नवीन मोंढा भागातून बांधकाम साईटवरून 64 हजारांच्या लोखंडी सळ्यांची चोरी; सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
साईटची पाहणी करून वॉचमन पंडीत अंभोरे यांना लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
Published By Shubh Prabhat
On
जालना : शहरातील नवीन मोंढा रोड परिसरात असलेल्या रॉयल लिव्हिंग सोसायटीतील बांधकाम साईटवरून लोखंडी सळ्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत दत्ता कारभारी गव्हाणे रा. संभाजीनगर, जालना यांनी फिर्याद दिली आहे. ते ठेकेदारी व्यवसाय करीत असून संबंधित बांधकाम साईटवर काम सुरू आहे. रात्रीच्या सुमारास त्यांनी साईटची पाहणी करून वॉचमन पंडीत अंभोरे यांना लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
https://www.instagram.com/reel/DWUK0-hCGVr/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
त्यानंतर गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बांधकामासाठी ठेवलेल्या लोखंडी सळ्या चोरीला गेल्याचे आढळले. अज्ञात चोरट्यांनी विविध आकारांच्या सळ्यांसह तयार कॉलम असा एकूण सुमारे 64 हजार रुपयांचा माल चोरून नेल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


