औद्योगिक वसाहतीतील कामगार उपाशी, हॉटेल व्यावसायिक गॅसच्या धुरावर; शासनाने तातडीने लक्ष घालावे - अ‍ॅड. महेश धन्नावत

पुरवठा विभागाकडून होणारे दुर्लक्ष संशयास्पद

Published By Shubh Prabhat
On

जालना शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायिक आणि कामगार मोठ्या संकटात सापडले आहेत. इराण-इराक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अनेक हॉटेल्स बंद झालेत. शिवाय औद्योगीक वसाहतीमधील कामगार उपाशी आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष घालावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. महेश धन्नावत यांनी केली.

अनेक उपाहारगृहे बंद झाली आहेत, तर काही ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी पुन्हा एकदा लाकूडफाटा जाळण्याचा जुना मार्ग अवलंबला जात आहे. या गंभीर समस्येवर अ‍ॅड. महेश धन्नावत यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून शासनाने तातडीने लक्ष घालून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.

अ‍ॅड. महेश धन्नावत यांनी निदर्शनास आणून दिले की, एकीकडे व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा असताना, काही हॉटेल्स मात्र सुरळीत सुरू आहेत. रस्त्यावरील लहान विक्रेते आणि काही शासकीय उपहारगृहांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर होत आहे. ही बाब जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणे हे ’अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955’ आणि ’एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश, 2000’ अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही पुरवठा विभागाकडून होणारे दुर्लक्ष संशयास्पद आहे. असेही त्यांनी म्हटले.

https://www.instagram.com/reel/DWZmFHTDlVD/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

Indian_Fast

या समस्येमुळे केवळ हॉटेल व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असलेले अनेक घटक प्रभावित झाले आहेत. अनेक महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी ’कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत हॉटेल्समध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करतात. हॉटेल्स बंद पडल्यास त्यांच्या शिक्षणावर आणि रोजगारावर थेट परिणाम होईल. यापूर्वी रात्री 10 वाजता हॉटेल्स बंद करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या नियमामुळे व्यावसायिक आधीच त्रस्त होते, त्यात आता या नव्या संकटामुळे ते अधिकच खचले आहेत. असेही धन्नावत यांनी म्हटले आहे.


#shubhprabhat

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज