जालना स्केटिंग असोसिएशन आणि फाल्कन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
जालना स्केटिंग असोसिएशन आणि फाल्कन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जालना जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विद्यार्थ्यांची नावे नोंदविण्यात आली असून, या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद करून जिल्ह्याचा मान वाढविणार्या खेळाडूंमध्ये आरिश आमेर अहमद शेख, अलिझा मरियम शेख बशीर, विआन मनोज जिंदल, जयवर्धन नितीन राठोड, जरमिया मनोज कसबे, शिवराज अनिल खतडे, कामरान निसार सय्यद, यश रुपेश बोरुंदिया आणि वेद अंकुश राठोड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक निशा सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनती आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन दिले. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, सन्मान आणि अभिमानाच्या वातावरणात पार पडला.


