जालना शहरात अनधिकृत झेंडे-बॅनर प्रकरण; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

सदर बाजार पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

Published By Shubh Prabhat
On

जालना : शहरातील आस्था हॉस्पिटल चौक व रिलायन्स मार्ट चौक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे झेंडे व बॅनर लावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणी कारवाई सुरू केली असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

याबाबत शामसन छबुराव कसबे (वय 52), सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख तथा बांधकाम निरीक्षक, महानगरपालिका जालना यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी 12.30 ते 4 वाजेच्या दरम्यान प्रभारी स्वच्छता निरीक्षक मॅथ्यू वर्गीस चाको यांनी संभाजीनगर विभागात पाहणी केली असता, आस्था हॉस्पिटल चौक व रिलायन्स मार्ट चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतरित्या भगवा व निळा झेंडा तसेच लोखंडी पाटी उभारलेली आढळून आली. तसेच संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे बॅनरही अज्ञात व्यक्तींनी लावल्याचे निदर्शनास आले.

Indian_Fast

ही बाब लोकसेवकांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारी असल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित अहवाल महानगरपालिकेकडे सादर करण्यात आला. त्यानंतर अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223, 285 तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 313 व 314 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे शहरात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज