वंदे भारत व जनशताब्दी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; 3 मेपासून सुधारित वेळापत्रक लागू होणार
नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
रेल्वे मंडळाने गाडी क्र. 20705 व 20706 हजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - हजूर साहिब नांदेड वंदे भारत गाडीच्या धावण्याच्या वेळेत सुमारे 30 मिनिटांची कपात करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार गाडीच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली असून नवीन वेळा दिनांक 3 मे 2026 पासून लागू होणार आहेत.
गाडी क्र. 20705 (हजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ही 3 मे 2026 पासून सुधारित वेळेनुसार धावेल. नांदेड येथून सुटण्याची वेळ सकाळी 05:00 ऐवजी 05:20 करण्यात आली आहे. परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आदी स्थानकांवरील आगमन व प्रस्थान वेळेत काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमनाची वेळ 14:25 ऐवजी 14:15 अशी सुधारित करण्यात आली आहे.
तसेच गाडी क्र. 12072 हिंगोली - मुंबई जनशताब्दी गाडी हिंगोली येथून 04:20 ऐवजी 04:15 वाजता सुटेल. बसमत, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर आणि जालना स्थानकांवरीील वेळेत प्रत्येकी काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. जालना येथे आगमनाची वेळ 08:28 ऐवजी 08:23 अशी करण्यात आली आहे.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रकाची खातरजमा करूनच नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. नवीन वेळापत्रक दिनांक 3 मे 2026 पासून प्रभावी होणार आहे.


