कुंभार पिंपळगावात गोवंशीय मांसप्रकरणी विशेष पथकाची धडक; १ हजार १७० किलो मांसासह ३.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाच जणांविरुद्ध कारवाई; मांस कापण्याची साधने, फ्रिज आणि इतर साहित्यही पोलिसांच्या ताब्यात

Published By Shubh Prabhat
On

जालना : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे गोवंशीय मांसप्रकरणी जालना पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल १ हजार १७० किलो गोवंशीय मांसासह मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारी साधने, फ्रिज आणि इतर साहित्य असा एकूण ३ लाख ८३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुंभार पिंपळगाव येथे गोवंशीय मांसासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर जालना विशेष पथकाने कारवाई केली. पथकाने संबंधित ठिकाणी तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गोवंशीय मांस आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे १ हजार १७० किलो मांस जप्त केले. यासोबतच मांस कापण्याची साधने, फ्रिज आणि अन्य संबंधित साहित्यही ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत कौसर सत्तार कुरेशी, लुकमान फारुख कुरेशी, अबरार यासीन पठाण, मुख्तार जुगन कुरेशी आणि इस्माईल मेहबूब कुरेशी या पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. हे सर्वजण कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी आहेत.

Indian_Fast

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जालना विशेष पथकाने केली. या पथकात पोलीस हवालदार सचिन कोकणे, महिला पोलीस कर्मचारी मेघा बोराडे, पोलीस कर्मचारी नंदकिशोर जैवाळ, हाळदे आणि रांजणे यांचा सहभाग होता.

गोवंशीय मांसप्रकरणी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे घनसावंगी तालुक्यात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास घनसावंगी पोलीस करीत आहेत.

प्रतिनिधी

संबंधित समाचार