कर्तव्यात हलगर्जीपणा; जालना तहसील कार्यालयातील 10 बीएलओ विरुद्ध गुन्हा दाखल
तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, जालना यांच्या आदेशानुसार यांनी ही फिर्याद दिली
Published By Shubh Prabhat
On
निवडणूक कामकाजात गंभीर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जालना तहसील कार्यालयातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या 10 कर्मचार्यांविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार विष्णुपंत साहेबराव घुगे यांनी ही फिर्याद दिली आहे.
तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, जालना यांच्या आदेशानुसार तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या 3 मार्च 2026 च्या परिपत्रकानुसार संबंधित बीएलओ यांना मतदार यादीतील अस्पष्ट व मानवी नसलेल्या छायाचित्रांची पडताळणी, तसेच विविध निवडणूक संबंधित कामे करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र संबंधित कर्मचार्यांनी आदेश असूनही कामावर रुजू न होता वारंवार बैठकींना अनुपस्थित राहिल्याचे समोर आले आहे.
संबंधित कर्मचार्यांच्या जाणीवपूर्वक टाळाटाळीमुळे निवडणूक कामात अडथळा निर्माण झाल्याने त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 234 तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 च्या कलम 134 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्या आली आहे.


