सीए असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी सीए स्वाती धन्नावत यांची निवड
बैठकीत शहरातील अनेक चार्टर्ड अकाउंटंट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना : शहरातील सीए असोसिएशनची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी सीए स्वाती धन्नावत यांची निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी शुभम मुंदडा, सचिवपदी निलेश श्रोत्रीय, तर कोषाध्यक्षपदी नंदकिशोर अग्रवाल आणि मनाली मल्लावत यांची निवड झाली आहे.
नव्या पदाधिकार्यांची घोषणा होताच उपस्थित सदस्यांनी त्यांचे स्वागत करत अभिनंदन केले. कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आयोजित बैठकीत शहरातील अनेक चार्टर्ड अकाउंटंट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सीए उमेश झंवर, निखिल बाहेती, आकाश मुंदडा, भरत अग्रवाल, पुष्कर राठी, नटवर मर्दा, दीपक रुणवाल, राज मल्लावत, संजय लखोटिया, कल्पेश लड्डा, गौरव गिंदोडिया, भाविक जैन, रितिक देवीदान, यश अग्रवाल, दर्शन जैन, समीर अग्रवाल, आतिश काबरा, पंकज गिल्डा, गोविंद गिल्डा, अतुल मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
https://www.instagram.com/reel/DWUK0-hCGVr/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीकडून आगामी काळात सदस्यांमध्ये समन्वय वाढवणे, व्यावसायिक पारदर्शकता बळकट करणे आणि समाजोपयोगी कार्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे यावर भर दिला जाणार आहे. नव्या नेतृत्वामुळे असोसिएशनला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.


