अल्पवयीन मुलीच्या खुनप्रकरणी वडील व चुलत्याला जन्मठेप; जालना न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

17 वर्षीय मुलीचा खून करून तिचा मृतदेह शेतातच जाळून पुरावा नष्ट केल्याचे समोर आले.

Published By Shubh Prabhat
On

जालना : अल्पवयीन मुलीचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वडील व चुलत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावत मा. जिल्हा व सत्र न्यायालय, जालना यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ही घटना पिरपिंपळगाव शिवारातील भातखेडा परिसरातील असून न्यायालयाने आरोपी संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे यांना दोषी ठरवले.

13 डिसेंबर 2022 रोजी घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना पेट्रोलिंगदरम्यान मिळाली. त्यानुसार आरोपींनी त्यांच्या 17 वर्षीय मुलीचा खून करून तिचा मृतदेह शेतातच जाळून पुरावा नष्ट केल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 201 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


@ShubhPrabhatTVजालन्यात लाव्हारस? अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये काय झालं सत्य समोर पहा पूर्ण व्हिडिओ | Jalna News
#breakingnews #jalna #jalnanews #jalnaviralvideo #maharashtranews #jalnapolice #marathinews #news #शुभप्रभात #shubhprabhat

Indian_Fast

तपासादरम्यान मयत मुलीची राख, जळालेली हाडे, दात तसेच आरोपींचे कपडे व मोटारसायकल जप्त करण्यात आली. तपासात समोर आले की, मुलीचे गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. ती घरातून निघून गेल्याने आरोपींना अपमान वाटला. नंतर मुलगी परत आल्यानंतर तिचे लग्न लावण्याचा प्रयत्न झाला; मात्र वाद झाल्याने आरोपींनी तिला घरी आणून मारहाण केली व कडुलिंबाच्या झाडाला फाशी देऊन तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यात आला.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, घटनास्थळ पंच, मुलीचा मित्र रामेश्वर तसेच शेवटचे मुलीला आरोपींसोबत पाहणारे साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. अतिरीक्त सरकारी अभियोक्ता शशांक रा. ढोकरट यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला.

सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहीते यांनी आरोपींना भादंवि कलम 302 अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी 10 हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कलम 201 अंतर्गत तीन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

https://www.instagram.com/reel/DW-2kEpCHBn/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने काम केले.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज