जालना

जालना हादरले; खडकपुरा येथील 24 वर्षीय तरुणाचा खून; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह पथक घटनास्थळी

जालना हादरले; खडकपुरा येथील 24 वर्षीय तरुणाचा खून; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह पथक घटनास्थळी
जालना : शहरातील खडकपुरा येथील एका 24 वर्षीय तरुणाचा जालना शहर महानगरपालिकेच्या जवळील रोडवर खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयूर मेंढरे (वय 24, रा. खडकपुरा, जालना) असे मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Read More...

आंदोलकांना गुन्हेगारांसारखी वागणूक देऊन सरकारने सिद्ध केलेल्या क्रूर मानसिकतेचे काय ? : अरविंद देशमुख

जालना | प्रतिनिधी : देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करून, परीक्षा प्रणालीचा पार बोजवारा उडवल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, हा राजीनामा म्हणजे पश्चात्ताप नसून, स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानवीय लाठीमार करून आणि त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देऊन या सरकारने सिद्ध केलेल्या आपल्या क्रूर मानसिकतेचे काय,  36 दिवस झालेले आंदोलन, अ मानवीय मारहाण पाहता, सरकारला नेमके काय सिद्ध करायचे होते, आधीच राजीनामा दिला असता तर काय बिघडले असते, असा संतप्त प्रश्न मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
जालना  शहरे 
Read More...

नंदापूरच्या रमाई नगर दलित शेतवस्तीकडे जाणारा रस्ता चिखलमय; वर्षानुवर्षे नागरिकांची फरफट

जालना, प्रतिनिधी : जालना तालुक्यातील नंदापूर येथील रमाई नगर दलित शेतवस्तीकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, थोडासा जरी पाऊस पडला तरी संपूर्ण रस्ता चिखलमय होत असल्याने येथील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अंदाजे ५० घरांची रमाई नगर वस्ती या रस्त्यावर अवलंबून असून, वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जालना  शहरे 
Read More...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात 21 जुलैला जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा; आयोजकाची माहिती

अनुसूचित जातींमधील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या विरोधात जालना जिल्ह्यातील आंबेडकरी समाज आणि अनुसूचित जातीतील 59 जातींच्या संयुक्त वतीने मंगळवार, दि. 21 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती रविवार दि. 19 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जालना  शहरे 
Read More...

मूर्ती दरवाजाच्या पाडकामानंतर आता महानगरपालिकेची नजर दर्गाह दरवाजावर;

जालना महानगरपालिकेचे उपायुक्त त्रिंबक कांबळे यांनी 15 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार्‍या पाडकाम कारवाईच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांना अधिकृत पत्र पाठविले आहे. बुधवार दि. 15 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या पत्राद्वारे कादराबाद येथील दर्गाह दरवाजावरील पाडकाम कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता राखण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जालना  शहरे 
Read More...

घर दाखविण्याच्या बहाण्याने शेतकर्‍याची अश्लील छायाचित्रे काढली;

घर खरेदीसाठी दाखविण्याचा बहाणा करून एका शेतकर्‍याला जाळ्यात ओढत महिलेसह तिघांनी मारहाण करून अश्लील छायाचित्रे काढली, ती प्रसारित करण्याची धमकी देत 75 हजार रुपये, सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेतल्या तसेच वाहनाचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवार दि. 15 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात महिलेसह तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जालना  शहरे 
Read More...

अंबड रोडवर भटक्या कुत्र्यांचा हैदोस; हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती; 

जालना शहरातील अंबड रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी जालना महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जालना  शहरे 
Read More...

डॉ. सुशील सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त नंदापूर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

जालना/ दशरथ वाकोडे : दि. 11 जुलै 2026 : रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जालना तालुक्यातील नंदापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि शिक्षणाबद्दल प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
जालना  शहरे 
Read More...

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उत्साहात रॅली संपन्न

जालना : दि.११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कुंटूंब नियोजन पध्दतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी व सतत वाढणा-या लोकसंख्येच्या दुष्यपरिणामांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने डॉ.जयश्री भुसारे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन  करण्यांत आले होते.
जालना  शहरे 
Read More...

जालना जिल्ह्यात सुरू आहे ‘मापात पाप’! वजने व मापे विभागाचे कार्यालय नेमके कुठे? नव्वद टक्के नागरिक अनभिज्ञ; ग्राहकांची लूट सुरू असताना विभागाची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात

जालना/प्रतिनिधी : ग्राहकाला योग्य वजनात आणि योग्य मापात वस्तू मिळावी, व्यापारी व विक्रेत्यांकडून वजनात फसवणूक होऊ नये आणि ग्राहकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी स्वतंत्र वजने व मापे विभाग कार्यरत आहे. मात्र जालना जिल्ह्यात हा विभाग खरोखर कार्यरत आहे की केवळ कागदावरच अस्तित्वात आहे, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. जालना शहरातील जवळपास नव्वद टक्के नागरिकांना या विभागाचे कार्यालय नेमके कुठे आहे, अधिकारी कोण आहेत, तक्रार कुठे करायची आणि फसवणूक झाल्यास कोणाकडे दाद मागायची, याची माहितीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
जालना  शहरे 
Read More...

परभणीतील तिघांनी जालन्यातून डुकरांची चोरी केल्याचा आरोप

जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना परिसरातून डुकरांची चोरी केल्याप्रकरणी परभणी येथील तिघांविरुद्ध मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका संशयिताला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले असून त्याच्याकडून चोरीची दोन डुकरे, एक बकरी, दोन बकरीची पिल्ले तसेच कार जप्त करण्यात आली आहे. उर्वरित दोघेजण घटनास्थळावरून पसार झाले.
जालना  शहरे 
Read More...

जालना पोलिसांचा वाळूमाफियांना दणका; ७१ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त

जालना | प्रतिनिधी : गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळूचा उपसा करून तिची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंज गावाच्या शिवारात मध्यरात्री छापा टाकून पोलिसांनी तब्बल ७१ लाख ५१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच वाहनचालक वाहने जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
जालना  शहरे 
Read More...