राज्य कर्मचारी संघटनेच्या संपावर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा बहिष्कार; जिल्हा परिषद कर्मचार्याचे नियमित कामकाज सुरु
एकतर्फी निर्णयामुळे कर्मचारी संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 21 एप्रिलपासून पुकारण्यात आलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांच्या अनिश्चितकालीन संपाला सुरुवात होण्याआधीच संघटनांमध्ये मतभेद उघड झाल्याने आंदोलनात फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे.
या संपाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आंदोलन तीव्र हाण्या ऐवजी भरटकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या कर्मचार्यांनी सकाळपासूनच कर्तव्यावर हजर होत संपावर बहिष्कार घातला. राज्य कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष विश्वास काटकर यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे कर्मचारी संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/reel/DXYs9cfCGDf/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने संपावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, प्रशासन विभागासह सर्व संवर्गातील कर्मचारी 21 एप्रिलच्या संपात सहभागी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आज जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांचे सुरळीत कामकाज सुरु आहे.
@ShubhPrabhatTVजालन्यातील परतूर पोलीसावर गंभीर आरोप | एका जनाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण | हप्ते वसूल
#breakingnews #jalna #jalnanews #jalnapolice #maharashtranews #jalnaviralvideo #news #शुभप्रभात #marathinews #shubhprabhat


