कदीम जालना पोलिसांची कारवाई; संभाव्य हल्ला उधळला, धारदार सुर्यासह तरुण ताब्यात

कदीम जालना पोलीस पथक रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत होते.

Published By Shubh Prabhat
On

कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात गस्तीदरम्यान कारवाई करत संभाव्य हल्ला उधळून लावला.  जुन्या वादातून सूड उगवण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला धारदार सुर्यासह ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 11:30 वाजता पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत कदीम जालना पोलीस पथक रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका इसमाकडे धारदार शस्त्र असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याची ओळख रेहान सय्यद रा. माळीपुरा, जुना जालना अशी पटली. अंगझडतीदरम्यान त्याच्या कमरेला धारदार सुरा आढळून आला. हा सुरा जप्त करण्यात आला.

Indian_Fast

प्राथमिक चौकशीत संबंधित तरुणाने जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने हा सुरा बाळगल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोरे तसेच पोलीस कर्मचारी सदा राठोड, सचिन चौधरी, बाबा गायकवाड, मतीन शेख, दिलीप गायकवाड, अजिम अंसारी, धम्मपाल सुराडकर आणि दीपक अंभोरे यांचा सहभाग होता.
सदर प्रकरणाचा पुढील तपास कदीम जालना पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.

प्रतिनिधी

टॉप न्यूज