डॉ. सुशील सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त नंदापूर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
विविध सामाजिक उपक्रमानी साजरा केला डॉ. सुशील सूर्यवंशी यांचा वाढदिवस
Published By Dainik Shubh Prabhat
On
जालना/ दशरथ वाकोडे : दि. 11 जुलै 2026 : रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जालना तालुक्यातील नंदापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि शिक्षणाबद्दल प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, अन्य शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेण्याचे, मेहनत व चिकाटीच्या बळावर जीवनात मोठे यश मिळविण्याचे आवाहन केले.
यावेळी भिमराज खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. सुशील सूर्यवंशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उच्च पदापर्यंत मजल कशी मारली, याची प्रेरणादायी माहिती दिली. कठोर परिश्रम, जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


