खा. डॉ. कल्याण काळे यांची आमरण उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांना भेट; शेतकर्‍यांच्या मागण्यांना पाठिंबा

शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त; खंबीर पाठिंबा देणार – डॉ. कल्याण काळे

On

खा. डॉ. कल्याण काळे यांनी सोमवार दि. 9 फेब्रुवारी, दुपारी 1 वाजता आमरण उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांची भेट घेतली.कारखाना शेतकर्‍यांच्या हितासाठी कसा सुरू होईल, शेतकर्‍यांचे नुकसान कसे भरून काढता येईल आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीची कार्यवाही कशी होईल, याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

खा. डॉ. कल्याण काळे यांनी सोमवार दि. 9 फेब्रुवारी, दुपारी 1 वाजता आमरण उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांची भेट घेतली. गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून उपोषणामागील मागण्या जाणून घेतल्या.

यावेळी कारखाना शेतकर्‍यांच्या हितासाठी कसा सुरू होईल, शेतकर्‍यांचे नुकसान कसे भरून काढता येईल आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीची कार्यवाही कशी होईल, याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांची मागणी रास्त असून आपण खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठी उभे असल्याचे आश्वासन खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिले.

Indian_Fast

त्यानंतर खासदारांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची तात्काळ माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, तसेच उपोषणकर्त्यांच्या वतीने येणार्‍या शिष्टमंडळासोबत मागण्यांवर चर्चा करून मार्ग काढावा, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या.

या भेटीदरम्यान शेतकरी नेते लक्ष्मणरावजी वडले, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष कल्याण दळे, संघर्ष समितीचे अध्यक्ष अंकुश देशमुख, नारायण वाडेकर, लक्ष्मण शिंदे, अशोक उबाळे, राम सावंत, ड. सोपानराव भांजे, उदय देशमुख, राजेंद्र गोरे, चंद्रकांत देशमुख, सुरज यंगटवार, लाला पाटील लकडे, बाबुराव थेटे यांच्यासह अनेक शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याने उपोषणस्थळी आशेचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज