जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठक; कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांचे निर्देश

अमंली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या माध्यमातून विविध विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश

Published By Shubh Prabhat
On

जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली. 

या बैठकीस जिल्हा रुग्णालयाचे डॉ. पी. एम. कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संजय ताकवाले, कृषी अधीकारी सचिन पांचाळ, समाज कल्याण विभागाचे एल.बी. बारगिरे सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासनचे जीवन जाधव, नायब तहसिलदार शैलेश राजमाने, पोलीस निरिक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन इंगेवाड यांची उपस्थिती होती.

https://www.instagram.com/reel/DWUDctEiN7x/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

Indian_Fast

 जिल्हास्तरीय बैठकीत अमंली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या माध्यमातून विविध विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत अपर जिल्हाधिकारी श्री. मिसाळ म्हणाले की, अवैध पद्धतीने गावठी दारू व अमली पदार्थांची निर्मिती व विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच महसूल विभागाने पोलीस कारवाई दरम्यान आवश्यक ती मदत करावी, असेही सांगण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाला ग्रामीण भागातील वैद्यकीय दुकाने व दवाखान्यांवर नियमित तपासणी करून औषधांचा गैरवापर रोखण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः ‘एच वन’ (क1) गटातील औषधांची बेकायदेशीर विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित दुकाने व डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याबाबतही सूचना अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी दिल्या.

शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती मोहीम राबवावी, विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी, असे सांगण्यात आले. यासोबतच क्रीडा, आरोग्य व पोलीस विभागांनी संयुक्तपणे समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज