जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्‍यांचा बेमुदत संप; शासकीय कामकाजावर परिणाम संभाव्य

शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

Published By Shubh Prabhat
On

राज्यातील शासकीय गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचार्‍यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजेपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  या संदर्भात राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने पूर्वसूचना (नोटीस) देण्यात आली आहे.

महासंघाच्या निवेदनानुसार, विविध मागण्यांसाठी यापूर्वीही शासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता. यामध्ये 17 फेब्रुवारी 2025, 16 एप्रिल 2025, 21 जुलै 2025 आणि 16 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री यांना सविस्तर पत्रे पाठवण्यात आली होती. तसेच 7 एप्रिल 2026 रोजीही महासंघाच्या वतीने पुन्हा निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणताही ठोस व समाधानकारक निर्णय न झाल्यामुळे अखेर संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Indian_Fast

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विविध आंदोलनात्मक कार्यक्रम राबवण्यात आले होते. तरीही शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील वर्ग 4 कर्मचारी हे 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून काम बंद आंदोलन करत संपात सहभागी झाले आहेत. या संपाचा परिणाम शासकीय कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता असून नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, शासनाने लवकरात लवकर कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज