जालना येथील टोल नाक्यावर प्रतिबंधित गुटखा जप्त; तरुणासह 1 लाख 44 हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागेवाडी टोलनाक्यावर कारवाई

Published By Shubh Prabhat
On

जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागेवाडी टोलनाक्यावर कारवाई करत पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूचा मोठा साठा जप्त केला असून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण 1 लाख 44 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक सय्यद अफसर सय्यद अजगर हुसेन यांनी फिर्याद दिली आहे. दि. 28 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 7.40 वाजता पोलीस पथक चंदनझिरा हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना गुप्त माहितीच्या आधारे जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील नागेवाडी टोलनाका येथे ही कारवाई केली.


@hirkani @ShubhPrabhatTV आमदार बबनराव लोणीकर | आमदार रोहित पवार | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे | काय प्रकार घडला ते पहा...

Indian_Fast

संशयीत इसमाच्या मोटारसायकल तपासणीदरम्यान त्याच्या जवळील पिशवीत मोठ्या प्रमाणात गुटखा, पानमसाला व तंबाखू आढळून आला. त्यामुळे त्याला इसमाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

https://www.instagram.com/reel/DWZmFHTDlVD/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

चौकशीदरम्यान अफजल मतिन पठाण रा. मिल्लतनगर, जुना जालना असे गुटखा घेऊन जाणार्‍याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी प्रतिबंधीत असलेला राजनिवास पानमसाला, जाफरानी जर्दा, विमल पानमसाला आदी ब्रँड्सचा एकूण 1 लाख 44 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मोटारसायकलचाही समावेश आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या मालाचे नमुने तपासणीसाठी राखून ठेवले असून उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चंदनझिरा पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी

टॉप न्यूज