परतूर पोलीस ठाण्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात उपोषण तीव्र; सहाव्या दिवशी आंदोलनकर्त्यांचा इशारा

आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published By Shubh Prabhat
On

परतूर पोलीस ठाण्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात मातंग मुक्ती सेनेचे आमरण उपोषण सहाव्या दिवशी अधिक तीव्र झाले असून, प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व विष्णू गोफणे करत असून, त्यांनी परतूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी गजानन राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सट्टा, जुगार तसेच अवैध वाळू व्यवसायातून हप्ते वसुली केल्याचा आरोप करत त्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करून तात्काळ विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


@ShubhPrabhatTVजालन्यातील परतूर पोलीसावर गंभीर आरोप | एका जनाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण | हप्ते वसूल
#breakingnews #jalna #jalnanews #jalnapolice #maharashtranews #jalnaviralvideo #news #शुभप्रभात #marathinews #shubhprabhat

Indian_Fast

दरम्यान, या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले असून, संबंधित पोलिस अधिकार्‍याने उपोषणस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोपही विष्णू गोफणे यांनी केला आहे. या आरोपांमुळे आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आज सहाव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती माध्यमांसमोर मांडली. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, संबंधित पोलिसावर कठोर कारवाई होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. तसेच, प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुढील काळात मोर्चे व तीव्र निदर्शने करण्यात येतील आणि गरज पडल्यास मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन मंत्र्यांसमोर उपोषण केले जाईल.

या गंभीर आरोपांमुळे पोलीस विभागाची प्रतिमा पुन्हा चर्चेत आली असून, जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तातडीने निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज