जालना जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत; विक्रीवरील मर्यादा रद्द-जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर

इंधन वितरणावर निर्बंध ठेवण्याची गरज उरलेली नाही

Published By Shubh Prabhat
On

जालना जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (पुरवठा विभाग) यांनी इंधन विक्रीवरील पूर्वीचे निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी 27 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सोशल मिडियावर पसरलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत होती. त्यामुळे मागणी व पुरवठा यामध्ये काही काळ समस्या निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन 25 मार्च, 2026 रोजी पेट्रोल व डिझेल विक्रीवर काही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यातील बीपीसीएल, आयओसीएल, एचपीसीएल तसेच इतर कंपन्यांकडून पुरेसा इंधन साठा उपलब्ध झाल्याने आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. त्यामुळे इंधन वितरणावर निर्बंध ठेवण्याची गरज उरलेली नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

यामुळे 25 मार्च रोजी जारी करण्यात आलेला पेट्रोल-डिझेल विक्रीवरील मर्यादेचा आदेश तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक तेवढेच इंधन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पोलिस विभाग, तहसीलदार, तेल कंपन्यांचे अधिकारी तसेच पेट्रोल पंप चालकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज