मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख महेश नागवे यांचा अनेक सहकार्यासह शिवसेनेत जाहीर प्रवेश

आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते स्वागत

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना | प्रतिनिधी : जालना शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला असून *मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख महेश संपतराव नागवे* यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे उपनेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत भाग्यनगर येथील दर्शना बंगल्यावर छोटेखानी हा पक्षप्रवेश पार पडला.

  यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी महेश नागवे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले. शिवसेना पक्षप्रमुखांच्या विचारांवर विश्वास ठेवून पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले. तसेच आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन केले.या पक्षप्रवेशामुळे जालना शहरातील शिवसेनेच्या संघटनात्मक बळात निश्चितच वाढ होणार असून युवकांमध्ये पक्षाची ताकद आणखी वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

       या प्रसंगी युवा सेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर* यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख महेश संपतराव नागवे यांच्यासह प्रदीप जाधव, अमोल चौधरी, अभिषेक माने, कृष्णा ढोबळे, कृष्णा खराद, सोनाजी पडोळे, राम लोहकरे, बालाजी चोरमारे, सौरभ नन्नवरे, यश वालेकर आणि किशोर लाबदे यांचा समावेश होता.यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी देखील नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिनिधी

संबंधित समाचार