जालना येथे शेख इब्राहीम यांच्यावरील चाकूहल्ला प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; औषधी खरेदी करीत असतांना झाला होता हल्ला
शेख इब्राहीम शेख रसुल असे जखमीचे नाव आहे.
Published By Shubh Prabhat
On
जालना शहरातील नुतनवसाहत परिसरात एका ठेकेदार शेख इब्राहीम यांच्यावर चार जणांनी चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकावर सध्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हल्ला करणार्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख इब्राहीम शेख रसुल असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारा हल्ल्याची घटना घडली. वडिलांसाठी औषध घेऊन परत येत असताना मेन रोडवरील आकाश घाडगे यांच्या पानटपरीसमोर चार जणांनी त्यांची स्कुटी अडवली.
https://www.instagram.com/reel/DWZmFHTDlVD/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
गंभीर जखमी अवस्थेत पीडित युवकाने आरडाओरडा केल्यानंतर परिसरात गर्दी जमली. त्यावेळी त्यांचे मित्र जुबेर पटेल आणि अरषद शेख यांनी त्यांना तातडीने नवजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान काही काळ त्यांची शुद्ध हरपल्याची माहिती आहे.
या प्रकरणी चारही आरोपींविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी जखमीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


