जिल्हा परिषद शाळा विरार पूर्व येथे मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिन उत्साहात

प्रकल्पांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन, नवकल्पना आणि प्रयोगशीलता दिसून आली.

Published By Shubh Prabhat
On

विरार - जिल्हा परिषद शाळा, विरार पूर्व येथे मराठी भाषा गौरव दिन आणि विज्ञान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर विविध प्रकल्प सादर करत आपल्या कल्पकतेचे आणि ज्ञानाचे प्रदर्शन केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे भाषण, कविता सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विज्ञान दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या प्रकल्पांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन, नवकल्पना आणि प्रयोगशीलता दिसून आली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माया फाऊंडेशनचे संस्थापक अनिल पाटील व अध्यक्षा सौ. माया पाटील उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापिका सौ. ज्योती राऊत, शिक्षकवर्ग आणि माया फाऊंडेशनचे कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

Indian_Fast

पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मराठी भाषेचा अभिमान बाळगावा तसेच विज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग स्वीकारावा, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज