आयएमए हॉलमधील काँग्रेस बैठकीत वाद; नंदा पवार-राजाभाऊ देशमुख आमनेसामने

या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले

Published By Shubh Prabhat
On

जालना शहरातील आयएमए हॉल येथे काँग्रेस पदाधिकार्‍यांची ‘संघटन सृजन’ अभियानची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीदरम्यान महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राहिलेल्या आणि सध्या निलंबीत असलेल्या नंदा पवार आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यात झालेल्या वादामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले.

या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. महिला आघाडीच्या नंदा पवार यांना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळी भाजपला मदत केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली होती. या निर्णयामुळे नाराज झालेल्या नंदा पवार यांनी या संदर्भात जाब विचारण्यासाठी संबंधित बैठकीत हजेरी लावली.


@ShubhPrabhatTV ग्राम महसूल अधिकारी भडकले | वरिष्ठांना निवेदन देत उचलला टोकाचा पाऊल | काय केलं नेमकं पहा व्हिडिओ...
#shubhprabhat #jalna #news #शुभप्रभात #maharashtranews #jalnanews #breakingnews #jalnapolice #jalnaviralvideo #marathinews

Indian_Fast

बैठकीदरम्यान नंदा पवार यांनी आपल्या निलंबनाबाबत स्पष्टीकरण मागितले असता त्यांच्यात आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यात तीव्र शाब्दिक वाद झाला. काही काळ वातावरण तापले असून, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले. परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मात्र उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला.

https://www.instagram.com/reel/DW-2kEpCHBn/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

विशेष म्हणजे, ही घटना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घडल्याने तिचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणी पक्षश्रेष्ठी पुढे कोणती भूमिका घेतात, तसेच निलंबनाबाबत पुढील निर्णय काय होतो याकडे काँग्रेस कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज