जालना हादरले; खडकपुरा येथील 24 वर्षीय तरुणाचा खून; वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह पथक घटनास्थळी
गुन्हे अन्वेषण पथक आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांची मदत घेऊन घटनेचा तपास करण्यात येत आहे.
Published By Shubh Prabhat
On
जालना : शहरातील खडकपुरा येथील एका 24 वर्षीय तरुणाचा जालना शहर महानगरपालिकेच्या जवळील रोडवर खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयूर मेंढरे (वय 24, रा. खडकपुरा, जालना) असे मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात कारणावरून मयूर मेंढरे याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
पोलीस तपासानंतरच खुनामागील नेमके कारण आणि आरोपींबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे.


