गॅस तुटवड्यामुळे नागरिक हैराण; एजन्सी कार्यालयांसमोर मोठी गर्दी

अनेक ठिकाणी नागरिक सकाळपासून गॅस एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Published By Shubh Prabhat
On

जालना - आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता देशांतर्गत गॅस पुरवठ्यावरही दिसून येत आहे. गॅसच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणीमुळे अनेक ठिकाणी गॅसची कमतरता भासत असून गॅस एजन्सी आणि वितरण कार्यालयांपुढे नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठा साखळीवर होत आहे. परिणामी काही भागांमध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा मंदावला असून ग्राहकांना सिलेंडरसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिक सकाळपासून गॅस एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गॅसचा पुरवठा मर्यादित प्रमाणात होत असल्याने एका सिलेंडरनंतर पुढील बुकिंगसाठी देखील काही दिवसांची प्रतिक्षा करावी लागत असल्याची तक्रार ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काही ग्राहकांनी ऑनलाईन बुकिंग करताना देखील अडचणी येत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Indian_Fast

दरम्यान, संबंधित गॅस वितरकांकडून उपलब्ध साठ्यानुसार नागरिकांना सिलेंडर देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर परिस्थिती सुरळीत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या गॅसच्या कमतरतेमुळे नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असला तरी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि पुरवठा यंत्रणा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज