Video-सिरसवाडी येथे झोपलेल्या तरुणावर चाकू हल्ला करुन खून; काही तासांत आरोपी जेरबंद
पोलीस कर्मचारी मदन गायकवाड यांची कारवाई
Published By Shubh Prabhat
On
जालना तालुक्यातील सिरसवाडी गावात शेत वस्तीवर घरासमोर झोपलेल्या तरुणावर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात निखिल वाघमारे या तरुणाचा मृत्यु झाला आहे. त्याला गंभीर जखमी असताना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल वाघमारे हा त्यांच्या शेतातील वस्तीवर घरासमोर झोपलेला असताना अज्ञात व्यक्तीने अचानक त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि पळून गेला. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.
https://www.instagram.com/reel/DW-2kEpCHBn/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==


