तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट; यशोदीप नगरातून घरासमोरून दुचाकी चोरी

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

Published By Jalna News
On

जालना शहरातील यशोदीप नगर परिसरातून घरासमोर उभी केलेली होंडा शाईन मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असल्याने नेहमीच चोरीच्या घटना घडत आहेत.

 रविवार दि. 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सचिन कचरु गेलोत रा. यशोदीप नगर, जालना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची मोटारसायकल घरासमोर उभी करून हँडल लॉक केले होते. त्यानंतर कुटुंबीयांसह ते झोपले.

Indian_Fast

मात्र, सकाळी सुमारे 6 वाजता उठून बाहेर आले असता घरासमोर उभी केलेली मोटारसायकल जागेवर दिसली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतरही वाहनाचा कोणताही मागमूस लागला नसल्याने मोटारसायकल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरीस गेलेली मोटारसायकल होंडा शाईन कंपनीची असून तिची अंदाजे किंमत 25 हजार रुपये आहे. अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध पोलीस घेत आहेत.

प्रतिनिधी