नाशिकमधून सराईत चोरटा जालना पोलीसांनी केला जेरबंद; 4 गुन्हे उघड, 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपीवर यापूर्वीही मोटारसायकल चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीचे तब्बल 16 गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल
जालना जिल्ह्यातील जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक येथून अटक करत चार गुन्ह्यांचा उलगडा केला असून 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही माहिती देण्यात आली.
17 फेब्रुवारी 2026 रोजी जिजामाता चौक येथे हाजी शेख इब्राहिम शेख वाहाब यांना चाकूचा धाक दाखवून 60 हजार रुपये लुटल्याचा गुन्हा सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल होता. या गुन्ह्याचा तपास करताना अशोक ऊर्फ मुक्या भिकाजी तरकसे रा. कन्हैयानगर, जालना याच्यावर संशय बळावला. गुन्ह्यानंतर तो सतत वेगवेगळ्या शहरांमध्ये लपत असल्याची माहिती मिळाली होती.
https://www.instagram.com/reel/DWHQ0WNCMpu/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
आरोपीवर यापूर्वीही मोटारसायकल चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीचे तब्बल 16 गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपासासाठी आरोपीला सदर बाजार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सतिष श्रीवास, संदीप चिंचोले, रमेश काळे यांनी केली आहे.


