दरेगावात मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात

या शिबिरात जनरल तपासणी, हृदयरोग तपासणी, दंत तपासणी, बीपी, शुगर व वजन तपासणी अशा विविध सेवा नागरिकांना मोफत देण्यात आल्या.

Published By Shubh Prabhat
On

दरेगाव (ता. जि. जालना) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दरेगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, दरेगाव यांच्या वतीने शनिवारी (दि. 11 एप्रिल 2026) सकाळी 9 ते 12 या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात जनरल तपासणी, हृदयरोग तपासणी, दंत तपासणी, बीपी, शुगर व वजन तपासणी अशा विविध सेवा नागरिकांना मोफत देण्यात आल्या. दिपक हॉस्पिटल, जालना यांच्या सहकार्याने डॉ. फारुकी (एमबीबीएस, एमडी मेडिसिन) यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन केले. तपासणीनंतर नागरिकांना मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले.

दरेगाव परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. तसेच जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी रक्तदान करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Indian_Fast

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आशिष वावळे (बीडीएस, एमडीएस डेंटल सर्जन), डॉ. ईशान (एमबीबीएस), शारदा राजुरकर, बाबासाहेब काठोरे (प्रशासकीय अधिकारी, ब्लड बँक जालना) उपस्थित होते. तसेच सतिश वाहुळे (जिल्हा कोषाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तथा अध्यक्ष संघर्ष ब्लड डोनर ग्रुप दरेगाव), कपील विलास वाहुळे (अध्यक्ष, जयंती उत्सव समिती) यांच्यासह राजू झिने, बाळू वाहुळे, विशाल वाहुळे, विश्वनाथ ढवळे, माजी सरपंच जनार्दन चौधरी, कैलास वाहुळे, मजीत ढवळे, गणेश ढवळे, ज्ञानेश्वर ढवळे, विनोद वाहुळे, सचिन वाहुळे, दिलीप मगरे, जयकुमार मगरे, एकनाथ झिने, रविंद्र आठवले, मुरलीधर वाहुळे, शिवाजी वाहुळे, अंकुश वाहुळे, दयासागर जाधव, मजीत झिने, संदीप मगरे, सचिन जाधव, कृष्णा गायके, ढगे, मंगेश शेळके, कल्पना झिने आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जनजागृती होऊन नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज