पीडित कुटुंबांना मिळाला शासकीय सेवेचा आधार; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान
एका विशेष कार्यक्रमात या लाभार्थ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप
Published By Shubh Prabhat
On
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ट्रॉसिटी) दाखल झालेल्या गंभीर प्रकरणांतील दिवंगत व्यक्तींच्या वारसांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील अशा 8 पात्र वारसांची शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग-4 पदावर निवड करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात या लाभार्थ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे संघर्षानंतर या कुटुंबांना हक्काचा आधार मिळाला आहे.
https://www.instagram.com/reel/DWUK0-hCGVr/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते हे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व प्रशासकीय कामात सचोटीने योगदान देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे, समाजकल्याण निरीक्षक अनिल सुनगत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


