पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेला लुटले; 1 लाख 40 हजाराच्या सोन्याच्या पाटल्या लंपास
सकाळी सुमारे 7.30 वाजेच्या सुमारास कॉलनीतील रस्त्यावर फेरफटका मारत असताना ही घटना घडली.
Published By Shubh Prabhat
On
जालना शहरातील यशवंत नगर परिसरात पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात इसमांनी वृद्ध महिलेला फसवून तिच्या हातातील सोन्याच्या पाटल्या लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कमलबाई दिलीपराव हिवाळे रा. यशवंत नगर, जालना यांनी फिर्याद दिली आहे. त्या सकाळी सुमारे 7.30 वाजेच्या सुमारास कॉलनीतील रस्त्यावर फेरफटका मारत असताना ही घटना घडली.
दरम्यान, काचेच्या बांगड्या काढण्यास सांगून महिलांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात आले आणि संधी साधून त्या दोघांनी सोन्याच्या पाटल्या घेऊन पळ काढला. काही वेळाने प्रकार लक्षात येताच महिलेनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र आरोपी सापडले नाहीत. सदर घटनेत अंदाजे 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या पाच तोळ्यांच्या दोन सोन्याच्या पाटल्या लंपास झाल्या आहेत. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


