जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उत्साहात रॅली संपन्न

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना : दि.११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कुंटूंब नियोजन पध्दतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी व सतत वाढणा-या लोकसंख्येच्या दुष्यपरिणामांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने डॉ.जयश्री भुसारे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन  करण्यांत आले होते.

जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलै रोजी प्रत्येक वर्षी संपुर्ण विश्वात साजरा करण्यांत येतो. या रॅलीला डॉ. जी.डी. म्हस्के यांनी हिरवा झेंडा दाखवुन रॅली मार्गस्थ केली.  गांधी चमन, मंमादेवी चौक, निरामय हॉस्पिटल ते गांधी चमन पर्यंत रॅली काढुन लोकसंख्या दिनाचे ’ दोन जन्मात अंतर, कुंटूंब सुदृढ निरंतर’ या घोषवाक्याने तसेच ’लहान कुंटुंब सुखी कुंटुंब.’ कुटुंब नियोजन करा, देशाला पुढे न्या, मुलगी आहे तर घर आहे, मुलगी आहे तर देश आहे. या घोषणाने परिसर दुमदुमला. 
यावेळी डॉ. जी डी म्हस्के यांनी रॅलीस संबोधन करतांना सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय योजना, उपक्रम राबविण्यांत येत आहे.  त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय कुंटुंब कल्याण कार्यक्रम होय.  शासकिय रुग्णालयातुन कुंटुंब नियोजनाची माहिती व उपक्रम बाबत माहिती सांगितले जाते. कुंटुंब कल्याण कार्यक्रमात दोन प्रकारच्या पध्दती आहेत एक कायमची नसबंदी शस्त्रक्रिया व दुसरा प्रकार तात्पुरती कुंटूंब नियोजन पध्दत.  यामध्ये स्त्री, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते व तात्पुरती पध्दतीमध्ये गर्भनिरोधक गोळया, अंतरा इंजेक्शन, कॉपर-टी, निरोध इ. बाबत जनतेतः जागरुकता निर्माण केली जाते.  ज्यामुळे लोकसंख्या नियंत्रण वाढीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी लहान कुंटुंबाचे फायदे बाबत जनजागृती, बालविवाह कायदयाची अंमलबजावणी, राष्ट्रीय कुंटूंब कल्याण कार्यक्रमाची माहिती, प्रत्येक कुंटुंबाने परिवार नियोजनाचा सल्ला घेऊन अंमलबजावणी करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असले पाहिजे असे आवाहन केले. 
या रॅली मध्ये अधिकारी, कर्मचारी व  सामान्य रुग्णालय जालना येथील परीचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनी यांनी सक्रिय सहभाग नोंदवुन रॅली यशस्वी केली.   
यावेळी डॉ. एस झेड गवारे वैद्यकीय अधीक्षक, डॉ. शितल सोनी तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. संगीता राजे, वैद्यकीय अधिकारी, श्रीमती छाया अग्रवाल अध्यक्ष इन्नर व्हील तसेच सचिव  श्रीमती मोनिका रुणवाल, श्री डी एस बोराडे, श्री पी आर नरवडे, श्री भाबट, आरोग्य कर्मचारी आदि उपस्थित होते.

प्रतिनिधी