घर दाखविण्याच्या बहाण्याने शेतकर्याची अश्लील छायाचित्रे काढली;
ब्लॅकमेल करुन 75 हजारांची खंडणी उकळली
Published By Dainik Shubh Prabhat
On
घर खरेदीसाठी दाखविण्याचा बहाणा करून एका शेतकर्याला जाळ्यात ओढत महिलेसह तिघांनी मारहाण करून अश्लील छायाचित्रे काढली, ती प्रसारित करण्याची धमकी देत 75 हजार रुपये, सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेतल्या तसेच वाहनाचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवार दि. 15 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात महिलेसह तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास साहेबराव जाधव रा. शिवणगिरी, ता. मंठा, जि. जालना त्यांची काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका महिलेसोबत ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये मोबाईलवर संपर्क राहिला आणि काही वेळा भेटीही झाल्या. एका भेटीदरम्यान संबंधित महिलेने त्यांच्याकडून चार हजार रुपये उसने घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर जबरदस्तीने त्यांचे कपडे उतरविण्यात आले. संबंधित महिलेनेही कपडे काढून अश्लील अवस्थेतील छायाचित्रे काढण्यात आली. ही छायाचित्रे प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी देत आरोपींनी पैशांची मागणी केली. भीतीपोटी फिर्यादीने खिशातील 25 हजार रुपये, वाहनातील 50 हजार रुपये तसेच हातातील अंदाजे दोन तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आरोपींना दिल्या.
यावरही आरोपींचे समाधान न झाल्याने त्यांनी आणखी पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर फिर्यादीला घराबाहेर काढून त्यांच्या बोलेरो वाहनाची काच फोडली, मोबाईल स्वतःजवळ ठेवून घेतला आणि पोलीसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अखेर चंदनझीरा पोलीस ठाण्यात संबंधीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


