महाराष्ट्र

जालन्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; ३ सप्टेंबरला ‘इंडस्ट्रियल समिट २०२६’

जालन्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; ३ सप्टेंबरला ‘इंडस्ट्रियल समिट २०२६’
जालना : जालना जिल्ह्याच्या औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षमतेला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने जालना फर्स्ट आणि जिल्हा प्रशासन, जालना यांच्या सहकार्याने ‘इंडस्ट्रियल समिट २०२६’चे आयोजन ३ सप्टेंबर २०२६ रोजी हॉटेल सिद्धार्थ द फर्न, जालना येथे करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या या समिटमध्ये जालना आणि मराठवाड्यातील औद्योगिक विकास, नवीन गुंतवणूक, निर्यात-आयात, लॉजिस्टिक्स आणि रोजगारनिर्मितीवर सविस्तर चर्चा होणार आहे, अशी माहिती जालना फस्ट च्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
Read More...

सिल्क, सीड आणि स्टीलची सिटी म्हणून आता जालना जिल्हा ओळखला जाणार : मुख्यमंत्री फडणवीस

जालना / प्रतिनिधी : जालना जिल्ह्याची ओळख आता ‘सिल्क, सीड आणि स्टील’ अर्थात ‘ट्रिपल एस सिटी’ म्हणून निर्माण झाली असून, रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात नव्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. कापूस आणि सोयाबीन या पारंपरिक नगदी पिकांना पर्याय म्हणून रेशीम शेतीला प्रोत्साहन देतानाच उत्पादनापासून प्रक्रिया, वस्त्रनिर्मिती, ब्रँडिंग आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी जालन्यात विकसित करण्यावर शासनाचा भर आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही अधिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊन जालना देशातील महत्त्वाचे रेशीम केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र  जालना 
Read More...

जालना हादरले; खडकपुरा येथील 24 वर्षीय तरुणाचा खून; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह पथक घटनास्थळी

जालना : शहरातील खडकपुरा येथील एका 24 वर्षीय तरुणाचा जालना शहर महानगरपालिकेच्या जवळील रोडवर खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयूर मेंढरे (वय 24, रा. खडकपुरा, जालना) असे मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र  जालना  शहरे  क्राईम 
Read More...

उशिरा घेतलेली जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या जखमांचे उत्तर कोण देणार?

२५ जुलै २०२६ रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा केवळ एका मंत्र्याच्या पदत्यागाची घटना नसून, गेल्या ३६ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतल्याचे प्रतीक म्हणून पाहिला जात आहे. या आंदोलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार हा लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे.
महाराष्ट्र  संपादकीय 
Read More...

बेपत्ता तरुणाच्या हत्येचा वर्षभरानंतर उलगडा; आर्थिक व्यवहारातून मित्रानेच केला खून; डीएनए अहवालाने मृतदेहाची ओळख पटली

जालना : तालुका पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२५ मध्ये बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तब्बल वर्षभरानंतर उलगडा झाला असून, आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून त्याच्या मित्रानेच गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुधना नदीत फेकल्याचेही समोर आले असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र  क्राईम 
Read More...

समृद्धी महामार्ग प्रकरणाला मोठे वळण; ‘ॲपको’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

जालना,  प्रतिनिधी : जालना–नांदेड समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान कथित अवैध मुरूम उत्खनन, शासनाच्या महसुलाचे नुकसान आणि कामाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून कंत्राटदार ॲपको इन्फ्राटेक कंपनी व संबंधितांविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र  जालना 
Read More...

महिला संघटित झाल्या तर परिवर्तनाची नवी क्रांती घडते - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना : महिलांना एकत्र आणणे हे आव्हानात्मक काम असले, तरी त्या संघटित झाल्यानंतर समाजपरिवर्तनाची नवी क्रांती घडू शकते. महिलांनी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास घडविला असून, हाताच्या बोटांप्रमाणे वेगवेगळे असलेले विचार एकत्र आले की जशी शक्ती निर्माण होते, त्याचप्रमाणे महिला एकजूट ही समाजाच्या विकासासाठी मोठी ताकद आहे, आणि त्यातून  परिवर्तनाची नवी क्रांती घडते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
महाराष्ट्र  जालना  शहरे 
Read More...

दुर्गम गावात जिल्हाधिकाऱ्यांची घोंगडी बैठक; श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी थेट ऐकल्या ग्रामस्थांच्या समस्या

ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी प्रशासकीय कामकाजाला लोकाभिमुख स्वरूप देत दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. कार्यालयातील दालनात बसून कामकाज करण्याऐवजी त्यांनी थेट गावकऱ्यांच्या दारी जाऊन घोंगडी बैठक घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र 
Read More...

शववाहिका असतानाही मृतदेहाची विटंबना; कचर्‍याच्या गाडीतून युवकाचा मृतदेह; प्रशासनाच्या कारभारावर संताप

परतूर शहरात एका युवकाचा मृतदेह नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणार्‍या वाहनातून शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदार तसेच असंवेदनशील कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र 
Read More...

अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात; ६ लाख ४० हजाराची लाच घेताना अटक

जालना जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाला हादरा देणाऱ्या कारवाईत अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मासिक हप्त्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केल्याचा आरोप असून, छत्रपती संभाजीनगर येथे ही धडक कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र 
Read More...

पत्नीचा गळा आवळून सदोष मनुष्यवध; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

जालना, दि. 28 : पत्नीचा रुमालाने गळा आवळून सदोष मनुष्यवध केल्याप्रकरणी आरोपी गजानन हरिभाऊ कावळे (रा. भाटेपुरी, ता. जि. जालना) याला मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी दोन वर्षे सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
महाराष्ट्र 
Read More...

रोजगार हमी योजनेतील विहिरींची बिले रखडली; शेतकर्‍यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ

जालना, प्रतिनिधी : जालना तालुक्यातील ढगी, बोरगाव आणि खांबेवाडी शिवारातील अनेक शेतकर्‍यांची रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची बिले गेल्या अनेक महिन्यांपासून अडकवून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. आर्थिक लाभ मिळत नसल्यानेच संबंधित अधिकार्‍यांकडून विहिरींचे मस्टर काढले जात नसल्याचा आरोप शेतकरी करत असून या प्रकारामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे.
महाराष्ट्र 
Read More...