समाजसेविका ज्योती शिवाजी खिलारे यांना ‘सुवर्ण रत्न पुरस्कार 2025’
विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल आतापर्यंत त्यांना सुमारे 27 ते 28 पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
Published By Shubh Prabhat
On
पुणे - सामाजिक, शैक्षणिक आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या समाजसेविका ज्योती शिवाजी खिलारे यांना ‘सुवर्ण रत्न पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला आहे. समुपदेशक, पत्रकार, मानसशास्त्रज्ञ आणि मेंदू उपचारतज्ज्ञ म्हणून राज्यभर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान देण्यात आला.
मानसिक आरोग्य जनजागृती, कौटुंबिक समुपदेशन, महिला सक्षमीकरण आणि युवक मार्गदर्शन या क्षेत्रांत त्यांनी सातत्यपूर्ण काम करत अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या प्रभावी समुपदेशनामुळे अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली असून युवकांना योग्य दिशा मिळाल्याचे सांगितले जाते. विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल आतापर्यंत त्यांना सुमारे 27 ते 28 पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Help