शेतकर्यांच्या प्रश्नांवर खासदारांना बोलू दिले नाही; काँग्रेस व किसान काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन
दि. 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Published By Shubh Prabhat
On
जालना तालुका काँग्रेस आणि किसान काँग्रेसच्या वतीने तहसीलदार छाया पवार यांना निवेदन देण्यात आले. शेतकर्यांच्या प्रश्नांवर आयोजित बैठकीत खासदार डॉ. कल्याण काळे यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याच्या निषेधार्थ हे निवेदन देण्यात आले.
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पडुळ आणि किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाढेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. दि. 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पालकमंत्री संजय सिरसाट अध्यक्षस्थानी होते.


