मनपाच्या घनवन प्रकल्पाला आग; कचर्‍याला लागलेल्या आगीमुळे झाडांचे नुकसान; आगीचे वारंवार प्रकार होत असल्याची चिंता

या प्रकारामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते.

Published By Shubh Prabhat
On

शहरातील सदर बाजार परिसरातील ईदगाह पांजरपोळ जवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साचलेल्या कचर्‍याला आग लागल्याची घटना घडली असून, यात झाडांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते.

सदर बाजार परिसरातील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात सुकलेला पालापाचोळा व कचरा साचलेला होता. याच कचर्‍याला अचानक आग लागली. आगीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या झाडांना झळ बसून त्यांची हानी झाली. काही झाडांच्या फांद्या जळून खाक झाल्याचे दिसून आले.

या घटनेमुळे परिसरात धुराचे लोट निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, काही ठिकाणी जाणूनबुजून कचर्‍याला आग लावली जात असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

https://www.instagram.com/reel/DXU3DdLjjeq/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

Indian_Fast

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मनपा हद्दीत ठिकठिकाणी साचलेल्या कचर्‍यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. सुकलेल्या पालापाचोळ्यामुळे आग पटकन पसरते आणि त्याचा परिणाम झाडांवर व पर्यावरणावर होतो. तसेच, धुरामुळे वायूप्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

या प्रकारामुळे मनपा प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वेळोवेळी कचरा उचलला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच, कचर्‍याला आग लावणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कचरा व्यवस्थापन सुधारावे, तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज