यासाठी भाविक बाजारपेठेत दाखल होत आहेत.
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची स्थापना करून विधिवत पूजा-अर्चा करण्यात येणार असल्याने नागरिकांकडून त्यासाठीची तयारी पूर्ण केली जात आहे. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढल्याने विविध वस्तू विकणार्‍या व्यापार्‍यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. गणेशमूर्ती, सजावटीच्या वस्तू आणि पूजासाहित्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. गणेशोत्सवाच्या काळात खरेदीला वेग येत असल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे.
दरम्यान, गणरायाच्या आगमनासाठी जालना शहर सज्ज झाले असून, नागरिकांमध्ये भक्तीभाव आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांच्या गजरात, मंगलमय वातावरणात आणि भक्तिभावाने गणरायाचे स्वागत करण्यासाठी भाविक आतुर झाले आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय होणार आहे.

नंदापूर येथे ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे अखंड पठण
विशेष म्हणजे, नंदापूर येथील मनीषा शिवाजी खरात यांनी या ग्रंथपठणात सातत्य राखत एकही दिवस खंड पडू दिलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून त्या नियमितपणे ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे पठण करीत असून, ऑक्टोबर 2026 मधील अश्विन पौर्णिमेपर्यंत हे पठण अखंड सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण सहभागामुळे धम्मपरंपरेत निष्ठा आणि समर्पणाचे आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे.

नंदापूर गावात या ग्रंथपठणाचे हे 13 वे वर्ष आहे. गेल्या तेरा वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही त्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे नेली जात आहे. दररोज सायंकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत जेतवन बुद्ध विहारात ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन व पठण केले जाते. या वेळी गावातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रंथाचे पठण आणि श्रवण करतात.

बुद्धांच्या विचारांचा प्रसार
‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ केवळ धार्मिक वाचनापुरता मर्यादित न ठेवता भगवान गौतम बुद्धांचे विचार, धम्माची शिकवण, समता, बंधुता, करुणा, विवेक आणि मानवतावादी दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचविण्याचे माध्यम म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. दररोज होणार्‍या ग्रंथपठणामुळे उपासक-उपासिकांमध्ये बुद्धांच्या विचारांचे आचरण करण्याची प्रेरणा निर्माण होत आहे.
ग्रंथपठणाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, विषमता आणि भेदभाव दूर करून समतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी बुद्धांच्या विचारांची आवश्यकता अधोरेखित केली जात आहे. त्यामुळे या उपक्रमाला धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि वैचारिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.

13 वर्षांची अखंड धम्मपरंपरा
नंदापूर येथील जेतवन बुद्ध विहारात सुरू असलेली ही ग्रंथपठणाची परंपरा गेल्या 13 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत ग्रंथाचे नियमित वाचन केले जाते. वर्षानुवर्षे ही परंपरा जपली जात असल्याने नंदापूर परिसरात बुद्धांच्या धम्मविचारांच्या प्रसाराचे एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. ग्रंथपठणाच्या काळात उपासक-उपासिका मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. ग्रंथाचे वाचन, श्रवण आणि त्यातील विचारांचे मनन करण्याबरोबरच बुद्धांच्या धम्मानुसार जीवन जगण्याचा संकल्पही यावेळी केला जातो.

मनीषा खरात यांच्या सातत्याचे कौतुक
मनीषा शिवाजी खरात यांनी नियमितपणे ग्रंथपठणात सहभाग घेत एकही दिवस खंड पडू न देता आपले सातत्य कायम ठेवले आहे. वैयक्तिक जबाबदार्‍या सांभाळत त्यांनी धम्मवाचनासाठी वेळ देत ही सेवा सुरू ठेवली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे नंदापूर येथील उपासक-उपासिकांकडून विशेष कौतुक होत आहे.
केवळ काही दिवस नव्हे, तर संपूर्ण तीन महिन्यांच्या कालावधीत ग्रंथपठण अखंड सुरू ठेवण्याचा त्यांचा संकल्प असून, अश्विन पौर्णिमेपर्यंत त्या नियमितपणे ग्रंथाचे वाचन करणार आहेत. त्यांच्या या सातत्यामुळे इतरांनाही धम्मवाचनासाठी प्रेरणा मिळत आहे.

अश्विन पौर्णिमेला समारोपाचा कार्यक्रम

गुरूपौर्णिमेपासुन ग्रंथ पठणास सुरुवात झाली असून गेल्या दिड महिन्यापासून सतत वाचन सुरु असून याची ऑक्टोबर 2026 मधील अश्विन पौर्णिमेपर्यंत या ग्रंथपठणाची समाप्ती होत असते. ग्रंथ समाप्तीवेळी नंदापूर गावात उपासक-उपासिकांच्या वतीने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. या कार्यक्रमाला नंदापूरसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

यंदाही ग्रंथपठणाच्या समारोपानिमित्त विविध धम्मविषयक कार्यक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता असून, बुद्धांच्या विचारांचा प्रसार, धम्माची शिकवण आणि सामाजिक समतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.

भगवान बुद्धांच्या धम्मातील मानवतावादी विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्या शिकवणीचे आचरण दैनंदिन जीवनात व्हावे, या उद्देशाने नंदापूर येथील जेतवन बुद्ध विहारात सुरू असलेले हे अखंड ग्रंथपठण निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

कलाकारांच्या सर्जनशीलतेला मिळणारे हे व्यासपीठ कौतुकास्पद” : मनीषाताई टोपे
आज प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन कलाकृतींचा आस्वाद घेतला. विविध माध्यमांतील चित्रे, कलाविष्कार आणि कलाकारांची सर्जनशीलता पाहून विद्यार्थी व कला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

मा. डॉ. दीक्षा टोपे यांनीही कला प्रदर्शनाला भेट देऊन कलाकृतींची पाहणी केली. जालन्यात कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम होत असल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.

प्रदर्शनातील कै. अंभोरे सरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेले दालन विशेष आकर्षण ठरत आहे. या दालनाला भेट देणाऱ्या नागरिकांकडून त्याचे विशेष कौतुक होत असून, कै. अंभोरे सरांच्या कलाविषयक योगदानाची आठवण जपण्यासोबतच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

तसेच अजिंक्य भैय्या टोपे यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रांचेही प्रदर्शनात विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या छायाचित्रांमधील विषयवैविध्य, कलात्मकता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची मांडणी कला रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या छायाचित्रांमुळे प्रदर्शनाला वैविध्यपूर्ण आणि व्यापक कलादृष्टी प्राप्त झाली असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेला चालना देणारे असे उपक्रम जालना शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

या प्रसंगी प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे, श्री प्रशांत महाजन, श्री सचिन मुंदडा, प्राचार्य शहा सर, सुनील सोलाट, प्राचार्य दादासाहेब गजहंस, संजय पाटील, प्रा. सुजाता देवरे, प्रा. रणजित बायस, प्रा. डॉ. रविकिरण भुतेकर, प्रा. शंकर वैद्य, प्रा. दत्तात्रय देशमुख सर, प्रा. शंकर तिकांडे, प्रा. स्वप्नील रगडे यांच्यासह कला क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, विद्यार्थी व कला रसिक उपस्थित होते.

नंदापूरच्या वैभवात भर पडणार; भव्य भारत माता मंदिराचा २८ सप्टेंबरला लोकार्पण सोहळा
या भव्य-दिव्य भारत माता मंदिरामुळे नंदापूर गावाची एक वेगळी ओळख निर्माण होत असून, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचा संदेश देणारे हे मंदिर परिसराचे आकर्षण ठरणार आहे. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयुजी जोशी तसेच जालना येथील उद्योजक घनशामजी गोयल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नंदापूर हे गाव द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखले जाते. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेत असून, कृषी क्षेत्रात गावाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यातच आता भारत माता मंदिराची भव्य वास्तू उभी राहत असल्याने नंदापूरच्या ओळखीत आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
विशेष म्हणजे भारत माता मंदिर हे समृद्धी महामार्गापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सहज नजरेत हे मंदिर भरणार आहे. भव्य स्वरूपातील भारत माता मंदिरामुळे नंदापूरकडे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधले जाणार असून, भविष्यात हे मंदिर गावाचे प्रमुख आकर्षण आणि एक वेगळी ओळख ठरण्याची शक्यता आहे.
भारत माता मंदिराच्या माध्यमातून केवळ धार्मिक भावना जोपासण्याबरोबरच देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय संस्कारांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याकडे नंदापूरसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांकडून उपस्थितीचे आवाहन
लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात विविध तयारी करण्यात येत असून, नंदापूर ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास नंदापूर तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, नंदापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
“जय भारत माता की जय” या जयघोषात होणारा हा लोकार्पण सोहळा नंदापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

जालना शहरात मोटारसायकलचे सुटे भाग काढताना दोघांना पकडले; 45 हजारांची दुचाकी जप्त
गुरुवार दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना खबर्‍यामार्फत कन्या प्रशाळेच्या पाठीमागील भिंतीजवळ अंधारात दोन जण मोटारसायकलचे सुटे भाग काढत असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना कळवून संबंधित ठिकाणी धाव घेतली. रात्री सुमारे आठ वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता दोन तरुण मोटारसायकलचे सुटे भाग काढताना आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यापैकी एक जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव आदित्य आनंद नवगिरे असल्याचे सांगितले. घटनास्थळी असलेल्या दुसर्‍या तरुणाचे नाव जय अशोक उदावंत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत चौकशी केली असता दोघांनाही वाहनाच्या मालकी हक्काबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही. तसेच वाहनासंदर्भातील कोणतेही कागदपत्र त्यांनी सादर केले नाही.
पोलिसांनी पंचांसमक्ष मोटारसायकल ताब्यात घेतली. जप्त करण्यात आलेली होंडा कंपनीची राखाडी रंगाची युनिकॉर्न मोटारसायकल असून, तिची अंदाजे किंमत 45 हजार रुपये आहे. विशेष म्हणजे या मोटारसायकलला दोन्ही चाके नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलीस शिपाई नजीर अहमद खान गुलाम रसूल खान पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य नवगिरे आणि जय उदावंत यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सदर बाजार पोलीस करीत आहेत.

कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी देवमूर्ती येथे विशेष मार्गदर्शन व अर्ज स्वीकृती शिबिर
महसूल मंडळ देवमूर्ती अंतर्गत सर्व गावांतील नागरिक, शेतकरी बांधव, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिकांना या शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुराव्यांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासह अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया या शिबिरात करण्यात येणार आहे.

शिबिरासाठी येताना नागरिकांनी स्वतःची सविस्तर व साक्षांकित वंशावळ, सन १९६० पूर्वीचा ७/१२, क-३, खसरा किंवा पाहणी पत्रक अथवा इतर जुनी महसुली नोंद सोबत आणावी. तसेच अर्जदार, वडील, आजोबा किंवा पणजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म-मृत्यू नोंद उतारा उपलब्ध असल्यास तोही सादर करावा.

ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. याशिवाय विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र व शपथपत्रही आवश्यक राहणार आहे.

कागदपत्रांच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. देवमूर्ती महसूल मंडळातील पात्र नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून पुराव्यासहित अर्ज सादर करावा आणि शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण महसूल मंडळ देवमूर्ती, ता. जि. जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

राजुरमध्ये १ कोटी ३५ लाखांचा गुटखा जप्त; पुरवठ्याच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचणार का?
ही कारवाई दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हसनाबाद पोलिसांच्या मदतीने राजुर येथे छापा टाकण्यात आला. राजुर येथील टेंभुर्णी रोड परिसरात इसम संदिप भुमकर, रा. राजुर हा त्याच्या गोठ्यावर मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा खाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.

छाप्यादरम्यान गोवा, विमल, रजनीगंधा, आर.एम.डी., राजनिवास आदी कंपन्यांचा बंदी असलेला गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पंचांसमक्ष हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

९५ लाखांचा गुटखा; वाहनेही पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ९५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. याशिवाय गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहनेही ताब्यात घेण्यात आली असून त्यांची किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात संदिप भुमकर (रा. राजुर) आणि आशिष डोलतानी (रा. बु-हानपूर, मध्यप्रदेश) यांना आरोपी करण्यात आले आहे.

जिल्ह्यात गुटख्याचा एवढा मोठा साठा येतो कुठून?

जालना जिल्ह्यात यापूर्वीही पोलिसांनी अनेकदा मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. मात्र प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात माल पकडला जात असताना हा गुटखा नेमका कुठून येतो, कोण पुरवठा करतो, वाहतुकीचे जाळे कोण चालवते आणि जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत हा माल कोण पोहोचवतो, हा प्रश्न कायम आहे.

राजुर येथे तब्बल ९५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळणे ही साधी घटना नसून त्यामागे मोठे पुरवठा जाळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी केवळ गुटखा जप्त करून प्रकरण थांबवू नये, तर या मालाचा मूळ पुरवठादार, मुख्य सूत्रधार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांपर्यंत तपासाची साखळी पोहोचवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

‘मुळापर्यंत’ तपासाची गरज

गुटख्याची वाहतूक करणारे वाहनचालक किंवा स्थानिक पातळीवरील व्यक्तींवर कारवाई झाल्यानंतरही जर मुख्य पुरवठादार मोकाट राहत असतील, तर अवैध गुटख्याची साखळी पूर्णपणे थांबणार कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेषतः मध्यप्रदेशाशी संबंधित आरोपीचा सहभाग समोर आल्याने या प्रकरणातील गुटख्याचा पुरवठा आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य पातळीवरून होत आहे का, याचाही तपास होणे आवश्यक आहे. जप्त केलेल्या वाहनांची कागदपत्रे, मोबाईल संपर्क, आर्थिक व्यवहार, माल कुठून लोड करण्यात आला आणि तो पुढे कुठे वितरित होणार होता, याचा तपास केल्यास या नेटवर्कमधील मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

अन्न व औषध प्रशासनाचाही सहभाग

या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभाग, जालना यांचाही सहभाग होता. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि नमुना तपासणी याकडेही लक्ष लागले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पथक प्रमुख सपोनि अविनाश गडाख, हसनाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेश उवाळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

कारवाई मोठी; आता तपास किती मोठा?

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मोठ्या गुटखा कारवायांपैकी ही एक कारवाई मानली जात आहे. १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्याचे पोलिसांचे यश निश्चितच महत्त्वाचे आहे; मात्र खरी कसोटी आता तपासाची आहे.

या गुटख्याचा मूळ स्रोत कोणता? मुख्य पुरवठादार कोण? जिल्ह्यातील कोणत्या भागात माल पोहोचवला जाणार होता? या व्यवसायातून कोण आर्थिक फायदा घेत आहे? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.

गुटखा पकडला जातो, साठा जप्त होतो, आरोपी ताब्यात घेतले जातात; पण या अवैध धंद्याची मुळे जर कायम राहिली, तर कारवायांनंतरही गुटख्याचा पुरवठा सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजुर प्रकरणाच्या निमित्ताने पोलीस प्रशासन या अवैध गुटखा साखळीच्या मुळापर्यंत पोहोचणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बाजीउमरद येथे अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते बैलांची विधीवत पूजा
यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित राहून बैलांची विधीवत पूजा केली. बैलांना सजवून त्यांची पूजा-अर्चा करण्यात आली. त्यांच्या कपाळावर कुंकू-हळदीचा टिळा लावून औक्षण करण्यात आले. तसेच बैलांच्या खांद्यांची मळणी करून त्यांना नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी शेतकरी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने बैलांप्रती आपला आदर व कृतज्ञता व्यक्त केली.

ग्रामीण भागातील शेतीच्या कामात बैलांचे योगदान मोठे असून, शेतकऱ्याचा खरा सहकारी म्हणून बैलाकडे पाहिले जाते. आधुनिक युगात शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढले असले तरी बैलपोळ्याच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पारंपरिक संस्कृतीशी असलेले नाते आजही जपत असल्याचे यावेळी दिसून आले.

