शिवरायांचे स्मरण केल्यास आत्मविश्वास निर्माण होतो-आमदार अर्जुन खोतकर

शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद

Published By Shubh Prabhat
On

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात भिती नावाच्या पेशी नव्हत्या त्यामुळे ते प्रत्येक काम कुठल्याही भीतीविना करत असत. शिवरायांचे स्मरण केल्यास आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे प्रतिपादन आ. अर्जुन खोतकर यांनी केले.

गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शिव जयंती निमित्त सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

WhatsApp Image 2026-02-19 at 20.18.39

Indian_Fast

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी, 2026 रोजी जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्व व शौर्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जालनेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

WhatsApp Image 2026-02-19 at 20.18.46

यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल उपजिल्हाधिकारी रोहयो मनिषा दांडगे, उप विभागीय अधिकारी जालना रामदास दौंड, तहसीलदार जालना छाया पवार, अतिरिक्त आयुक्त जालना शहर महानगरपालिका अर्जुन गिराम, उपायुक्त जालना शहर महानगरपालिका नंदा गायकवाड, तहसीलदार बदनापूर अतुल बने यांची उपस्थिती होती.
यावेळी सांस्कृतीक कार्यक्रमात शाहीर रामानंद उगले यांनी शिवजन्माचा पोवाडा, माता जिजाऊने शिवरायांना कसे घडवले याबाबतचा पोवाडा, अफजलखानाचा वधाचा पोवाडा, दोनच राजे इथे गाजले, गाडी गुंगराची हे पोवाडेचे बहारदार सादरीकरण केले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी या कार्यक्रमास प्रतिसाद दिला.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज