Dainik Shubh Prabhat
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
चंदनझिरा सुंदरनगर नागेवाडी येथे शासकीय रुग्णालय उभारणीसाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली जागेची पाहणी
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना : चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर नागेवाडी येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे, यासाठी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार अर्जुनराव खोतकर यांनी प्रस्तावित शासकीय रुग्णालयासाठीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.
Read More...
निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १४ जुगाऱ्यांवर कारवाई
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना, प्रतिनिधी : निधोना शिवारात चोरून-लपून सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर जालना पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकून मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू यांच्या पथकासह चंदनझिरा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत एकूण १४ जुगाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहनांसह तब्बल २५ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
Read More...
पिंप्री राजा येथे गणपती मिरवणुकीत ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, १० ते १५ जण जखमी
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना/पिंप्री राजा, दि. १४ सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लावणारी दुर्दैवी घटना पिंप्री राजा येथे घडली. गणपती आगमनाच्या मिरवणुकीदरम्यान एका ट्रेलरचे ब्रेक फेल झाल्याने त्याचा ताबा सुटून ट्रेलर मिरवणुकीत घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून, १० ते १५ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More...
बदनापूर पोलीसांचा तपास फळाला ; कारफोडीतील सहा लाख रुपये जप्त
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना/दशरथ वाकोडे : बदनापूर शहरातील SBI बँकेतून १० लाख रुपये काढून कारमधून जात असलेल्या व्यक्तीच्या वाहनाचा पाठलाग करून कारची काच फोडत सहा लाख रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपींचा बदनापूर पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी आंध्र प्रदेशात जाऊन आरोपीच्या राहत्या घरातून चोरीस गेलेली सहा लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
Read More...
गणरायाच्या आगमनासाठी जालना नगरी सज्ज; बाजारपेठेत बालगोपालांसह नागरिकांची तुफान गर्दी
Published On
By Dainik Shubh Prabhat
विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती श्री गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी जालना शहरात सुरू झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश चतुर्थीनिमित्त आज घरोघरी गणरायाची स्थापना होणार असल्याने गणेशभक्तांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. सोमवार दि. 14 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक असणार्या विविध वस्तू आणि पूजासाहित्याच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
Read More...
नंदापूर येथे ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे अखंड पठण
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना/दशरथ वाकोडे : जालना तालुक्यातील नंदापूर येथील जेतवन बुद्ध विहारात गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेली ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या अखंड पठणाची धम्मपरंपरा यंदाही मोठ्या श्रद्धा, निष्ठा आणि उत्साहात सुरू आहे. गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेले हे ग्रंथपठण आगामी ऑक्टोबर महिन्यातील अश्विन पौर्णिमेपर्यंत दररोज नियमितपणे करण्यात येत आहे. या उपक्रमाला गावातील उपासक-उपासिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जेतवन बुद्ध विहार परिसरात दररोज धम्ममय वातावरण निर्माण होत आहे.
Read More...
कलाकारांच्या सर्जनशीलतेला मिळणारे हे व्यासपीठ कौतुकास्पद” : मनीषाताई टोपे
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना : चित्रकलेच्या विविध कलाविष्कारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या यशवंतराव चव्हाण सेंटर जालना, अजिंठा चित्रकला महाविद्यालय व रोटरी क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मान्सून शो–२०२६’ या ३३व्या राज्यस्तरीय कला प्रदर्शनाला श्रीमती मनीषा ताई टोपे यांनी भेट देऊन कलाकारांच्या कलाकृतींची पाहणी केली. यावेळी त्यांनी कलाकारांचे कौतुक करत, जालना नगरीत अशा प्रकारचे राज्यस्तरीय कला उपक्रम आयोजित होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
Read More...
नंदापूरच्या वैभवात भर पडणार; भव्य भारत माता मंदिराचा २८ सप्टेंबरला लोकार्पण सोहळा
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना/ दशरथ वाकोडे : द्राक्ष उत्पादनासाठी एकेकाळी जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या नंदापूर गावाच्या वैभवात आता आणखी एका महत्त्वपूर्ण वास्तूची भर पडली आहे. गुरुवर्य ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या भव्य भारत माता मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ३.४५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
Read More...
जालना शहरात मोटारसायकलचे सुटे भाग काढताना दोघांना पकडले; 45 हजारांची दुचाकी जप्त
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना शहरातील कन्या प्रशाळेच्या पाठीमागील बाजूस अंधारात मोटारसायकलचे सुटे भाग काढत असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे आढळून आलेली सुमारे 45 हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. आदित्य आनंद नवगिरे (वय 22, रा. क्रांतीनगर, जालना) आणि जय अशोक उदावंत (वय 23, रा. सुवर्णकारनगर, जालना) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.
Read More...
कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी देवमूर्ती येथे विशेष मार्गदर्शन व अर्ज स्वीकृती शिबिर
Published On
By Dainik Shubh Prabhat
देवमूर्ती, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी विशेष मार्गदर्शन व अर्ज स्वीकृती शिबिराचे आयोजन देवमूर्ती येथे करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, देवमूर्ती येथे हे शिबिर होणार असून परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण महसूल मंडळ देवमूर्तीच्या वतीने करण्यात आले आहे.
Read More...
राजुरमध्ये १ कोटी ३५ लाखांचा गुटखा जप्त; पुरवठ्याच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचणार का?
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना, प्रतिनिधी : जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री आणि वाहतूक सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे राजुर येथील टेंभुर्णी रोडवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे ९५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचा समावेश आहे.
Read More...
बाजीउमरद येथे अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते बैलांची विधीवत पूजा
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना : महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत शेतकरी आणि बैल यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे मानले जाते. शेतकऱ्याच्या सुख-दुःखात साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा बैलपोळा सणाच्या पूर्वसंध्येला जालना तालुक्यातील बाजीउमरद येथे पारंपरिक पद्धतीने ‘खांदे मळणी’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Read More...

Help