आमदार अर्जुनराव खोतकर यांनी बैलांची पूजा करून शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण संस्कृती यांचे नाते अधिक दृढ राहावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमामुळे गावातील वातावरणात उत्साहाचे आणि पारंपरिक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमास बबनराव डोंगरे, एकनाथ इंगळे, गोवर्धन डोंगरे, बालाजी डोंगरे, सोपान डोंगरे, सदाशिव डोंगरे, विशाल डोंगरे, सतीश डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.

दुष्काळ जाहीर करण्यासह पाणी, सिंचन व विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डॉ. संजय लाखे-पाटील यांची मागणी
ओ विशेष बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, सिंचन, जलसंधारण, अपूर्ण सिंचन प्रकल्प, प्रलंबित पाणी योजना तसेच विकासातील अनुशेष या सर्व प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊन ठोस निर्णय व कालबद्ध आर्थिक तरतुदी करण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. लाखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

दुष्काळ निर्धारण प्रक्रिया तातडीने सुरू करा

डॉ. लाखे-पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, दि. २८ जून रोजी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविलेल्या ई-मेलद्वारे दुष्काळ व्यवस्थापनाच्या अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वांमधील वैधानिक तरतुदींचे पालन करून दुष्काळ निर्धारणाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.

अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी परिस्थिती, पिकांचे नुकसान, पीकविमा तसेच शेतकरी व कष्टकरी यांच्या जीवन-मरणाशी संबंधित प्रश्नांवर तातडीने बैठक घेऊन ऑगस्टअखेरपर्यंत लवकर दुष्काळ जाहीर करण्याचे नियोजन करावे, अशी मागणीही करण्यात आली होती.

याच मागणीसाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडेही पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, संबंधित ई-मेल आणि पत्र सचिव, मदत व पुनर्वसन विभागाकडे पुढे पाठविण्यात आल्याची केवळ पोहोच मिळाली असून अद्याप या संदर्भात ठोस निर्णय झालेला नाही, अशी खंत डॉ. लाखे-पाटील यांनी व्यक्त केली.

कर्नाटकच्या निर्णयाचा दाखला

मराठवाड्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेजारील कर्नाटक राज्याने दुष्काळ निर्धारणासाठीच्या वैधानिक निकषांचा आधार घेत शंभरपेक्षा अधिक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत, असे डॉ. लाखे-पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. परिस्थितीची गरज भासल्यास दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढविण्याची भूमिकाही कर्नाटक सरकारने घेतल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

शेजारील राज्य आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने निर्णय घेत असताना महाराष्ट्रात दुष्काळाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यास विलंब का होत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मुक्तिसंग्रामानंतरही मराठवाड्याच्या समस्या कायम

१७ सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आहे. निजामशाहीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी मराठवाड्यातील जनतेने मोठा संघर्ष केला. या ऐतिहासिक संघर्षाची आठवण जागविणाऱ्या मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या आजच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे डॉ. लाखे-पाटील यांनी म्हटले आहे.

“मराठवाडा निजामशाहीच्या जोखडातून लढून मुक्त झाला; मात्र स्वातंत्र्यानंतरही या प्रदेशाच्या वाट्याला कायमस्वरूपी दुष्काळ, पाणीटंचाई, सिंचनाचा अनुशेष आणि विकासातील असमतोल आला,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मराठवाडा आता नैसर्गिक दुष्टचक्रात अडकला असून, आगामी दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना पुरेशा ठरणार नाहीत. दुष्काळाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन आणि समग्र धोरणाची गरज आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सिंचन व जलसंधारणासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यासोबतच या प्रदेशाच्या पाणी आणि सिंचन प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यामध्ये—

प्रलंबित सिंचन प्रकल्पांची पूर्तता करणे,

अपूर्ण प्रकल्पांना आवश्यक निधी उपलब्ध करून देणे,

पाणी साठवण क्षमता वाढविणे,

जलसंधारणाच्या कामांना गती देणे,

प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची पूर्तता करणे,

उपलब्ध जलस्रोतांचा नियोजनबद्ध वापर करणे,

तसेच मराठवाड्याच्या विकासातील अनुशेष दूर करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करणे,

या उपाययोजनांचा समावेश आहे.

दुष्काळाचे चक्र कायमचे थांबविण्यासाठी शासनाने तात्पुरत्या मदतीपलीकडे जाऊन ठोस, दीर्घकालीन आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी डॉ. लाखे-पाटील यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांची विशेष बैठक घ्या

दुष्काळ, पाणी, सिंचन व विकासाचा सर्वंकष आढावा घेण्याची मागणी

मराठवाड्यातील प्रश्नांची तीव्रता लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर येथे किमान दोन दिवसांची विशेष मंत्रिमंडळ बैठक घेण्यात यावी. या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, सिंचन, शेती, जलसंधारण आणि विकासातील अनुशेष या विषयांवर विभागनिहाय सविस्तर चर्चा करण्यात यावी.

तसेच बैठकीत घेतलेल्या निर्णयांसाठी भरीव आर्थिक तरतूद करून प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यात केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता या प्रदेशाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची ही योग्य संधी असल्याचेही डॉ. लाखे-पाटील यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांकडे थेट भेटीची मागणी

मराठवाड्याच्या दुष्काळ, पाणी, सिंचन आणि विकासाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भेटीची वेळ द्यावी, अशी विनंतीही डॉ. संजय लाखे-पाटील यांनी केली आहे.

आगामी १७ सप्टेंबरच्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मराठवाड्यासाठी कोणते ठोस निर्णय घेते, याकडे शेतकरी, कष्टकरी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.

मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचा ठोस आराखडा, आवश्यक आर्थिक तरतुदी आणि त्याच्या अंमलबजावणीची कालमर्यादा जाहीर करावी, अशी आग्रही मागणी मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे-पाटील यांनी केली आहे.

लखन तुरे हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींना घाणेवाडी शिवारातून अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून लखन तुरे यांच्यासोबत चौघांचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. चौघांनी लखन तुरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यासोबतच सिमेंटच्या गट्टूने गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात लखन तुरे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच दि. ७ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मारहाणीच्या घटनेचे रूपांतर हत्या प्रकरणात झाले.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावपळ
घटनेनंतर प्रकरणातील शुभम काकासाहेब जोगदंड आणि किशोर देवीदास जोगदंड हे दोघे जालना शहरातून पसार झाले होते. आरोपी फरार झाल्याने पोलिसांसमोर त्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी यांनी आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना चंदनझिरा पोलिसांना दिल्या. त्यानुसार चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी आरोपींच्या मागावर राहून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविली. आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वारंवार ठिकाणे बदलत असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व शिर्डी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, बीड जिल्ह्यातील गेवराई, तसेच जालना जिल्ह्यातील अंबड आदी विविध ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घ्यावा लागला.
घानेवाडी शिवारात सापळा
दरम्यान, दि. ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना शुभम जोगदंड आणि किशोर जोगदंड हे राजूर रोडवरील घानेवाडी शिवारातील एका शेतात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांच्या पथकाने कोणताही विलंब न करता घानेवाडी शिवार गाठले. परिसराची पाहणी करून पोलिसांनी शेताभोवती सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शुभम काकासाहेब जोगदंड आणि किशोर देवीदास जोगदंड या दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या हत्या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. फरार असलेल्या उर्वरित दोन आरोपींनाही अटक झाल्याने आता या गुन्ह्यातील चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत पोलिसांकडून हत्येच्या घटनेमागील नेमके कारण, पैशांच्या देवाणघेवाणीचा वाद कशामुळे झाला, हल्ल्यात कोणाची कोणती भूमिका होती, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तू व इतर बाबींचा तपास केला जाणार आहे.
पैशांच्या व्यवहारातून वादाचे पर्यवसान हत्येत
प्राथमिक तपासात पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून लखन तुरे यांच्यावर हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, या वादामागील नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि हल्ल्याचे कारण काय होते, याचा सखोल तपास चंदनझिरा पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सलग तीन दिवस विविध जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबवून अखेर त्यांना जालना शहराजवळील घानेवाडी शिवारातून अटक केल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बिडवे करीत आहेत.

मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडा; संधींच्या अवकाशात भरारी घ्या : राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन यंदा परतूर येथे करण्यात आले आहे. मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ व ८ सप्टेंबर रोजी हा महोत्सव होत आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर परतूरला युवक महोत्सवाचे यजमानपद मिळाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी महोत्सवाचे उद्घाटन मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी होते.

यावेळी संस्थेचे सचिव तथा माजी अधिसभा सदस्य कपिल आकात, उपाध्यक्ष डॉ. कुणाल आकात, माजी बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. भागवत कटारे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे, संस्थेचे संचालक गोविंदराव थिटे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. भारत खंदारे, जिल्हा समन्वयक प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव, अधिसभा सदस्य डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, प्रा. हरिदास सोमवंशी, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, संयोजन समितीचे सदस्य डॉ. दिलीप महालिंगे, डॉ. किशोर शिरसाठ, डॉ. समाधान इंगळे, डॉ. संजय शिंदे, डॉ. शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.

युवा शक्ती देशाची खरी ताकद

मेघनाताई बोर्डीकर म्हणाल्या, युवा शक्ती हीच देशाची खरी ताकद आहे. तरुणांच्या ऊर्जेला योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. युवक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. विशेष म्हणजे यंदा महोत्सवात विद्यार्थिनींचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढला आहे, ही समाधानाची बाब आहे. या महोत्सवातून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कलावंत घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गणेश मंडळांसाठी ऑनलाइन परवानगीची सुविधा; जालना जिल्हा पोलिसांचे आवाहन
यंदा दि. १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात श्रीगणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांची पोलीस विभागाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना सुलभ पद्धतीने नोंदणी करता यावी, यासाठी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तेघवीर सिंह संधू यांच्या संकल्पनेतून ‘आपले सरकार’ पोर्टलवरील नागरिकांसाठीच्या Citizen Portal मध्ये ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशी करा ऑनलाइन नोंदणी
सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष किंवा अधिकृत अर्जदाराने महाराष्ट्र पोलीस Citizen Portal⁠� या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या Online Services मध्ये जाऊन आवश्यक वैयक्तिक माहिती भरून User ID तयार करावा.
User ID तयार झाल्यानंतर त्याचा वापर करून सार्वजनिक गणेश मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याबाबतचा ऑनलाइन अर्ज पूर्ण भरून सादर करावा. अर्जामध्ये आवश्यक माहिती अचूकपणे भरावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.
अर्ज सादर झाल्याची माहिती SMS व ई-मेलद्वारे
ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर अर्जदाराला त्याबाबतची माहिती SMS किंवा ई-मेलद्वारे देण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी नोंदणी करताना आपला मोबाईल क्रमांक व ई-मेलची माहिती अचूक भरावी.
दरम्यान, ऑनलाइन अर्ज भरताना किंवा नोंदणी करताना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास अर्जदारांनी मपोहेकॉ-१५४६ रुपाली राखे यांच्याशी मोबाईल क्रमांक ९८२३६२१५९० वर संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, असे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध गणेशोत्सव स्पर्धांमध्ये मंडळांना सहभागी होता यावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक परवानगी अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन जालना जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

जालना पंचायत समिती वाऱ्यावर; कारभाराचा वाली कोण?
एखाद्या अधिकाऱ्याविरोधात तक्रारी झाल्या, चौकशी झाली आणि संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले, तर त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सक्षम अधिकारी नियुक्त करणे ही वरिष्ठ प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र, कारवाई झाली; अधिकारी गेले; पण पर्यायी सक्षम व्यवस्था उभी राहिली नाही, असे चित्र असेल तर त्याचा भुर्दंड सामान्य जनतेने का भरावा?

राजकीय तक्रारींच्या आधारे प्रशासनातील निर्णय घेतले जात असतील, तर त्या निर्णयांची जबाबदारीही प्रशासनानेच स्वीकारली पाहिजे. तक्रारी खऱ्या असतील तर चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी. पण चौकशीच्या नावाखाली संपूर्ण पंचायत समितीचे कामकाजच ठप्प होणार असेल, तर त्याला प्रशासनिक नियोजन म्हणायचे की नियोजनाचा अभाव?

गटविकास अधिकारी हे पंचायत समितीतील केवळ एक पद नाही. ग्रामीण विकासाच्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीतील ते प्रमुख केंद्रबिंदू आहेत. घरकुल योजना, रोजगार हमी, ग्रामपंचायतींचे प्रश्न, विकासकामांना मंजुरी, विविध प्रस्तावांची छाननी आणि शासकीय योजनांचा आढावा अशा अनेक बाबींमध्ये त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. त्यामुळे या पदावर पूर्णवेळ अधिकारी नसणे म्हणजे एका खुर्चीवर अधिकारी नसणे एवढाच विषय नाही; त्याचा परिणाम गावागावातील विकासकामांवर होऊ शकतो.

सर्वाधिक फटका कोणाला बसतो? अर्थातच सर्वसामान्यांना.

घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेला गरीब लाभार्थी पंचायत समितीच्या दारात येतो. त्याच्याकडे मोठे राजकीय वजन नसते. कोणत्या अधिकाऱ्याला फोन करायचा, कोणत्या नेत्याकडे जायचे, कोणत्या कार्यालयात दबाव आणायचा, याची त्याला माहिती नसते. त्याला फक्त शासनाने मंजूर केलेला हक्काचा लाभ वेळेत मिळावा एवढीच अपेक्षा असते. रोजगार हमीच्या कामासाठी वाट पाहणाऱ्या मजुराचीही तीच अवस्था. त्याच्या हाताला काम आणि घरात चूल पेटणे एवढीच त्याची गरज. पण प्रशासनातील पद रिक्त राहिले, फाईल पुढे सरकली नाही किंवा निर्णयाला विलंब झाला, तर त्याचा थेट परिणाम या गरीब कुटुंबांवर होतो.

अधिकाऱ्यांच्या अनुपलब्धतेमुळे नागरिकांना वारंवार पंचायत समितीच्या फेऱ्या माराव्या लागत असतील, तर प्रशासनाने एकदा स्वतःच्या कार्यालयाच्या बाहेर येऊन परिस्थिती पाहावी. ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी नागरिकांना वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. दिवसभराची मजुरी बुडवून एखादा नागरिक कार्यालयात येतो आणि ‘साहेब नाहीत, पुन्हा या’ एवढेच उत्तर मिळाले, तर त्या नागरिकाच्या मनात शासनाबद्दल काय भावना निर्माण होईल?

लोकशाहीमध्ये शासनाची खरी परीक्षा ही मोठ्या घोषणा करण्यात होत नाही; तर सामान्य माणसाचे छोटे काम किती सहज आणि वेळेत होते, यावर होते.

जालना पंचायत समितीतील परिस्थितीबाबत जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता केवळ कागदी अहवाल मागवून थांबणे पुरेसे नाही. प्रत्यक्ष पाहणी करून किती कामे प्रलंबित आहेत, कोणत्या योजनांना विलंब झाला आहे, नागरिकांच्या नेमक्या तक्रारी काय आहेत आणि प्रशासकीय पातळीवर कुठे अडथळे निर्माण झाले आहेत, याचा आढावा घेण्याची गरज आहे.

विशेष म्हणजे, एखाद्या अधिकाऱ्याविरोधात राजकीय तक्रार झाली म्हणून प्रशासनाने घाबरून निर्णय घेणे आणि त्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून न काढणे, हा प्रकार भविष्यात चुकीचा संदेश देऊ शकतो. अधिकारी म्हणून काम करताना नियमांचे पालन करणाऱ्या यंत्रणेला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त वातावरण मिळाले पाहिजे. त्याचवेळी अधिकारी चुकीचे काम करत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईही झाली पाहिजे. परंतु या दोन्ही प्रक्रियांमध्ये नागरिकांच्या हिताचा बळी जाता कामा नये.

जालना पंचायत समिती ही कोणाच्या वैयक्तिक मालकीची संस्था नाही. ती जनतेच्या करातून चालणारी सार्वजनिक यंत्रणा आहे. त्यामुळे तिच्या कामकाजाचा वाली हा अखेरीस जनताच आहे आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

आता प्रश्न एकच आहे—जालना पंचायत समितीचा कारभार असा किती दिवस चालणार?

तात्पुरत्या अधिकाऱ्यांच्या भरवशावर, प्रलंबित फाईलींच्या ढिगाऱ्यावर आणि हेलपाटे मारणाऱ्या नागरिकांच्या संयमावर प्रशासन किती काळ विसंबून राहणार? जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही परिस्थिती दिसत नाही का? की सामान्य नागरिकांच्या तक्रारी प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत?

आता तरी प्रशासनाने जागे होण्याची गरज आहे.

पूर्णवेळ आणि सक्षम गटविकास अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी. पंचायत समितीतील रखडलेल्या कामांचा विशेष आढावा घ्यावा. घरकुल, रोजगार हमी आणि इतर योजनांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे वेळबद्ध पद्धतीने निकाली काढावीत. नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी स्पष्ट जबाबदारी निश्चित करावी.

कारण पंचायत समितीचा कारभार ठप्प होणे म्हणजे केवळ सरकारी कार्यालयाचे काम थांबणे नव्हे; त्याचा अर्थ ग्रामीण भागातील विकासाचा वेग थांबणे होय.

आणि जालना पंचायत समितीचा विकासाचा दिवा विझू नये, यासाठी आता प्रशासनाने ‘वाली कोण?’ या प्रश्नाचे उत्तर कृतीतून देण्याची वेळ आली आहे.

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला खासदार डॉ. कल्याण काळे यांची भेट
यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या सविस्तरपणे समजून घेतल्या. समाजातील मुला-मुलींना संपूर्ण शिक्षण मोफत मिळावे, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्र सुरू करून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असल्याचे श्री. रणनवरे यांनी खासदारांना सांगितले.

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी उपोषणकर्ते श्री. दीपक रणनवरे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित मागण्यांबाबत शासनस्तरावर योग्य ती दखल घेण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका व्यक्त केली.

समाजाच्या रास्त मागण्यांकडे शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्यावर तातडीने निर्णय घ्यावा आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा काढावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी  राजेंद्र राख,बदरभाई चाऊस,संजय इंगळे, संजय मुथा,सुनील चौधरी, अशोक उबाळे,राजेंद्र गोरे,राजाभाऊ कुलकर्णी,रऊफ परसूवाले,कृष्णा पा.पडूळ,राम पा.सिरसाठ,ज्ञानेश्वर डुकरे,नारायण वाढेकर,सोपान तिरुखे, ज्ञानदेव इंगोले अर्जुन भांदरगे,योगीताताई धांडगे, रघुवीर गुढे, सुरज यलगंटवार,दिनेश सुराणा,चंद्रकांत रत्नपारखी,भाऊसाहेब लकडे,राम गव्हाणे,भागवत घाटे,विक्रम चव्हाण,गणेश एखंडे,दिग्विजय धांडगे,व ब्राह्मण समाजातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जालना शहरात वाहतूक नियोजनाचा बोजवारा! शनी मंदिर चौकात तासभर कोंडी; ‘आमची सुटका कधी?’ जालनेकरांचा संतप्त सवाल
जालना शहरातील शनी मंदिर चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा भाग आहे. या चौकातून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. दुचाकी, चारचाकी, ऑटो, बस तसेच मालवाहू वाहनांची मोठी वर्दळ या परिसरात असते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन आणि गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती याच्या उलट असल्याचे चित्र गेल्या तीन दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

तीन दिवसांपासून रोजच कोंडी

गेल्या तीन दिवसांपासून शनी मंदिर चौक परिसरात रोजच वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी तसेच गर्दीच्या वेळेत वाहनांची संख्या वाढल्यानंतर काही मिनिटांतच रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने कोंडी अधिकच वाढत जाते.

आज परिस्थिती आणखी गंभीर झाली. वाहनांची मोठी गर्दी झाल्यानंतर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि जवळपास एक तास वाहनांची मोठी कोंडी कायम राहिली. वाहनधारकांना पुढे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अनेक नागरिकांना आपली वाहने रस्त्यावरच थांबवून कोंडी सुटण्याची वाट पाहावी लागली.

कोंडीत रुग्णवाहिकाही अडकली

या वाहतूक कोंडीचे गांभीर्य वाढवणारी बाब म्हणजे रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकली. रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असताना वाहतूक कोंडीमुळे तिचा मार्ग अडवला जाणे ही गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत एखाद्या रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वाहतूक कोंडी ही केवळ वाहनधारकांची गैरसोय नसून आपत्कालीन सेवांनाही त्याचा फटका बसत असल्याने प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

जालना शहर महानगरपालिका झाली; मग वाहतूक प्रश्न कधी सुटणार?

जालना शहराचा महानगरपालिकेत समावेश होऊन शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे का? शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि वाहतूक मार्गांवर भविष्यातील वाढत्या वाहनसंख्येचा विचार करून नियोजन केले जात आहे का? असे अनेक प्रश्न आता जालनेकर उपस्थित करत आहेत.

महानगरपालिका झाल्यानंतर शहराच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र, आजही शहरातील प्रमुख चौकांमध्ये नेहमीचीच वाहतूक कोंडी पाहायला मिळत असल्याने “महानगरपालिका झाली, मग वाहतुकीचा प्रश्न कधी सुटणार?” असा सवाल नागरिक करत आहेत.

चौफुलीवर चलन फाडण्यातच वाहतूक पोलिस व्यस्त?

दरम्यान, शहरातील वाहतूक व्यवस्थेवरून नागरिकांमध्ये आणखी एक संतापाचा सूर उमटत आहे. शहरातील प्रमुख चौकांवर वाहनचालकांना अडवून नियमभंगाचे चलन फाडण्याची कारवाई केली जाते; मात्र, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष वाहतूक कोंडी होत आहे, त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुरेसे नियोजन आणि मनुष्यबळ का दिसत नाही? असा सवाल जालनेकर उपस्थित करत आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यकच आहे; मात्र, त्याचबरोबर वाहतूक सुरळीत ठेवणे आणि नागरिकांना कोंडीतून दिलासा देणे हीदेखील वाहतूक यंत्रणेची जबाबदारी आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

जड वाहनांवर निर्बंध असतानाही प्रश्न कायम

शनी मंदिर चौक परिसरात यापूर्वीही जड वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

दररोजची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केवळ कोंडी झाल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती, जड वाहनांच्या प्रवेशावर प्रभावी नियंत्रण, चौकातील अनधिकृत पार्किंगवर कारवाई, वाहतूक मार्गांचे नियोजन आणि आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे यांसारख्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरातील प्रमुख चौकांवर दररोज वाहतूक कोंडी होत असेल आणि त्यात रुग्णवाहिकेसारखी अत्यावश्यक सेवा अडकत असेल, तर ही बाब केवळ वाहतूक कोंडी म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी आता तरी गांभीर्याने लक्ष घालून शनी मंदिर चौकातील वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी जालनेकरांतून होत आहे.

