जालन्यात काँग्रेसचे ‘संघटन सृजन’ अभियान सुरू; नव्या नेतृत्वाला संधी मिळणार - खा. डॉ. कल्याण काळे यांची माहिती

या अभियानांतर्गत जिल्हा पातळीपासून बूथ स्तरापर्यंत संघटनात बदल करण्यात येणार

Published By Shubh Prabhat
On

काँग्रेस पक्षाने राज्यभर सुरू केलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यातही संघटनात्मक पुनर्बांधणीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देत पक्ष अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. आता नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार असल्याची माहिती  पत्रकार परिषदेत दिली.

या अभियानांतर्गत जिल्हा पातळीपासून बूथ स्तरापर्यंत संघटनात बदल करण्यात येणार असून, दीर्घकाळ एकाच पदावर असलेल्या पदाधिकार्‍यांना बदलून नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पद भूषवलेल्या जिल्हाध्यक्षांच्या जागी नवीन नेतृत्वाची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात पक्षश्रेष्ठींकडून निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून, हे निरीक्षक विविध इच्छुक पदाधिकार्‍यांच्या मुलाखती घेत आहेत. या मुलाखतींनंतर पात्र उमेदवारांची पॅनेल तयार करून ती केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली जाणार आहे. त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Indian_Fast

तसेच, बूथ स्तरावर पक्षाचे जाळे मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यावरही भर दिला जात आहे. प्रत्येक गाव, वॉर्ड आणि बूथ पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या पारदर्शक प्रक्रियेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्या नेतृत्वामुळे काँग्रेसला जिल्ह्यात नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अभियान महत्त्वाचे मानले जात आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज