कास पठारावर दुर्मिळ युरोपियन नीलकंठाचे दर्शन; पर्यावरण अभ्यासक गणेश सातव यांनी केली नोंद
पक्ष्यामुळे कासच्या जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित
Published By Shubh Prabhat
On
फलटण प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पठारावर युरोपियन नीलकंठ (युरोपियन रोलर) या आकर्षक स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन झाले आहे. पर्यावरण अभ्यासक गणेश सातव यांनी या पक्ष्याची नोंद केली असून, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नंदकुमार दुधे यांनी त्याची ओळख निश्चित केली. या दुर्मिळ निरीक्षणामुळे कास पठारावरील समृद्ध पक्षीवैविध्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
कास पठार रंगीबेरंगी रानफुले, दुर्मिळ वनस्पती आणि समृद्ध जैवविविधतेसाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. पश्चिम घाटाच्या नैसर्गिक संपदेतील महत्त्वाचा भाग असलेल्या या परिसराला २०१२ मध्ये युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाले. त्यामुळे कास पठाराचे पर्यावरणीय महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित झाले आहे.
कास पठारावर आढळणाऱ्या विविध पक्षीप्रजाती, वनस्पती आणि नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करण्याची गरज या निरीक्षणामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. पक्षी निरीक्षक आणि पर्यावरण अभ्यासकांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणातून परिसरातील जैवविविधतेविषयी नवी माहिती समोर येत असून, अशा नोंदी निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

Help