“दररोजची कोंडी कधी संपणार? रुग्णवाहिका अडकल्यानंतरही प्रशासन जागे होणार नसेल तर आणखी किती गंभीर घटना घडण्याची वाट पाहणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जालना मनपाची धडक कारवाई; भाग्य नगर उड्डाणपुलाखालील १९ अनधिकृत अतिक्रमणे निष्कासित
या कारवाईदरम्यान उड्डाणपुलाखालील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या व इतर स्वरूपाची अतिक्रमणे हटविण्यात आली. मनपाच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाई करत तब्बल १९ अतिक्रमणे हटविल्याने परिसरातील रस्ते व पदपथ मोठ्या प्रमाणात मोकळे झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची ये-जा तसेच वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई
दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणधारकांना यावेळी स्पष्ट आणि कडक इशारा दिला आहे. ज्या ठिकाणी आज अतिक्रमण हटविण्यात आले आहे, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाचा जो खर्च होईल, तो संबंधित अतिक्रमणधारकांकडूनच वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे कारवाईनंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नसल्याचे मनपा प्रशासनाच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.
सार्वजनिक जागा अडवू नका
महानगरपालिका प्रशासनाने शहरातील नागरिक व व्यावसायिकांना सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करू नये, असे आवाहन केले आहे. अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या किंवा इतर साहित्य रस्त्यावर लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील वाढती वाहतूक, अरुंद होत चाललेले रस्ते आणि पादचाऱ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता अतिक्रमण हटाव मोहीम महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने केवळ कारवाई न करता हटविलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठीही नियमित पाहणी करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई
भाग्य नगर उड्डाणपुलाखालील ही धडक कारवाई सहाय्यक आयुक्त श्री. विजय फुलंब्रीकर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख श्री. शोएब खान तसेच स्वच्छता विभाग प्रमुख श्री. सुधीर डहाळे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारवाईमध्ये शुभम जाधव, राहुल हिवाळे, मॅथ्यू चॉको, फेरोज बेग, कादर खान, तुषार लोखंडे, सचिन ढवळे, राधेश्याम लोखंडे, विक्रांत कीर, रावसाहेब लोखंडे, आशिष गायकवाड, सचिन जाधव, मंगेश साठे, अरुण वानखेडे आदी स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच श्री. मोहम्मद अमजद हयात खान, मोकाट कुत्रे निर्बीजीकरण विभागाचे पथक प्रमुख, यांच्यासह महानगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांवरही कारवाई होणार
भाग्य नगर येथील कारवाईनंतर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख मार्ग, चौक, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे, सार्वजनिक जागेवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या व हातगाड्या यांच्यावर सातत्याने कारवाई करण्यात येणार असून, कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसोबतच हटाव मोहिमेचा खर्चही संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.
महानगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे भाग्य नगर परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, शहरातील इतर भागांमध्येही अशाच पद्धतीने प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

‘बटन गोळ्या’ विक्री करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश
जालना जिल्ह्यात मानवी आरोग्यास घातक असलेल्या तसेच एनडीपीएस घटकांचा समावेश असलेल्या गुंगीकारक औषधी व टॅबलेटची विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अशा अवैध व्यवहारांवर लक्ष ठेवून होते.

दरम्यान, 27 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना लक्कडकोट परिसरात एक इसम Alprazolam Tablets IP ALPRAZEP 0.5 या गोळ्यांची पाकिटे बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत जफर अहमद खान मंजुर अहमद खान (वय 75, रा. कारंजा रोड, कटकटपुरा, बीड, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून ALPRAZEP 0.5 या औषधाच्या 11 बॉक्समधील एकूण 6,600 गोळ्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या गोळ्यांची किंमत 19,800 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे गु.र.क्र. 693/2026 अन्वये कलम 123, 278 भारतीय न्याय संहिता तसेच कलम 8(क), 22(अ) एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांच्याकडे सोपविण्यात आला.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध सुरू केला. तपासात या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर सय्यद युसुफ अली सय्यद अली (वय 44, रा. रांजणी, ता. घनसावंगी, जि. जालना) याला रांजणी येथून, तर शिवप्रसाद संतोष बडदमकर (वय 22, रा. सुंद्राईनगर, उघडा महादेव मंदिराजवळ, परभणी) आणि शेख अलीम शेख इस्माईल (वय 27, रा. अपना कॉर्नर, शालीमार, परभणी) यांना परभणी शहरातून ताब्यात घेण्यात आले.

या तिघांकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांचा या प्रकरणातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही गुन्ह्यात अटक करण्यात आली. अशाप्रकारे या प्रकरणात एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना पोलीस कस्टडी रिमांडसह न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींची 1 सप्टेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्यामुळे या टोळीच्या माध्यमातून Alprazolam गोळ्यांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, या गोळ्यांची विक्री कोणाला केली जात होती तसेच या अवैध साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

जालना पोलीसांनी सन 2026 मध्ये अमली पदार्थांचे सेवन करणारे तसेच अमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आतापर्यंत 38 गुन्हे दाखल केले आहेत. या कारवायांमध्ये एकूण 16 लाख 60 हजार 422 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ आणि गुंगीकारक औषधांच्या अवैध विक्रीविरोधात जालना पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, आगामी काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सफौ. सॅम्युअल कांबळे, तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, रुस्तुम जैवाळ, विजय डिक्कर, प्रभाकर वाघ, इरशाद पटेल, अक्रूर धांडगे, प्रदीप करतारे आणि चालक गणपत पवार, सुनील पवार, अशोक जाधवर यांनी केली.

‘बटन गोळ्या’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधांचा तरुणांमध्ये होणारा गैरवापर रोखण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून, या प्रकरणाच्या तपासातून अवैध औषध पुरवठ्याचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

भररात्रीच्या खुनातील मुख्य आरोपीला अवघ्या १२ तासांत बेड्या
दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास झिरो पॉईंट परिसरात निखील पवार याच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या निखीलचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताचा नातेवाईक श्याम पवार यांच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तेगबीरसिंह संधु आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी यांनी आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी आणि चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला वेग दिला. घटनास्थळाची पाहणी, उपलब्ध माहितीचे संकलन, तांत्रिक तपास तसेच गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला.
पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर मुख्य आरोपी संतोष ऊर्फ पिंट्या हरीभाऊ लांडे याचा ठावठिकाणा शोधून काढण्यात आला आणि घटनेनंतर अवघ्या १२ तासांत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
२९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास दि. २९ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे. या खून प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी करीत आहेत.
तणावपूर्ण परिस्थितीत पोलिसांचे संयमाने व्यवस्थापन
खुनाच्या घटनेनंतर झिरो पॉईंट परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चंदनझिरा पोलिसांनी अतिरिक्त दक्षता घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. पोलिसांच्या संयमी आणि कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश आले.
खुनाच्या गुन्ह्याचा वेगाने तपास करून मुख्य आरोपीला काही तासांतच अटक केल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. गुन्हा करून फरार झालेला आरोपी कितीही लपण्याचा प्रयत्न करीत असला, तरी कायद्याच्या कचाट्यातून त्याची सुटका होऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
झिरो पॉईंट परिसरातील अतिक्रमणांवरही संयुक्त कारवाई
दरम्यान, खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर झिरो पॉईंट परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शासकीय मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून हॉटेल, टपऱ्या तसेच विविध अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. त्यामुळे परिसरात गर्दी वाढून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर वाढण्यासह वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता.
या परिस्थितीमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही वाढली होती. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई केली.
या कारवाईत झिरो पॉईंट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे, हॉटेल, टपऱ्या आणि इतर अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. त्यामुळे परिसर मोकळा होऊन वाहतुकीतील अडथळे दूर होण्यास तसेच भविष्यातील अनुचित प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तेगबीरसिंह संधु, अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरण बिडवे, पोउपनि दिगंबर पवार, निता दामधर, पोउपनि सय्यद अफसर, मारीयो स्कॉट, सफौ राजेंद्र ठाकूर, पोहेकॉ प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजू पवार, अभिजीत वायकोस, मदन बहुरे, विशाल लोखंडे, शरद पवार, संतोष वनवे, पोकॉ सागर खैरे, नवनाथ पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोउपनि पवन राजपूत, पोहेकॉ हारुण पठाण यांच्या पथकाने केली.
मुख्य आरोपीला अवघ्या १२ तासांत अटक करण्याबरोबरच तणावपूर्ण परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि झिरो पॉईंट परिसरातील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई करणे, या तिन्ही आघाड्यांवर चंदनझिरा पोलिसांनी केलेली कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे.

बदनापूर तालुक्यात शेतकरी संवाद दौरा; शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत विकासकामांचा आढावा
शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या कष्टाला बळ देण्यासाठी शासनाच्या विविध योजना व विकासकामांचा लाभ प्रत्येक पात्र शेतकरी बांधवापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा विश्वास यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाहीही देण्यात आली.

या दौऱ्यादरम्यान विविध गावांमध्ये स्मशानभूमी बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. गावातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यासोबतच शेतकरी बांधवांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विकासकामांना गती देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

शेतकरी संवादाच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न समजून घेणे, त्यावर प्रशासकीय स्तरावर योग्य कार्यवाही करणे आणि विकासकामांना गती देणे, हा दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता.

यावेळी भाजपा जालना माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, पद्माकर जऱ्हाड, भगवान मात्रे, राजेंद्र बापू जऱ्हाड, तहसीलदार हेमंत तायडे, भगवान बारगाजे, जि. प. उपअभियंता लक्ष्मण राऊत, हरिश्चंद्र बाबा शिंदे, सरपंच सौ. राधाताई शिंदे, उपसरपंच सौ. योगिताताई शिंदे, बाबासाहेब कऱ्हाळे, रवींद्र बोचरे, राधाकिसन शिंदे, विष्णू शिंदे, पुरुषोत्तम जोशी, विनोद मगरे, गणेश कोल्हे, गजानन काटकर, जितेंद्र कुलकर्णी, भरत गारखेडे, बाबासाहेब दिवटे, अजय देशमुख, बजरंग दादा वैद्य, भाऊसाहेब वैद्य, परमेश्वर गोते, दिगंबर वैद्य, विष्णू काटे, सुधीर पवार, विठ्ठल राठोड, ईश्वर जाधव, जुबेर पटेल, अमोल चव्हाण, शंकर घोगरे, सदाशिव कोल्हे, नंदू धोत्रे, सीताराम गोरे, राधाकिसन धोत्रे, खंडूजी काळवणे, नारायण वैद्य, शिवा दादा कोळकर, शरद अवघड, पांडू पल्ले, अनिल कोळकर यांच्यासह संबंधित गावांतील ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा विश्वास, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय आणि विकासाची नवी दिशा!

मंठ्यात पाळीव कुत्र्याला दगड मारण्यावरून वाद; जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
फिर्यादी महिलेने दिलेल्या जबाबानुसार, त्यांच्या घराच्या स्लॅबवर पाळीव कुत्रा भुंकत होता. त्यावेळी शेजारील गल्लीत राहणारा मुस्ताक कुरेशी हा त्यांच्या घरासमोर आला आणि कुत्र्याला दगड मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी फिर्यादी महिलेने त्यांचा मुलाने कुत्रा पाळीव असून तो स्लॅबवर असल्याने चावणार नाही, त्यामुळे त्याला दगड मारू नका, असे सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर मुस्ताक याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्याचे वडील रफीक कुरेशी आणि भाऊ अफरोज कुरेशी हेही तेथे आले. त्यांनी जातीवाचक अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर मुस्ताक, अफरोज आणि रफीक यांनी फिर्यादीच्या मुलाला चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले आहे. मुस्ताक याने बाजूला पडलेला लोखंडी गज हातात घेऊन त्याच्या पाठीवर आणि हातावर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे.
मुलाला सोडविण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची मुलगी मध्ये पडल्या असता मुस्ताक याने फिर्यादी महिलेचा हात धरून ओढल्याचे तसेच त्यांच्या साडीची विटंबना करून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर लोखंडी गजाने फिर्यादीच्या नाकावर मारून त्यांना जखमी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
आईला वाचविण्यासाठी मुलगी मध्ये पडली असता अफरोज आणि रफीक यांनी तिच्या हातावर, छातीवर आणि पाठीवर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे. तसेच या तिघांनी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मोती तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला चंदनझिरा पोलिसांनी वाचविले
सदर महिला मोती तलाव परिसरात आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गेल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पोलीस पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले. पथकाने विलंब न करता घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा अंदाज घेतला.
यावेळी पोलिसांनी कोणतीही घाई किंवा दबाव न आणता महिलेबरोबर शांतपणे संवाद साधला. तिच्या मनातील भावना समजून घेत तिला धीर देण्यात आला. पोलिसांनी कौशल्यपूर्ण संवाद व समुपदेशनाच्या माध्यमातून तिच्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेला महिलेने सकारात्मक प्रतिसाद देत आत्महत्येचा विचार सोडून दिला.
त्यानंतर पोलिसांनी महिलेला सुरक्षितपणे ताब्यात घेत तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. आवश्यक समज देऊन महिलेला सुखरूपपणे तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
संवेदनशील पोलिसिंगचा आदर्श
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर परिसरात मोबाईलच्या मागणीवरून एका तरुणाने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर चंदनझिरा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून एका महिलेचे प्राण वाचविल्याने त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक होत आहे.
या घटनेतून क्षणिक राग, दुःख किंवा नैराश्यात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो; मात्र योग्य वेळी मिळालेला आधार, संवाद आणि समजूतदारपणा एखाद्याचे आयुष्य वाचवू शकतो, हा महत्त्वपूर्ण संदेश समोर आला आहे.
या कारवाईत चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी दाखविलेली तत्परता, संयम, संवेदनशीलता आणि मानवी दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक जालना श्री. तेगबीरसिंह संधु, अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार, मारीयो स्कॉट, सय्यद हुसेन, सफौ मनसुब वेताळ, पोहेकॉ शिवाजी जमधडे, महिला पोहेकॉ रेश्मा गुरुम आणि जया जैस्वाल यांच्या पथकाने केली.

मौजपुरीच्या विकासकामांसाठी डीपीआर तयार करण्याच्या आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या सूचना
आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सोमवारी दुपारी श्री क्षेत्र रामेश्वर मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. मौजपुरी गावातील प्रलंबित विकासकामे तसेच भविष्यात आवश्यक असलेल्या विविध सुविधांबाबत ग्रामस्थांनी आमदार खोतकर यांच्यासमोर मागण्या मांडल्या.

ग्रामस्थांनी गावातील विविध विकासकामांसोबतच जलसंधारणाच्या कामांसाठी विशेष पुढाकार घेण्याची मागणी केली. पावसाचे पाणी अडविणे, जलसाठा वाढविणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे महत्त्वाची असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी आमदार खोतकर यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत विकासकामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आवश्यक विकासकामांचा सविस्तर आराखडा तयार करून त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. विकासकामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गावातील मूलभूत सुविधा, विकासकामे आणि जलसंधारणाच्या माध्यमातून मौजपुरीच्या विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे आमदार खोतकर यांनी सांगितले. ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून संबंधित कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
श्रावण सोमवारच्या निमित्ताने रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्येही यावेळी उत्साहाचे वातावरण होते. आमदार खोतकर यांच्या भेटीवेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने गावाच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायत अधिकार्‍यांच्या सुरक्षेसाठी जालना संघटना आक्रमक; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.बी. काळे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण पवार, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामसभेदरम्यान जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत अधिकार्‍यावर भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित अधिकार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामीण भागातील प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा असून, कामकाज करताना त्यांना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 1 सप्टेंबर रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी सहभागी होणार असून, शासनाने आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामसभांची संख्या कमी करून वर्षातून किमान एकच ग्रामसभा घेण्यात यावी, अशी महत्त्वाची मागणी संघटनेने केली आहे. वारंवार होणार्‍या ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचार्‍यांना विविध प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्रामसभांची संख्या आणि त्याचे नियोजन याबाबत शासनाने फेरविचार करावा, अशी भूमिका संघटनेने मांडली.
तसेच ग्रामसभांसाठी ग्रामपंचायत अधिकार्‍यांना कोणताही अतिरिक्त मोबदला न घेता पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामसभेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अधिकार्‍यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, असे संघटनेचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीची, सरपंचांची तसेच ग्रामपंचायत अधिकार्‍यांची समाजमाध्यमांवर बदनामी करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच कोणताही पुरावा नसताना तक्रारी करून ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकार्‍यांचा अवमान करणार्‍या व्यक्तींवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
ग्रामपंचायत अधिकार्‍यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कामकाजासाठी निर्भय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. निवेदन देताना जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बांधकाम साहित्य चोरीचा पर्दाफाश; टाटा एससह 3 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त
शनिवार दि. 22 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा रोडवरील जनार्धन सिमेंट प्रोडक्टच्या राममूर्ती शिवारातील प्लॉटमधून 29 जुलै रोजी 12 हजार रुपये किमतीचे लोखंडी सळईचे तीन बंडल चोरीला गेले होते. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच 17 ऑगस्ट रोजी बुर्‍हाणनगर येथील एका मोकळ्या प्लॉटमधून 60 हजार रुपये किमतीच्या 32 सेट्रिंग प्लेट आणि 20 हजार रुपये किमतीचे 20 लोखंडी पाईप चोरीला गेले होते. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना 22 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ज्वालासिंग रामसिंग कलाणी याने काही दिवसांपूर्वी लोखंडी सळईचे बंडल, सेट्रिंग प्लेट आणि लोखंडी पाईप एमआयडीसी परिसरातील भंगार दुकानदारास विकल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी ज्वालासिंग कलाणी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरीचा माल गणेश नारायण कोल्हे याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गणेश कोल्हे यालाही ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन, 12 हजार रुपये किमतीचे लोखंडी सळईचे तीन बंडल, 16 हजार रुपये किमतीच्या 32 सेट्रिंग प्लेट आणि 20 हजार रुपये किमतीचे 20 लोखंडी पाईप असा एकूण 3 लाख 48 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अटक आरोपींमध्ये ज्वालासिंग रामसिंग कलाणी (वय 45, रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना) आणि गणेश नारायण कोल्हे (वय 30, रा. शिवाजीनगर म्हाडा कॉलनी, जालना) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ तसेच पोलिस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, इरशाद पटेल, कैलास खार्ड, रमेश काळे, योगेश सहाने, धीरज भोसले, सोपान क्षीरसागर आणि अशोक जाधवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

घरफोडीसाठी मोटारसायकली, कटर, तलवारीचा वापर; घरफोडीच्या चार गुन्ह्यांतील फरार आरोपी जेरबंद;
विजयसिंग कृष्णासिंग भादा (वय ४३, रा. वलीमामुदर्गा, जालना) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या चार गुन्ह्यांमध्ये गुन्हा घडल्यापासून फरार होता.

दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदर बाजार पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आरोपींचा शोध आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस निरीक्षक संदीप भारती यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी विजयसिंग भादा हा वलीमामुदर्गा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिस पथकाने दोन पंचांसह परिसरात शोध घेतला. पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपी लाल रंगाच्या मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने मंठा चौफुली परिसरातून आकाशी रंगाची शाईन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. ही मोटारसायकल पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जप्त केली. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

आरोपीने घरफोडीचे गुन्हे करताना वापरलेल्या दोन मोटारसायकली, एक धारदार तलवार, चोरी करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर, ग्राइंडर मशीन आणि विद्युत कटर मशीन असा एकूण १ लाख ६७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात घरफोडीचे चार गुन्हे दाखल असून, त्यातील कलमांनुसार त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील सचिन सानप, जगन्नाथ कानडजे, तानाजी कानुरे, जगन्नाथ जाधव, भगवान मुंजाळ, दुर्गेश गोफणे, अजीम शेख, राहुल कटकम, संदीप गोतीस, धनाजी लोंढे आणि मगरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

जालन्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; ३ सप्टेंबरला ‘इंडस्ट्रियल समिट २०२६’
यावेळी जालना फस्ट चे अध्यक्ष गोविंद गोयल, उपाध्यक्ष शुभम सोनी, सह सचिव आयुष बंसल, पीआरओ राहुल अग्रवाल यांची उपस्थिती होती.

जालन्यात नव्याने कार्यान्वित झालेल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क (MMLP/ड्राय पोर्ट)चा स्थानिक उद्योगांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे हा या समिटचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. जालन्यातून निर्यात-आयात वाढविणे, लॉजिस्टिक्सचा खर्च व वेळ कमी करणे, नवीन उद्योगांना आकर्षित करणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, या उद्देशाने समिटचे आयोजन करण्यात आले आहे.

https://twitter.com/SPrabhat72222/status/2091156186393628939?s=20

या समिटसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे (JNPA) अध्यक्ष गौरव दयाल (IAS) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह (IAS) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत (IAS), दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध नामांकित औद्योगिक समूहांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

समिटमध्ये जालना MMLP/ड्राय पोर्टवर स्वतंत्र की-नोट सत्र आणि पॅनेल चर्चा होणार आहे. यामध्ये जालन्यातून थेट निर्यात-आयात वाढविण्याच्या संधी, कंटेनर व मल्टी-मोडल कार्गो वाहतूक, JNPA आणि देश-विदेशातील बाजारपेठांशी कनेक्टिव्हिटी, रेल्वे मालवाहतूक, वेअरहाउसिंग, फ्रेट, ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील नव्या व्यवसायाच्या संधी यावर विचारमंथन होणार आहे.

https://twitter.com/SPrabhat72222/status/2091156343097102827?s=20

नवीन औद्योगिक गुंतवणुकीवरही समिटमध्ये विशेष भर दिला जाणार आहे. स्टील व स्टील अॅन्सिलरीज, ऑटोमोबाईल व ऑटो अॅन्सिलरीज, अभियांत्रिकी, कृषी प्रक्रिया, बियाणे, सिल्क, ऊर्जा, लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग आणि उत्पादन क्षेत्रातील संभाव्य गुंतवणूकदारांना जालन्यातील उपलब्ध संधींची माहिती देण्यात येणार आहे.

उद्योग आणि शासन यांच्यात थेट संवाद घडवून आणणे, हा देखील समिटचा महत्त्वाचा उद्देश आहे. जमीन, MIDC पायाभूत सुविधा, वीज, पाणी, रेल्वे कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक्स, निर्यात सुविधा आणि उद्योग सुलभीकरणाशी संबंधित प्रश्नांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्याची संधी उद्योग प्रतिनिधींना मिळणार आहे.

समिटमध्ये MMLPवरील की-नोट व पॅनेल चर्चा, JNPAचे विशेष संबोधन, MIDC CEO यांचे संबोधन, नवीन औद्योगिक गुंतवणुकीवरील सत्र, रेल्वे कनेक्टिव्हिटीवरील मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तर सत्रांचा समावेश आहे. कार्यक्रमानंतर सहभागी प्रतिनिधींसाठी जालना MMLP/ड्राय पोर्टची विशेष भेटही आयोजित करण्यात आली आहे.

या समिटला Vikas Group of Companies यांचे Lead Sponsor म्हणून सहकार्य लाभले आहे. जालन्याची पारंपरिक स्टील, बियाणे, कृषी प्रक्रिया, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील औद्योगिक ताकद, समृद्धी महामार्ग, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि MMLP या सुविधांचा एकत्रित उपयोग करून जालना भविष्यात महाराष्ट्रातील महत्त्वाचे मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात केंद्र म्हणून विकसित होऊ शकते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

जालना व मराठवाड्यातील उद्योगपती, निर्यातदार, आयातदार, उद्योजक, MSMEs, स्टार्टअप्स, लॉजिस्टिक्स सेवा प्रदाते, ट्रान्सपोर्टर्स, वेअरहाउसिंग कंपन्या आणि संभाव्य गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जालना फर्स्ट आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.