मौजपुरी पोलीसांचा हातवन येथील हातभट्टी दारू विक्रीवर छापा; 35 लिटर गावठी दारू जप्त; गुन्हा दाखल 

पोलीस कर्मचारी राजेंद्र खुशालराव देशमुख यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

Published By Shubh Prabhat
On

जालना तालुक्यातील मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातवन येथे अवैध हातभट्टी दारू विक्री करणार्‍या व्यक्तीवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे 35 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस कर्मचारी राजेंद्र खुशालराव देशमुख यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. हातवण झोपडपट्टी परिसरात शंकर शेषराव जाधव रा. हातवण, जालना  हा आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना हातभट्टी दारूची विक्री करत असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष सायंकाळी साडेचारच्या सुमारास छापा टाकला.

https://www.instagram.com/reel/DWUK0-hCGVr/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

Indian_Fast

छाप्यामध्ये आरोपीच्या शेडची झडती घेतली असता निळ्या रंगाच्या प्लास्टिक कॅनमध्ये सुमारे 35 लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली. या दारूची किंमत अंदाजे 3 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून नमुना तपासणीसाठी जप्त केला असून उर्वरित दारू जागीच नष्ट करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज